लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?
लेडीज फस्ट मग ‘ आई शेवटी का जेवते ’ ? प्रश्न सरळ आणि साधा आहे , आपल्या अवती भोवती असे अनेक प्रश्न आपल्याला कदाचित माहित नसतात , कदाचित ते आपल्या जवळ असूनही आपण त्या गोष्टीपर्यंत पोहचत नाहीत . पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे आई . आईविना जीवन व्यर्थ आहे . जगातली सर्व ताकद एकीकडे व फक्त एकटी आई एकीकडे अशी ही आईची व्याख्या आहे . म्हणतात ना आकशाचा कागद आणि समुद्राची शाई जरी केली तरी आईविषयी निबंध लिहिला जाऊ शकणार नाही कारण ते सुध्दा कमी पडेल . " स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी " हे अगदी तंतोतंत खरं आहे . ज्याच्याजवळ आई नाही त्याला विचारा आई खरंच काय असते . आईची व्याख्या इतक्या सहज कोणीच करु शकत नाही . देवाला प्रत्येकाडं वेळ देणं होत नाही त्यामुळं त्या परमेश्वरांन आईच्या रुपात आपल्यावर माया करत आहे . आई वडीलांएवढं प्रेम जगाच्या पाठीवर कोणीच करु शकत नाही . स्त्रीमध्ये नवनिर्माण करण्याची क्षमता असते . तिच्यामध्ये असणारी सकरात्मक उर्जा परिवर्तन करण्याची हिम्मत असते . प्रत्येक स्त्री कोणाची तरी आई , बहिण ,...