लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?
प्रश्न सरळ आणि साधा आहे, आपल्या अवती भोवती असे अनेक
प्रश्न आपल्याला कदाचित माहित नसतात, कदाचित ते आपल्या जवळ असूनही आपण त्या गोष्टीपर्यंत पोहचत
नाहीत. पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे आई. आईविना जीवन व्यर्थ आहे. जगातली सर्व ताकद एकीकडे व
फक्त एकटी आई एकीकडे अशी ही आईची व्याख्या आहे. म्हणतात ना आकशाचा कागद आणि समुद्राची शाई जरी केली
तरी आईविषयी निबंध लिहिला जाऊ शकणार नाही कारण ते सुध्दा कमी पडेल. "स्वामी तिन्ही जगाचा आई
विना भिकारी" हे अगदी तंतोतंत खरं आहे. ज्याच्याजवळ आई नाही त्याला
विचारा आई खरंच काय असते. आईची व्याख्या इतक्या सहज कोणीच करु शकत नाही. देवाला प्रत्येकाडं वेळ
देणं होत नाही त्यामुळं त्या परमेश्वरांन आईच्या रुपात आपल्यावर माया करत आहे. आई वडीलांएवढं प्रेम
जगाच्या पाठीवर कोणीच करु शकत नाही. स्त्रीमध्ये नवनिर्माण करण्याची क्षमता असते. तिच्यामध्ये असणारी
सकरात्मक उर्जा परिवर्तन करण्याची हिम्मत असते. प्रत्येक स्त्री कोणाची तरी आई, बहिण, पत्नी, मुलगी असते. आईएवढं महान व्यक्तीमत्व
जगात कोणीच नाही. आपल्या परिवारासाठी रक्ताचं पाणी करुन आपला परिवार
सांभाळत असते ती आई असते, सकाळी लवकर उठून सर्वांना सकाळाचा प्रत्येकाच्या
चवदार आवडीचा नाष्ता खायला देते ती आई असते, बापाचा फाटलेला सदरा शिऊन
मुलाला ऐपत नसतांना देखील शाळेत इतर मुलं नावं ठेवतील म्हणून कर्ज काढून का होईना
पण नवीन शर्ट, बुट व इतर चैनीच्या सर्व
गोष्टी उपलब्ध करुन देते ती आई असते, आपल्या बापाचा मार खाते पण मुलांना रागवू देत नाही
ती आई असते, मुलांनी काही खोडया केल्या तर ती गोष्ट वडीलांपर्यंत न जाऊ देत आपल्या मुलांनं काहीच
केलं नाही असं बाबाला समजाऊन सांगणारी आई असते, मुलगा अगर परदेशी जातोय असं म्हटल्यावर डोळयात टचकन्
पाणी येणारी पहिली आईच असते. लेकरु परगावी शिकायला आहे त्याला वेळेवर जेवण कर, तब्येतीकडं नीट लक्ष दे
म्हणणारी फक्त आईच आसते. परिक्षेमध्ये मार्क कमी पडले तर बाबा रागावतात पण डोक्यावरुन
हात फिरवुन पुन्हा चांगला अभ्यास कर म्हणून आपल्या मुलांना सकारात्मक उर्जा देणारी
व हिम्मत देणारी आई असते, आई हे दोन अक्षरी नाव नसून तो एक मोठा विचार आहे, आई हे एक विश्व आहे. प्रेम व त्यागाचं प्रतीक
म्हणजे आई. त्याग काय असतो हा विषय
जगातल्या प्रत्येकांन आईकडून शिकावा. अनेकवेळेला गरीबीच्या व हालाखिच्या परिस्थितीमध्ये
असतांना पोटाची खळगी भरण्याची भ्रांत असतांना आपल्या लेकरांसाठी स्वतः आर्धी भाकरी
खाऊन मुलांना पोटभर जेऊ घालणारी आई आज वृध्दाश्रमात दिसत आहे. असं दृष्य पाहिल्यावर मन खिन्न होतं. तुमच्यासाठी, संसारासाठी, तुमच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी जे काही असेल
तुम्ही म्हणाता ना की मी यश मिळवलं आहे पण हे वाक्य साफ चुकीचं आहे, आई हयात असो व नसो तिच्याशिवाय
तुम्ही शुन्य आहात हे लक्षात असू दया. तुम्ही मिळवलेल्या यशाच्या पाठीमागे आईच सर्वस्वी
असते हे मात्र शंभर टक्के सत्य आहे.
सर्वात
महत्वाचा प्रश्न, आता जागतीक पातळीवर सर्वत्र लेडीज फस्ट म्हणून डंका वाजत असतांना
प्रत्येकांच्या घरी पृथ्वीवरचा
स्वर्ग, सर्वांची माय माऊली सर्वात
शेवटी का जेवते ? ती सर्वांबरोबर का नाही
जेवत, तिला बाबा आणि मुलांसोबत
जेवणाची का नाही मुभा ? हा सवाल डोक्यात ठासून भरा
आणि इथून पुढं आई सर्वांसोबतच जेवली पाहिजे असा बदल आपल्या परिवारामध्ये नक्कीच
करा ही कळकळीची सर्वांना विनंती आहे. असे
अनेक विविध प्रश्न आपल्या
सभोवतालीच असतात परंतू आपल्याला ते दिसत नाहीत हे दुर्देव आहे. यापुढे आई मुळीच सर्वांची जेवणं
झाल्यानंतर जेवण करणार नाही अशी शपथ घ्या. तिला
सर्व परिवारासोबत घेऊनच जेवायला बसा, बस
या लेखातून एवढंच सांगायचं आहे. असं
अनुकरण सर्वजण कराल हीच अपेक्षा.
- शंकर चव्हाण, (महाराष्ट्र राज्य), 9921042422
Write to : hr.shankarchavan@gmail.com
Comments
Post a Comment