महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

 


महाराष्ट्राच्या पावन भूमीत एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जन्माला आले, महाराष्ट्राच्या पावन भूमीत अनेक वीरांनी देशाला वीर योध्दे दिले आहेत. या मातीत जन्माला येणं म्हणजे नशीबच लागतं. माऊंट एव्हरेस्टवीर नंदकुमार जगताप यांच्या देशसेवेमुळे व कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे हे मान्य करावेच लागेल. बीड जिल्हयात, अंबाजोगाई तालुक्यात वसलेलं मुडेगाव हे त्यांचं मुळ गाव. याच गावच्या शूरवीरानं व त्यांच्या टीमने आज जगात आपल्या देशाचं नाव उंचावलं आहे. माऊंट एव्हेरेस्ट सर करुन सहीसलामत परत येणं म्हणजे जीवघेण्या संकटावर मात करुन जणू मृत्यूच्या दारातून परत येणं. दोन मजली घराच्या पायऱ्या चढणं सर्वसामान्य माणसाला असाह्य होतं आणि तो धापा टाकायला सुरुवात करतो. समुद्रसपाटीपासून ८८४८ मीटर उंच असे जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारे नंदकुमार जगताप हे भारतीय सैन्य दलातील चौथा मराठा एल.आय.रेजीमेंट मध्ये कार्यरत असतांना जगताप यांनी एव्हरेस्ट टीममधील दोन नंबर दुकडीचे एव्हरेस्ट चढाईसाठी सफल नेतृत्व केले. मराठा रेजीमेंट तुकडीचे नेतृत्व करत निर्भिडपणे आपलं ध्येय्य गाठण्याकडे लक्ष केंद्रीत करुन विजय प्राप्त केला. देशाला अभिमान वाटावा अशी त्यांनी कामिगिरी केलेली असल्यामुळे त्यांनी एव्हरेस्ट सर करुन आल्यानंतर त्यांच्यावर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत होता. त्यांचे विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष, केंद्रीय मंत्री, राष्ट्रपती, विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ पार पडले होते. आजही त्यांनी सांगितलेल्या प्रवासाचा किस्सा ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात. एवढया भयानक विशालकाय अशा माऊंट एव्हरेस्टवर जाणं म्हणजे ही काही साधारण बाब नाही. त्यासाठी मन कठोर करुन हिम्मत असायला हवी. आजही नंदकुमार जगताप यांच्याकडं पाहिलं की, त्यांना सॅल्यूटच करावा असं त्याचं व्यक्तीमत्व व त्यांची उंची आहे. अनेक विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी तरुणाईला यश मिळवण्यासाठी संघर्ष कसा करावा, याबाबत तसेच यशस्वी होण्याचे मार्ग सांगितले आहेत. विविध सत्कार संमारंभास गेल्यानंतर नंदकुमार जगताप यांनी रसिक श्रोत्यांना व विदयार्थ्यांना हेच सांगितले आहे की, ध्येय्य व परिश्रमाने जीवनात काहीही शक्य आहे याचं स्पष्टीकरण व उदाहरणं देत त्यांनी मार्गदर्शनही केले आहे. त्यांना एवढं मोठं ध्येय्य गाठण्यासाठी त्यांच्यातील आत्मविश्वास, जिद्द, त्यांनी केलेला निर्धार व महत्वकांक्षा यामुळेच ते यात यशस्वी झाले व त्यांना याच गोष्टींपासून प्रेरणा मिळाली हे तितकंच महत्वाचं तसेच अशा गोष्टी भविष्यात तरुणाईसाठी प्रेरणादायी नक्कीच ठरतील. एवढी वर्ष सिमेवर देशसेवेसाठी योगदान देणं ही बाब म्हणजे अतिशय प्रसंसनिय आहे व त्यामधून हेच दिसून येते की, आपण आपल्या परिवाराला सोडून वारा, पाऊस, उन याची तमा न बाळगता देशासाठी अहोरात्र डोळयात तेल घालून पहारा देणं व संपूर्ण देशभरामध्ये शांतता कायम रहावी यासाठी स्वत:चं संपूर्ण आयुष्य देशासाठी अर्पण करणं हे कोणालाही जमणार नाही ते फक्त या देशातील जवानच करु शकतील हे जास्त महत्वाचं आहे. आज सिमेवर देशाचा जवान दिवसरात्र उभा आहे, त्याला ना स्वत:च्या जीवाची पर्वा आहे, ना त्याला कसल्याही परिस्थीतीची, त्याचं ध्येय्य एकच शत्रुला सिमेच्या अलिकडे फिरकूही दयायचं नाही. एवढा मोठा संघर्ष आपल्या देशातील जवान आपल्यासाठी करतात ही खरोखरंच अभिमनाची बाब आहे हे विसरुन चालणार नाही.

सर्वसामान्याला एखादा छोटा डोंगर चढायचं म्हटलं तरी अनेकांचे धाडस होत नाही, परंतू सेना मेडल कॅप्टन नंदकुमार जगताप यांनी भारतीय सैन्य दलात सेवेत असतांना एक – दोन नव्हे तर तब्बल जगातील सर्वात उंच असणारे माऊंट एव्हरेस्टसह आठरा पर्वत सर केले आहेत त्यात देशातील व बाहेर देशातील पर्वतांचा समावेश आहे यासोबतच हिमालीयीन व महाराष्ट्रातील चौदा खतरनाक ट्रेकिंगचा पण बहुमान मिळवला आहे, यामधील पन्हाळा ते पावनखिंड पडत्या पावसात जवळजवळ पन्नास कि.मी. ट्रेक एक वेगळाच अनुभव, उत्साह व जबरदस्त उर्जा निर्माण करणारी ताकद देतो तसेच बाजीभ्रुंची आठवण देऊन मराठयांमध्ये एक विलक्षण परिवर्तन घडवून आणतो. तसेच त्यांनी कझाकिस्तानमधील मार्बल वाल पिक हा सुध्दा अगदी यशस्वीरित्या पर्वत सर करुन आपली कामगिरी यशस्वी करुन मोहिम फत्ते केली आहे.

दिनांक २१ फेब्रुवारी १९८९ बीड येथून भरती होऊन दिनांक ३१ जानेवारी २०१८ पर्यंचा त्यांचा प्रवास या संबंध लेखामधून कॅप्टन नंदकुमार जगताप हा विषय आपल्याला अभ्यासायचा आहे. खरं तर त्यांची कामगिरी व त्यांची उंची एवढी मोठी आहे की, त्यांच्याबद्दल एवढया छोटयाशा कागदावर मावेल असं वाटत नाही तरी सुध्दा छोटासा त्यांच्याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न व संधी मिळाल्यामुळे ती संधी सोडून कसं चालेल त्यामुळे हा शब्दप्रपंच. त्यांची प्रथम नियुक्ती ही ट्रेनिंग संपल्यानंतर जयपूर येथे झाली. आर्मी मध्ये भरती झाल्यानंतर त्यांनी शिपाई, लान्स नाईक, नायक, हवलदार, नायब सुभेदार, सुभेदार, सुभेदार मेजर, ऑन रेडी लेफ्टनंट सर्वात टॉपचे कॅप्टन या पदापर्यंतचा संपूर्ण सेवेचा टप्पा यशश्वीरित्या पार केला आहे. देशसेवेसाठी संपूर्ण सेवा २८ वर्ष ११ महिने व ११ दिवस एवढा काळ त्यांनी देशासाठी अर्पण केला आहे. सन २००७ साली त्यांची एव्हरेस्ट सर करण्यासाठीच्या टीममध्ये निवड झाली. एक कुशल जवान व सबसे बेस्ट असा त्यांचा त्यांच्या सेवा कालावधीत दरारा होता व त्यांनी त्यांच्या कामगिरीमधून तशीच छाप वरिष्ठांवर पाडली होती. त्यांनी त्यांच्या कामातूनच आपली जबरदस्त ओळख निर्माण केली होती.  संपूर्ण भारतीय सैन्यदलातून ४ अधिकारी ४ ज्युनिअर अधिकारी व १२ इतर जवानांची निवड झाली होती. त्यात नंदकुमार जगताप यांची मराठा रेजीमेंटमधून निवड झाली व इतर सर्व मिळून २० भारत देशाच्या जवानांची निवड एव्हरेस्ट सर करण्यासाठी झाली होती. त्यावेळी एव्हरेस्ट चढण्यासाठी जाणाऱ्या टीमचे नेतृत्व करण्याची सर्वांत मोठी जबाबदारी कर्नल आय एस थापा यांच्यावर होती तसेच दुसऱ्या ग्रुपचे चढाईचे नेतृत्व हे सेना मेडल कॅप्टन नंदकुमार जगताप यांच्यावर आले होते व ती जबाबदारी सेना मेडल कॅप्टन नंदकुमार जगताप यांनी यशस्वी रित्या पार केली. सन २००० साली चौथी मराठा बटालियनला २०० वर्षे पूर्ण होत असल्यानं फक्त चार मराठा रेजीमेंटच्या जवानांनी अरुणाचल प्रदेशात गोरीचीन हा पर्वत सर करुन चौथ्या मराठा बटालियनचे नाव संपूर्ण भारतीय सेनेत उंचालवले. १९९९ मध्ये अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल पूर्ण नॉर्थ इस्टमध्ये सायक्लॉन वादळ आले होते तशा परिस्थीतीत देखील गोरीचीनच्या बेसकॅंपमध्ये १५ फुट बर्फवृष्टी झाली असतांना जवानांना गोरीचीन पर्वतावर चढण्यासाठी माेठया प्रमाणावर संकटाचा सामना करावा लागला तरीही संकटावर मात करुन गोरीचीन पवर्तावर तिरंगा फडकवलाच. सेना मेडल प्राप्त कॅप्टन नंदकुमार जगताप यांची सैन्यदलामध्ये माऊंट एव्हरेस्टवीर म्हणून मुख्य ओळख असल्यामुळे त्यांना या कागिरीसाठी सैन्य दालातील सर्वोत्कृष्ट सन्मान सेना मेडल प्राप्त झाला आहे. त्यामुळे सेना मेडल कॅप्टन नंदकुमार जगताप अशी त्यांची पुन्हा नव्याने ओळख निर्माण झाल्यामुळे त्यावेळी सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. सेना मेडल कॅप्टन नंदकुमार जगताप यांनी व ते नेतृत्व करत असलेल्या टीमने फक्त ६७ दिवसांमध्ये जगातील सर्वांत उंच माऊंट एव्हरेस्ट यशस्वी सर केला त्यामुळे ही बाब देशासाठी सर्वात जास्त अभिमानाची व गर्वाची आहे. याबाबत भारत देशातच नव्हे तर त्यांचा इतर देशातही गुणगौरव करुन सन्मान करण्यात आला आहे त्यामध्ये मुख्यत्वे करुन नेपाळ, चायना, रशिया, आफ्रिका इ. देशांचा समावेश होतो. या देशमध्ये त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच भारत देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्तेही सेना मेडल कॅप्टन नंदकुमार जगताप यांचे व त्यांच्या टीमचा गौरव करुन सन्मान करण्यात आला होता. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब, मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, मा. महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मा. श्री. मुंडे, छत्रपती संभाजी महाराज, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, शिवसंग्राम पक्षाचे मा. आमदार स्व. विनायकरावजी मेटे साहेब, मा. खासदार जयसिंगरावजी गायकवाड साहेब, मा. गोपाळराव पाटील साहेब, मा.आमदार अभिमन्यू पवार साहेब, काँग्रेस पक्षाचे मा. वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासरावजी देशमुख साहेब, मा. आमदार धीरज विलासरावजी देशमुख साहेब, शिक्षण व आरोग्य सभापती जिल्हा परिषद बीड मा. श्री. राजेसाहेब देशमुख साहेब, मा.आमदार सौ. नमिताताई मुंदडा, मा.नगराध्यक्ष राजकिशोरजी पापा मोदी, जेष्ठ नेते मा. श्री. नंदकिशोरजी मुंदडा, मा. श्री. सुनिल काका लाेमटे, मा. श्री. बबन भैय्या लोमटे, मा. श्री अॅड. कल्याणराव लोमटे, सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री. पांडुरंगजी शेप साहेब इ. विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान व कार्याचा गौरव झाला आहे.

थलयसागर पर्वत सर करण्यासाठी पहाटे तीन वाजता जवानांनी चढाई करण्यासाठी समिट कॅप्म पासून सुरुवात केली व सलग दाेन तास चढाई केल्यानंतर मुख्य ८० ते ९० डिग्रीचा मोठमोठया शिळा चढाईसाठी सुरुवात केली असतांना वरुन शिळयाचा एक दगड नंदकुमार जगताप यांच्या डोकयाला लागून बांधलेल्या दोरीला बांधलेल्या स्थितीत जागेवरच बेशुध्द झाले. शुध्दीवर आल्यास चढाई सुरुवात केली असतांना कपाळावरुन रक्तस्त्राव सुरु होता. तरीही त्याचे गांभिर्य न पाळता त्यांनी चढाई सुरु ठेवली व दुपारी ४ वाजता थलाईसागरच्या शिखरावर तिरंगा व भगवा झेंडा फडकवला. १९९१ - १९९२ साली जगातील सर्वात उंच लढाईचे मैदान सियाचीन ग्लेशर मध्ये जवळजवळ १९००० फुटावर सलग ४ – ५ महिने राहण्याची संधी नंदकुमार जगताप यांना मिळाली होती.

देशाच्या जवानाला देशसेवा करत असतांना वीर मरण यावं व आपण देशासाठी बलिदान देवून शहिद व्हावं आणि आपल्या पार्थिवावर देशाचा अभिमान तिरंगा असावा हेच एकमेव स्वप्नं प्रत्येक जवानाने उराशी बाळगलेलं असतं हेच स्वप्नं सेना मेडल कॅप्टन नंदकुमार जगताप यांचे होते पण ते पूर्ण होऊ शकले नाही, पण अशा प्रकारची संधी आजही देशासाठी लढण्याची मिळाली तर ते त्या संधीचं सोनं करतील असा विश्वास त्यांनी दैनिक शिवजागर टीमने घेतलेल्या मुलाखतीदरम्यान दिला. त्यांनी या माध्यमातून संपूर्ण महराष्ट्रभर फिरून राज्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून केलेले आहे. तसेच त्यांना सन्मानपूर्वक स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन व मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या दिवशी ध्वनजारोहनासाठी नित्य नियमाने विविध संस्था, शासकिय कार्यालये, शाळा, महाविद्यालय इ. ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्याचा सन्मान त्यांना दिला जातो हे सर्वांत जास्त अभिमान वाटणारी बाब आहे. सेना मेडल कॅप्टन नंदकुमार जगताप त्यांच्या संपूर्ण सेवा कालावधीत स्वावलंबी होते व ते आजही ते स्वावलंबी आहेत ते स्वत:चे सर्व कामं स्वत: करतात ते इतर घरातील एकाही सदस्याला करु देत नाहीत ही अतिशय प्रसंसनीय बाब आहे. सेना मेडल कॅप्टन नंदकुमार जगताप आजही सह्याद्री माऊंटनिअरिंग फाऊंडेशनच्या माध्यमातून नवतरुणाईला गिर्याराहेनाचे धडे देत आहेत. एक अष्टपैलू व्यक्तीमत्व कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे सेना मेडल कॅप्टन नंदकुमार जगताप यांच्याकडं पाहिलं की लक्षात येतं. सैतान की लाल दिवार या नावाने प्रसिध्द असलेला उत्तराखंड मधील थलायसागर हा ६९०४ मीटर उंचीचा पर्वतदेखील त्यांनी सर केला आहे. हा पर्वत अतिशय खडतर असा पर्वत आहे, याचे शिखर अतियश सरळ व खडे असल्याने हा पर्वत सर करण्यासाठी सहजासहजी कोणीही धजावत नाही, सदरील पर्वत सर करण्यासाठी १९८८ साली तीन कोरीयन पर्वतारोहक गेले होते मात्र ते परत येवू शकले नाहीत त्यामुळे यानंतर या पर्वतावर सर करण्यासाठी कोणीही हिम्मत केली नाही, सेना मेडल कॅप्टन नंदकुमार जगताप यांची टीम याला अपवाद आहे, त्यांनी हा पर्वत सर करुन विजय मिळवला ही खरोखरंच अभिनंदनीय बाब आहे. मृत्यूला आव्हान देत जीवनातील सर्वोत्कृष्ट कामगिरी सेना मेडल कॅप्टन नंदकुमार जगताप यांनी करुन जगातील सर्वांत उंच असणारा माऊंट एव्हरेस्ट पर्वत यशस्वीरित्या सर करुन अखेर तिरंगा फडकवलाच ही देशासाठी अत्यंत सर्वोत्कृष्ट अभिमानाने मान उंचावणारी बाब आहे. अंबाजोगाई येथील शिवजागर प्रतिष्ठाणने त्यांच्या या गौरवशाली कामगिरीबाबत त्यांच्या मातोश्री राधाबाई जगताप यांना राजमाता जिजाऊ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. या कार्यक्रमासाठी जेष्ठ समाजसेविका मेधा पाटकर उपस्थित होत्या. या गौरव सोहळयाबाबत नंदकुमार जगताप म्हणतात की, माझ्या आईला पुरस्कार मिळाला म्हणजे माझं जीवन खरंच सार्थकी ठरलं. सेना मेडल कॅप्टन नंदकुमार जगताप यांच्या कार्याचा लेखाजोखा आजपावेतो संपूर्ण देशातील मराठी, हिंदी व इंग्रजी वृत्तपत्रांनी मांडला आहे व त्यांच्या कार्याचा आढावा व दखल अनेक प्रिंट मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडीयांनीही घेतली आहे. बर्फाच्छादित असणारा गोरीचीन पर्वत सर करुन सेना मेडल कॅप्टन नंदकुमार जगताप व टीमने संबंध देशाची मान उंचावली आहे हे अत्यंत महत्वाचे आहे. या यशस्वी कामगिरी बद्दल तत्कालीन कर्नल एल.सी. पटनायक यांच्या हस्ते सेना मेडल कॅप्टन नंदकुमार जगताप यांचा गौरव करण्यात आला होता. आजही आपण बॉर्डर सिनेमा पाहतांना अंगावर शहारे आणणारे प्रसंग आपण पाहतो पण प्रत्यक्ष जवान तशा प्रकारची जीवन जगत असतात ही बाब खरंच देशातील नागरीकांसाठी अभिमान वाटावा अशी आहे. आज भारतीय सैन्यातील जवानांमुळे आपण आज सुखाचे दोन घास खाऊ शकतो व रात्रीची झोप शांततेत पूर्ण करु शकतो याचां खरंच सर्वांनी विचार करायला हवा व जे निवृत्त जवान आहे त्यांच्याप्रती अभिमान ठेवावा व त्यांना सन्मानपूर्वक प्रथम प्राधान्याने वागणूक द्यावी. आपल्याला आठवडयातून रविवारची सुट्टी असते पण भारतीय जवानांना केव्हा केव्हा वर्षभर सुध्दा सुट्टी मिळत नाही व ते आपल्या परिवारास भेटू शकत नाहीत हा किती मोठा त्याग आपले भारतीय जवान करत असतात त्यामुळे त्यांचे स्थान आपल्या जीवनात एक वेगळंच असायला हवं. सेना मेडल कॅप्टन नंदकुमार जगताप यांच्या आयुष्यात सर्वार्थाने साथ देणारी त्यांची अर्धांगिणी सौ. चंद्रवंदन जगताप यांचे खूप मोठे योगदान त्यांच्या आयुष्यात आहे असं सेना मेडल कॅप्टन नंदकुमार जगताप यांनी दैनिक शिवजागर टीमशी बोलतांना सांगितलं. त्या सोबतीला होत्या म्हणूनच मी एवढं यशाच्या शिखराव पोहोचलो अशी भावना त्यांनी बोलतांना व्यक्त केली. जेवढी मोठी स्वप्‍नं असतात तेवढी मोठी ताकद ती पाहिलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी लागते व संपूर्ण आयुष्य त्यासाठी खर्ची करावं लागतं आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यास तेवढा मोठा त्यागही करावा लागतो या गोष्टी सेना मेडल कॅप्टन नंदकुमार जगताप यांनी स्वत: आयुष्यात केल्या असल्यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा प्रभाव सेना मेडल कॅप्टन नंदकुमार जगताप यांच्यावर आहे व ते छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतात त्यामुळं त्यांनी कष्टाची जाणीव व सत्याची कास कधीच सोडली नाही. जीवनात हवं ते कधीच मिळत नाही पण जे हवं आहे ते मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न जर केले तर ते नक्कीच मिळते हे सत्य आहे असे त्यांचे विचार आहेत. सेना मेडल कॅप्टन नंदकुमार जगताप यांना त्यांच्या पुढील आयुष्यात जे मिळवायचं आहे ते तर त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून मिळणारच आहे शिवाय त्यांना पुढील वाटचालीसाठी दैनिक शिवाजागर टीमच्या वतीने उदंड शुभेच्छा !

- दैनिक शिवजागर टीम, महाराष्ट्र राज्य

 

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी