ॲड. शंकर चव्हाण परिवर्तनवादी नेतृत्व
परळी विधानसभा मतदारसंघात एक नवं परिवर्तनवादी, केवळ विकासात्मक धोरण असणारं गतिशिल विचाराचं वादळ आता परळी मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलं आहे. ज्याच्या अंगी समाजपरिवर्तन करण्याची ताकद व उच्च विचारणसणी असणारं अष्टपैलू उमदं व्यक्तीमत्व म्हणजे ॲड. शंकर चव्हाण. स्व. लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेब व स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या सामाजिक, राजकीय कारकीर्दीचा ॲड. शंकर चव्हाण यांच्यावर प्रभाव असल्यामुळे सामाजिक जीवनात सर्वसामान्यांच्या पावलो पावली काय समस्या, अडीअडचणी असतात याची त्यांना तंतोतंत जाणीव आहे. व्यवस्था कशी असायला हवी व त्याला तंत्रज्ञानाची जोड कशी देता येईल याबाबत त्यांचा हात कोणीच धरु शकरणार नाही असं म्हटलं तर वावगं ठरु नये. दुरदृष्टी असणारं व विकासात्मक धोरणाची मशाल हाती घेऊन अंधाऱ्या वाटेने हा एकटा निघालेला तरुण त्याच्यासोबत परळी मतदार संघातील तरुणाई सोबत असल्यास ॲड. शंकर चव्हाण परळी मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलून टाकतील असं यावरुन लक्षात येते. वकीली, पत्रकारीता, सामाजिक, राजकीय, तंत्रज्ञान, समुपदेशन, कला इ. विविध क्षेत्रात आपली छाप उमटवणा...