ॲड. शंकर चव्हाण परिवर्तनवादी नेतृत्व

 

परळी विधानसभा मतदारसंघात एक नवं परिवर्तनवादी, केवळ विकासात्मक धोरण असणारं गतिशिल विचाराचं वादळ आता परळी मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलं आहे. ज्याच्या अंगी समाजपरिवर्तन करण्याची ताकद व उच्च विचारणसणी असणारं अष्टपैलू उमदं व्यक्तीमत्व म्हणजे ॲड. शंकर चव्हाण. स्व. लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेब व स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या सामाजिक, राजकीय कारकीर्दीचा ॲड. शंकर चव्हाण यांच्यावर प्रभाव असल्यामुळे सामाजिक जीवनात सर्वसामान्यांच्या पावलो पावली काय समस्या, अडीअडचणी असतात याची त्यांना तंतोतंत जाणीव आहे. व्यवस्था कशी असायला हवी व त्याला तंत्रज्ञानाची जोड कशी देता येईल याबाबत त्यांचा हात कोणीच धरु शकरणार नाही असं म्हटलं तर वावगं ठरु नये. दुरदृष्टी असणारं व विकासात्मक धोरणाची मशाल हाती घेऊन अंधाऱ्या वाटेने हा एकटा निघालेला तरुण त्याच्यासोबत परळी मतदार संघातील तरुणाई सोबत असल्यास ॲड. शंकर चव्हाण परळी मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलून टाकतील असं यावरुन लक्षात येते. वकीली, पत्रकारीता, सामाजिक, राजकीय, तंत्रज्ञान, समुपदेशन, कला इ. विविध क्षेत्रात आपली छाप उमटवणारं एक अष्टपैलू व्यक्तीमत्व कसं असावं हे ॲड. शंकर चव्हाण यांच्याकडं पाहिलं की लक्षात येतं. कष्टाची जाणीव व सत्याची कास धरुन चालणारे ॲड. शंकर चव्हाण यांच्यामुळे युवकांना नक्कीच प्रेरणा मिळते हे नाकरता येत नाही. तरुणांना रोजगार, शेतीमालाला कायमस्वरुपी हमीभाव व महिलांना संरक्षण हाच ध्यास त्यांनी आता हाती घेतला आहे. एक सच्चा व स्वच्छ प्रतिमेचा सर्वसामान्यांच्या हक्काचं व्यक्तीमत्व म्हणून परळी मतदार संघातील जनतेनं त्यांना स्विकारलं आहे व येणाऱ्या काळात परळी शहराला स्मार्ट सिटी व आयटी हब, तसेच परळी तालुक्यातील आणि मतदारसंघात येणाऱ्या तालुक्यातील गावांना स्मार्ट व्हिलेज बनवनं हा त्यांच्या निवडणुकीतील विजयानंतरचा प्रमुख अजेंडा आहे. शिवाय यापुढे शेतकऱ्यांना हमीभावासाठी कधीही रस्त्यावर उतरुन आंदोलन व उपोषणास बसण्याची वेळच येऊन नये यासाठी ॲड. शंकर चव्हाण हे प्रामुख्यानं प्रयत्न करणार आहेत. महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे व त्यांच्यावरील अत्याचार कायमचे थांबले पाहिजेत याासाठी सकारात्मक प्रयत्न करुन त्यावर कायमस्वरुपती तोडगा निघाला पाहिजे यासाठी कायद्याच्या चौकटीत आणखीण कडक कायदे कसे करता येतील याबाबत शासनदरबारी पाठपुरावा करुन येणाऱ्या काळात हे सर्व थांबलं पाहिजे यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याबाबतचे त्यांचं धोरण दिसून येते. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हातात तलवारी, कोयते, पिस्तुलं न दिसता येणाऱ्या काळात परळी मतदासर संघातील युवकांच्या हाती पुस्तकं, कॉम्प्युटर दिसतील व युवा परिवर्तनाची वैचारिक परळी तसेच भयमुक्त परळी असेल असा त्यांनी पक्का निर्धार केल्याचे दिसून येते.

गतिशिल विचाराचं जनतेच्या मनातलं नेतृत्व 

ॲड. शंकर चव्हाण हे जनतेच्या मनातलं दुरदृष्टी असणारं तरुण तडफदार उच्चशिक्षीत व्यक्तीमत्व आहे. विविध क्षेत्रातील त्यांना अभ्यास असल्यामुळं ते युवकांसाठी प्रेरणादायी आहेत. आयटी क्षेत्रात, वकीली क्षेत्रात, पत्रकारीता क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात व राजकीय क्षेत्रात त्यांचं खुप मोठं योगदान आहे. गेल्या अनेक वर्षापासन चळवळीतलं एक ठळक नाव म्हणून त्यांनी ठसा उमलटवला आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक वर्षांपासूनचा लिखाणाच्या माध्यमातून त्यांचा लढा कायम अविस्मरणीय राहिला आहे. त्यांचा विविध क्षेत्रातील असणारा अनुभव त्यांनी त्याचा वापर समाजासाठी केला असल्यामुळे त्यांना तरुणाई मोठया प्रमाणात सकारात्मक प्रतिसात देत आहे. परळी मतदासंघाला स्वच्छ प्रतिमेचा व गतिशिल परिवर्तनवादी विचाराच्या नेत्याची आवश्यकता असल्यामुळं तरुणाईनं ॲड. शंकर चव्हाण यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून डोक्यावर नाही तर डोक्यात घेतलं आहे त्यामुळं येणाऱ्या काळात परिवर्तन तर होणारच आहे असा अर्थ यावरुन लागतो.

दुरदृष्टी असणारं विकासात्मक धोरण असणारं संयमी व्यक्तीमत्व…

कोणत्याही क्षेत्रात जर बदल घडवायचा असेल तर त्यासाठी महत्वाची विचारधारा असणारं शस्त्र असावं लांगतं आणि जोपर्यंत असं शस्त्र जवळ नसेल तोपर्यंत कसल्याही प्रकारचा बदल होणारच नाही ही शाश्वत बाब आहे. परंतू ॲड. शंकर चव्हाण यांच्या अंगी असणारा सर्वश्रेष्ठ गुण म्हणजे दुरदृष्टी. विकासात्मक धोरण असणारं युवा तडफदार व्यक्तीमत्व, सर्वांगिण विकासाठी दुरदृष्टी वादळ आता परिवर्तन घडवल्याशिवाय शांत बसणार नाही असंच वाटतं. ॲड. शंकर चव्हाण यांनी परळी विधानसभा मतदार संघातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्‍यांनी परिवर्तनाची चळवळ उभी केली आहे व आता प्रत्येक पाऊल परळी मतदाससंघाच्या विकासासाठीच असेल असं त्यांनी ठाम केलं आहे. समाजपरिवर्तन घडवण्यासाठी त्यांची तळमळ व उर्मी त्यांना शांत बसू देत नाही. त्यांना गरीबीची, कष्टाची व जबाबदारीची जाणीव असल्यामुळे ते कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व न करता कायम त्यांचे पाय जमीनीवर असल्याचे त्यांच्या व्यक्तीमत्वातून दिसून येते.

सर्वसामान्य कुटूंबातील शेतकरीपुत्र 

ॲड. शंकर चव्हाण हे परळी विधानसभा मतदारसंघतील व अंबाजोगाई तालुक्यातील मुळ नांदगाव या गावचे रहिवाशी आहेत. ते सध्या वकीली क्षेत्रात कार्यरत असून ते सर्वाधिक वाचकांची पसंती असलेलं दैनिक शिवजागर या मराठी वर्तमानपत्राचे, इन्फोडॅड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या आयटी कंपनीचे व विश्वनाथ फाऊंडेशन या संस्थेचे ते संस्थापक आहेत. त्यांचे पहिले ते सातवी पर्यंतचे शिक्षण हे नांदगाव येथील जिल्हा परिषद शाळेत झालं, त्यांतर आठवीचे शिक्षण हे पुरुषोत्तम दादा सोनवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सारणी (आ.) येथे झाले. त्यानंतर इयत्ता नववी ते दहावी पर्यंतचे शिक्षण श्री योगेश्वरी नूतन विदयालय अंबाजोगाई येथे झाले, त्यानंतर इयत्ता अकरावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण स्वामी रामानंद तीर्थ महाविदयालय अंबाजोगाई येथे झाले, त्यानंतर त्यांनी एमबीए केले. काही काळ त्यांनी अंबाजोगाई या शहरात वास्तव्यास राहून संगणक क्षेत्रात विविध व्यवसाय केले. त्यानंतर ते काही काळ जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर येथे शासकीय सेवेतही कार्यरत होते. त्यांनंतर त्यांनी विधी शाखेची पदवी घेऊन आता जिल्हा व सत्र नयायालय लातूर, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर इ. ठिकाणी वकील म्हणून कार्यरत आहेत. एक शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीपुत्र आज निवडणुकीसाठी लढतोय, गरीब घरातील एक सर्वसामान्य युवक आमदर होणार व परळी विधानसभा मतदारसंघातील जनतेला दाखवलेल्या स्वप्नांना साकार करणार असा आत्मविश्वास मतदार संघातील जतनेमध्ये दिसून येत आहे.

भयमुक्त परळी व हातात कोयते नकोत तर हाती पुस्तकं व कॉम्प्युटर देऊन वैचारिक परळी करणारच …

उद्याच्या नव्या भारताचा कणा ही तरुण पिढी असते. युवकांच्या वैचारिक पातळीवर उदयाच्या नव्या देशाचं भवितव्य असतं. उदयाचा नवा भारत देश हा तरुणांच्या विचारांनी बदलणारं चित्र स्पष्ट होत असतं त्यामुळे तरुणांच्या हाती कोयता देऊन त्यांना रक्तपाताच्या दिशेने वाटचाल करायला लावणं किंवा त्यांना प्रवृत्त करणं हे कितपत योग्य ? राजकारण करा पण इतक्याही खालच्या पातळीवर जाऊन नको असं ॲड. शंकर चव्हाण यांनी व्यक्त केलेलं परखड मत आहे. येणाऱ्या काळात परळीत असलेली दहशत व तरुणांच्या हाती कोयते-कुऱ्हाडी नकोत तर हाती कॉम्प्युटर व पुस्तकं घेऊन मस्तकं सशक्त करण्याचं धोरण ॲड. शंकर चव्हाण यांनी आखलं आहे. पुस्तकं वाचून अधिकारी घडतात, साहित्यीक, कवी, विचारवंत घडतात, सुपीक विचारसणीचे लोकप्रतिनिधी घडतात त्यामुळे येणाऱ्या काळात विचार व संस्कार तरुणाईवर ‍झाले पाहिजेत यासाठी प्रामुख्याने ते खटाटोप करणार असल्याचं त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे. 

ना सत्तेसाठी, ना पदासाठी ॲड. शंकर चव्हाण परळी विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी…

मतदारसंघाच्या परिवर्तनासाठी व फक्त आणि फक्त विकासासाठी होत असलेली धडपड ॲड. शंकर चव्हाण यांच्या व्यक्तीमत्वातून दिसून येत आहे. परिवर्तन होण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या युवा उमद्या नेतृत्वाला मतदारसंघात तरुणाईचा मोठया प्रमाणात पाठींबा दिसून येत आहे. परिवर्तन घडवून आणण्यासाठी तळमळ लक्षात घेता त्यांना ना सत्ता हवी, ना पद हवं त्यांना फक्त आणि फक्त परळी मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करायचा आहे हेच केवळ यातून स्पष्ट होते. मात्र हातात पावर असल्याशिवाय व निर्णय घेण्यासाठी हातात सत्ता असायला हवी त्यासाठीच त्यांनी सुरु केलेला हा प्रामाणिक प्रयत्न व निर्मळ हेतू यावरुन लक्षात येतो.

महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे ॲड शंकर चव्हाण पाईक…

सर्वच महापुरषांचा आदर अंतर्मनातून ॲड. शंकर चव्हाण करतात. हा महाराष्ट्र परिवर्तनवादी महापुरुषांच्या विचारांचा आहे. हा महाराष्ट्र महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आहे, हा महाराष्ट्र स्त्रियांचा आदर कसा करावा याची शिकवण देणाऱ्या व स्वराज्य निर्माण करुन त्याचं मॅनेजमेंट कसं असावं आणि रयतेचं राज्य कसं असावं याचं उत्तम उदाहरण असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या विचारांचा आहे. त्यामुळे राजकारण वगळता केवळ आणि केवळ महापुरुषांच्या विचारांचे पाईक होऊन निष्ठेने निव्वळ समाजसेवा करुन जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडून त्यांना योग्य न्याय मिळवून देणे हा स्पष्ट हेतू ॲड. शंकर चव्हाण यांचा आहे हेच यावरुन स्पष्ट होते.

तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची, पर्वा बी कुनाची…

मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा एक मावळा आहे त्यामुळे त्यांना समाजासाठी काही तरी देणे लागतो म्हणून मला समाजाने आजवर जे दिलं त्यांची परतफेड करण्यासाठी माझ्या वाटेत कितीही संकटं आली किंवा काटया कुटयांचा रस्ता आला तरी मी आता मागे हटणार नाही, कशाचीही तमा न बाळगता, कुणाचीही पर्वा न करता परळी विधानसभा मतदार संघासाठी संपूर्ण ताकतीने परिवर्तन घडवणार व परळी विधानसभा मतदारसंघातील जनतेचा निर्धार पक्का असल्यामुळं मला आता कशाचीही भिती नाही. माझ्या आई-वडीलांची व परळी विधानसभा मतदारसंघातील जनतेची मला जोपर्यंत साथ आहे व त्यांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी जोपर्यंत आहे तोपर्यंत मला कशाचीही भिती व कुणाचीही पर्वा नाही असा ॲड. शंकर चव्हाण हे निर्भिडतेनं समाजासाठी संघर्ष करतांना दिसत आहेत.

परिवर्तनाचा नवा शिलेदार …

स्व. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब व स्व. लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या विचारांचा व राजकीय कारकिर्दीचा प्रभाव ॲड. शंकर चव्हाण यांच्यावर झालेला दिसून येतो. दोन्ही लोकनेत्यांनी ज्याप्रमाणे आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित केलं. त्यांच्या विचारांचा पाईक होऊन ॲड. शंकर चव्हाण हे सुध्दा दोन्ही लोकनेत्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन समाजासाठी काहीतरी नवनिर्माण करण्यासाठी प्रामाणिक धडपड करत आसल्याचं यावरुन दिसून येतं. नव्या पर्वाचा नवा शिलेदार म्हणून परळी मतदार संघातील जनतेनं त्यांना स्विकारलं तर आहेच शिवाय परिवर्तनाचा नवा शिलेदार व परिवर्तनवादी चळवळीचा नेता म्हणून त्यांची नवी ओळख होत असतांना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांची ग्रेट भेट …

महाराष्ट्राच्या राजकारणातील अष्टपैलू व्यक्तीमत्व असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांची मुंबई येथे जाऊन ॲड. शंकर चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तुतारी या चिन्हावर निवडणुक लढवण्याबाबत इच्छा खा. शरदचंद्र पवार यांच्याकडे व्यक्त केली होती. सर्व जाती धर्मांना एकत्रीत घेऊन आजही तरुणाईला लाजवेल असं व्यक्तीमत्व खा. शरदचंद्र पवार यांचं आहे. ते नवतरुणांना नेमीच संधी देत असतात त्यामुळे ॲड. शंकर चव्हाण या युवा लढवय्या तरुणास खा. शरद पवार नक्कीच संधी देतील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणुक लढण्यासाठी उमेदवारी देतील या हेतूने ॲड. शंकर चव्हाण हे सुध्दा इच्छुकांच्या यादीत आजही आहेत व परळी मतदार संघात एक वेगळेपण जपलेलं नेतृत्व म्हणून देखील चर्चेत आहेत. खा. शरदचंद्र पवार यांची भेट झाल्यापासून ॲड. शंकर चव्हाण यांच्या मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटींना वेग आला आहे. सध्या परळी मतदार संघातील जनतेकडून ॲड. शंकर चव्हाण यांच्याकडे स्वच्छ प्रतिमेचा माणूस म्हणून सकारात्मकतेनं पाहिलं जात आहे. प्रत्येक कृती व प्रत्येक पाऊल आता परळी मतदार संघाच्या विकासासाठीच असं सकारात्मक धोरण घेऊन ॲङ शंकर चव्हाण यांनी परळी विधानसभा निवडणुक लढण्याचं मिशन हाती घेतलं असल्याचं पहावयास मिळत आहे. विकासाचा निर्धार व विजयाचा सकंल्प केल्याचाही उल्लेख सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेसमोर ॲङ चव्हाण यांनी मांडला आहे.

 संपादक - दैनिक शिवजगार बीड, (महाराष्ट्र राज्य)

 

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?