बळीराजाची होतेय दिशाभुल अन् सरकारचं चालूय ‘आठ हात लाकूड, नऊ हात धलपी’ काढण्याचं काम

बळीराजाची होतेय दिशाभुल अन् सरकारचं चालूय ‘आठ हात लाकूड, नऊ हात धलपी’ काढण्याचं काम'


शेतकऱ्यांना , कामगारांना सर्वसामान्य भोळयाभाबडया जनतेला खोटी आश्वासनं देऊन गेली पन्नास वर्षे पुढाऱ्यांनी गादया मिळावल्या. विकासाच्या नावचा पत्ताच नाही, निवडणुक जवळ आली की नेतेमंडळीचा शहणपणा जागा होतो. गल्ली बोळांपासून ते झोपडपट्यांपर्यंत पायातली जोडे झिजवुन ही लोकं घर ना घर पिंजूनमतं दयाच्या नावाखाली काढतात. निवडुन आल्यानंतर निवडणुकीपुर्वीची गत म्हणजे निवडणुकीपुर्वी मतं मागायला येणारी पुढारी मंडळी ही तेहतीस कोटी देवांची मातागाय’ (Cow) च्या रुपात येतात अन् निवडणुकीत विजय प्राप्त झाल्यानंतर त्यांचेवाघाच्या’(Tiger) रुपात प्रवेश होतो. मत मागायला आपलेल्या नेत्यामध्ये जी नम्रता असते ती निवडणुकीत निवडून दिलेल्या नेत्यामध्ये नसते, असते ती फक्त उध्दट डरकाळी. असो, गेले ते दिवस अन् राहिल्या त्या फक्त आठवणी, अशा गोष्टींच्या इतिहासाचा अभ्यास करण्यात काही अर्थ नाही. आत्ता वेळ आहे वर्तमानाकाळातल्या समस्यांवर लढण्याची. जिकडं पहावं, जिकडं जावं तिकडं भ्रष्टाचाराने वातावरण तुडूंब भरलेलं आहे. असं वातावरण पाहून असं वाटायला लागलं आहे की, लोकशाही पेक्षा हुकूमशाही राजवटच असायला हवी होती. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिल्यापासून प्रत्येकाची मनमानी, सरकारचा गलथान कारभार, मंत्र्यांचे चुकीचे निर्णय तेही स्वत:च्या जातीसाठी घेतलेले निर्णय. यामुळेच सर्वसामान्य जनता शेतकरी-कामगारांच्या विकासाचं शुन्य माप अन् पाप वाटयाला आलं आहे. गुण्यागोविंदान नांदणारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीतील जनता अन् आत्ताच्या भ्रष्ट सरकारच्या राजवटीतील जनता यांच्या चेह-यातील समाधानाचे प्रमाणात जमीन आसमानचा फरक दिसतोय. तरुण पिढी ही व्यसनाच्या जवळपास ऐंशी ट्क्के आहरी गेलेली आहे. स्त्रियांवरील अत्याचार वाढत आहेत, चोऱ्या, खून, अपघातांचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यात भर म्हणजे दुष्काळाची, दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाडयातील जनतेच्या दृष्टीने सरकारचं धोरण हे शंभर ट्क्के चुकीचं आहे. कारण मराठवडयातील जनतेची तंतोतंत दिशाभूल होत आहे. ‘आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू देज्या अपेक्षेनं आपण सरकार कडून विकासाच्या धोरणाची अपेक्षा ठेवतो. त्याचं गांभिर्य आत्ताच्या सरकारला नाही अन् यापूर्वीच्या सरकारला तर मुळीच नव्हतं. स्वत:ची घरं भरण्याच्या पलिकडं गेल्या पन्नास वर्षाच्या काळात यांनी दुसरं काहीच कामं केलं नाही. जेवढी आश्वासनं दिली त्याचं गाठोडं बांधून मंत्रालयाच्या, शासकिय कार्यालयाच्या कापाटामध्ये धुळखात पडलं आहे. सरकारच्या योजनेचा पुरेपुर फायदा शेतकऱ्यांना झाला ना सर्वसामान्यांना, सवलतीच्या नावाखाली, निवेदेच्या नावाखाली भ्रष्टाचार करणं हे कितपत योग्य ? सर्वच गोष्टी पुराव्याने साध्य होतात असं नाही. पणमांजर दुध पितांना स्वत:चे डोळे झाकून दुध पितं त्याला वाटतं आपल्याला कोणी पहात नाही, पण स्वत:चे डोळे बंद असताना मात्र जनता उघडया पाहतेय याचं भान नसतं . मराठवाडामध्ये पडलेला दुष्काळ हा 1972 च्या ओल्या दुष्काळापेक्षा भीषण आहे. तेंव्हा खायला अन्न नव्हतं पण पाणी होतं. आत्ताचा दुष्काळ हा अन्न आहे पण पाणी नाही. उलट परिस्थिती असतांना अशा वातावरणात शेतकरी कामगार हा कसा जिवंत राहिलं.? सावकाराचं, बँकेचं इतर घटकांपासून घेतलेल्या कर्जाचं ओझं डोक्यावर घेऊन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणं हल्ली सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना कामगारांना पेलवणारं आहे. शेकडो पुढारी, मंत्री, सिने कलाकार मराठवाडयामध्ये आले. मंत्र्यांनी पाहणी केली, पुढाऱ्यांनी आश्वासनं दिली अन् इतरांनी तुटपुंज्या मदतीचा तीळ हातावर ठेऊन गेले. भारत देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्येचा आकडा हा महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मराठवाडयाचा प्रथम क्रमांक लागतो. सातबारा कोरा करण्या ऐवजी, विद्युत बिलं माफ करण्याऐवजी बँकेची कर्ज माफ करण्याऐवजी हे भलतं शासन विरोधक एकमेकांमध्येच भांडण्यात, एकमेकांचे घोटाळे उघड करण्यात स्वत:चा जनतेचा अमूल्य वेळ वाया घालवून दिशाभूल करण्याचं काम करत आहे. सत्ताधाऱ्यांना कधी मिळाल्यासारंख हावरटासारखं मंत्री वागू लागले आहेत. शेतकऱ्यांची शेतमजूरांची टिंगल केल्यासरखं वागत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना त्यांचा आधार गमवावा लागत आहे. विश्वास बसत नाही एकेकाळी साऱ्या देशाला अन्न पुरवठा करणारा पोशिंदा आज स्वत:ला संपवत आहे. मात्र मंत्री महोदय हे शेतकऱ्यांसाठी एवढे पॅकेज देऊ, तेवढे देऊ अशी अश्वासनं अंमलबजावणीविरहित देऊ लागल्याने सरळ सरळ दिशाभूलच करत आहेत. यांच्या हातामध्ये आठ हात लाकूड दिलं आणि हे सत्ताधारी त्याच्या नऊ हात धलप्या काढण्याच्या विचाराने शेतकऱ्यांची, शेतमजूरांची सर्वसामान्यांची जणू फसवणूकच करत आहेत. ‘आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळअशी गत झाल्यामुळे ढगांकडं पाहून बळीराजा लाखोंचा पोशिंदा हापावसा पावसा ये रेम्हणत पावसाची आतूरतेनं वाट पाहात आहे. पाण्याची चिंता ही वाढतच आहे. कोसा कोसावरुन शाळकरी मुलांना, महिलांना, वृध्दांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गुरा ढोरांना पाणी प्यायला मुबलक नाही, चारा नाही त्यामुळं जनावरं आपले प्राण सोडू लागले. अन् पुढारी म्हणतात कोटी कोटीचे पॅकेज जाहिर करु, अरे सरकार चालवणाऱ्यांनो अशी अश्वासनं देण्यापेक्षा, एसीत बसून गोफन फिरवण्यापेक्षा मराठवाडयात येऊन आणवाणी पायांन चालून खंरच जनतेचे काय हाल होत आहेत याचं गांभिर्य लक्षात घेऊन उपाययोजना करा असं जनता ओरडून ओरडून तुम्हाला सांगत आहे. दुष्काळचा बाऊ करुन सरकारचं काम असं चालू आहे की, आम्ही खरंच सर्वसामान्यांसाठी काहीतरी करतोय याचंआपलाच बोल अन् आपलाच ढोलवाजवून सांगण्याचं काम करुन निव्वळ जनतेची उघड उघड फसवणूक करत आहेत. मोदी सरकारच्याअच्छे दिनच्या मायाजालावर भोळया भाबडया जनतेनं विश्वास ठेवला अन् एक हाती सत्ता हातात दिली पण यांना ते जमलं नाही शेवटीसात सुगरणी अन् भाजी आळणीअसा प्रकार झाल्याने बळीराजाच्या सर्वसामान्यांच्या हाती नैराश्याचं ताट दिलं गेलं आहे. व्यवस्थापनाअभावी योग्य मदतीपासून शेतकरी कामगार वर्ग भिकेला लागून आत्महत्येच्या वाटेनं जात आहे. आणि असंच जर दिवसें दिवस घडत राहिलं तर सगळयांना उपासमारीची वेळ नक्कीच येईल यात तीळमात्र शंक्काच नाही.

- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..