मी खुप बिझी आहे ?
मी खुप बिझी आहे ? प्रत्येकाच्या तोंडून हे वाक्य आपण बहुदा ऐकतोच. धकाधकीच्या जीवनात व स्पर्धेच्या युगात असे शब्द पावला पावलावर आपण रोजच ऐकतो. बिझी होणं ही गोष्ट जेवढी बिझी वाटते तेवढी जास्त बिझी नाही. बिझी म्हणजे व्यस्त असणे हे किती सोपं वाटतं. पण बिझी शब्द कानावर पडला समजून जायचं समोरच्याकडं वेळ नाही. पण ही वेळ आपण स्वत:च स्वत:वर ओढून घेतली आहे असेच मी म्हणेन, धकाधकीचं जीवन आपण स्वत:च पायघडया टाकून निर्माण केलं आहे. स्पर्धेचं युग व शॉर्टकट आपण स्वत:च निर्माण केलेलं असल्यामुळे बिझी असण्याला सक्षम पर्याय आपण देवूच शकत नसल्यामुळे स्वत:चं जीवन सुंदर पध्दतीने जगण्यात आपण सक्षम वाटतंच नाहीत. जग बदलंत चाललं आहे. त्याप्रमाणे आपणही बदलतोय. पण नेमका काय बदल आपल्यामध्ये झालांय हे आपलं आपल्यालाच समजत नाही त्यामुळे आपल्या प्रगतीचा आलेख कुठे जातोय हेच कळेनासे झालं आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण बिझी असतो. मुळात बिझी हा शब्दा इंग्रजी, तो जास्त समजतो म्हणून पुन्हा पुन्हा तोच तोच शब्दप्रयोग. हे काय चाललंय ? काय करतोय आपण ? पळतोय पळतोय दिवसभर, राबराब राबतोय पैशांसाठी, सुख...