मी खुप बिझी आहे ?

मी खुप बिझी आहे ?

प्रत्येकाच्या तोंडून हे वाक्य आपण बहुदा ऐकतोच. धकाधकीच्या जीवनात व स्पर्धेच्या युगात असे शब्द पावला पावलावर आपण रोजच ऐकतो. बिझी होणं ही गोष्ट जेवढी बिझी वाटते तेवढी जास्त बिझी नाही. बिझी म्हणजे व्यस्त असणे हे किती सोपं वाटतं. पण बिझी शब्द कानावर पडला समजून जायचं समोरच्याकडं वेळ नाही. पण ही वेळ आपण स्वत:च स्वत:वर ओढून घेतली आहे असेच मी म्हणेन, धकाधकीचं जीवन आपण स्वत:च पायघडया टाकून निर्माण केलं आहे. स्पर्धेचं युग व शॉर्टकट आपण स्वत:च निर्माण केलेलं असल्यामुळे बिझी असण्याला सक्षम पर्याय आपण देवूच शकत नसल्यामुळे स्वत:चं जीवन सुंदर पध्दतीने जगण्यात आपण सक्षम वाटतंच नाहीत. जग बदलंत चाललं आहे. त्याप्रमाणे आपणही बदलतोय. पण नेमका काय बदल आपल्यामध्ये झालांय हे आपलं आपल्यालाच समजत नाही त्यामुळे आपल्या प्रगतीचा आलेख कुठे जातोय हेच कळेनासे झालं आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण बिझी असतो. मुळात बिझी हा शब्दा इंग्रजी, तो जास्त समजतो म्हणून पुन्हा पुन्हा तोच तोच शब्दप्रयोग. हे काय चाललंय ? काय करतोय आपण ? पळतोय पळतोय दिवसभर, राबराब राबतोय पैशांसाठी, सुखाच्या शोधात, तन, मन व भान विसरुन धावतोय का ? का ? का ? कशासाठी  ? कधी विचार केलांय स्वत:चा, कधी स्वत:ला वेळ दिलाय ? कधी स्वत:ची काळजी घेण्यासाठी वेळ काढलात, आरोग्यविषयी किती गंभीर आहोत आपण स्वत:च्या, याचा खोलात साधा विचार तरी कधी केलाय का ? जीवन ही फक्त जीवनात एकदाच मिळाणारी निसर्गाने वरदान दिलेली सुंदर कल्पना आहे. त्या कल्पनाशक्तीच्या जोरावरच जग प्रगती करु शकलं आहे. हे आपण नाकारु शकत नाही हेही तितकंच खरं आहे. हे लक्षात असू द्या. मला सांगायचा मुळ मुद्दा म्हणजे जीवन खुप सुंदर आहे. हे वाक्य फक्त वाचण्यासाठी, कवींच्या सुरात ऐकण्यासाठी नव्हे तर आमलात आणून संघर्षमय जीवनाला तोंड देऊन जगण्यासाठी छान वाटतं. लक्षात असू दया. सकाळी झोपेतून उठल्यापसून आपण घडयाळाच्या तालावर रोजच नाचतोय. रविवारची सुट्टी आपण आपल्या परिवारासोबत, मित्रांसोबत, लेकरांसोबत किंवा इतर आप्तेष्टांसोबत घालवत असू. पण हा बिझी नावाचा किडा डोक्यातून काढून कधी एक उनाड दिवस जगलाय का तुम्ही ? असं म्हणतात की असा उनाड दिवस जगल्याने आयुष्य पाच वर्षांनी वाढतं ? हे खरं असो अथवा नसो पण हया दिवसाच्या निमित्ताने का होईना स्वत:साठी वेळ तर नक्कीच मिळेल. या बिझी शेडयूल मध्ये स्वत:च्या कामात आपल्या परिवाराला वेळ देणं बऱ्याच जणांना जमत नाही. पण जेव्हा जमतं तेव्हा यांचे हात पाय थरथरायला लागतात, कोणाला अर्धांगवायू, कोणाला कसले तरी आजारपण, कोणाला एका जागेचं उठता येत नाही, कोणाला दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो. अशा आवस्थेत आपण आपल्या परिवाराला कसा काय वेळ देणार? सांगा ना ? लक्षात ठेवा हीच वेळ आहे. आपण फक्त विचार करत राहतो. आजचा दिवस जाऊ देऊ व आपल्या परिवाराला, मित्रांना उदयाच्या दिवशी वेळ देऊ, पण नाही मित्रांना असं उदया उदया करत कोणताचा दिवस उगवत नाही. मग जेंव्हा आयुष्य संपण्याची वेळ येते तेंव्हा आपले डोळे उघडलेले असतात. पण तेंव्हा मात्र वेळ निघूल गेलेली असते. पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. म्हणून म्हणतो चला आजपासूनच आपण सर्वजण ‘बिझी’ हा शब्द आपल्या शब्दसंग्रहामधून डिलीट करुया व नव्या विचाराने पॉझीटिव्ह थिंकींगचा उपयोग करुन आयुष्य सुंदर बनवुया. आत्ता खरंच आवडेल म्हणायला की, आयुष्य फार सुंदर आहे ! ते सुंदर जगलंच पाहिजे. मग म्हणा आता, नाऊ आय एम नॉट बिझी !!!

- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com

Comments

  1. Don't just make your life busy..... Rather make your life easy. अतिशय महत्त्वाचा संदेश. अभिनंदन

    ReplyDelete

Post a Comment

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..