भाजपचं नेमकं काय चुकलं ?

भाजपचं नेमकं काय चुकलं ?

सत्तेत असणाऱ्यांवर सत्तेत नसणारे तोफेतून बारुद उडवावा तशा टिकेच्या फैरी झाडत असतातच. मग सत्ता कोणाचीही असो, भारत असा एकमेव देश आहे जिथं नको त्याच गोष्टीला जास्त महत्व देऊन त्याचे महत्व वाढवले जाते. लक्षात ठेवा आपल्या देशामध्ये समाजकारणापेक्षा राजकारणालाच जास्त महत्व दिले जाते. सर्व जनता खाली माना घालून कळत नसल्यासारखं आपली अक्कल दुसऱ्या कोणाकडे गहाण ठेऊन, दोन मांसाच्या तुकडया पायी व हजार पाचशे रुपयांपायी आपले बहुमूल्य मत जे पवित्र दान करायचे असते ते विकून माणूसकिला काळीमा फासण्याचं काम आजवर करत आलीय. अशा प्रकारे माणूसकी विकून काय साध्य करणार कोणास ठाऊक ? भारतातील प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येक माणूस जातीने निराळा आहे, प्रत्येक माणूस विचाराने वेगळा आहे पण हाच मतदार लोकशाही मार्गाने सत्ता चुकीच्या हाती कसा काय देऊ शकतो हे त्याचं त्यालाच माहित. हे इंग्रज राजवट संपल्यानंतर पासून चालत आलेली परंपरा आहे, महत्वाचं म्हणजे हे तेवढेच दुर्देव आहे. सत्ता ही पैशांचा जोरावर मिळवण्याची सध्या भारत देशाला साथ लागली आहे आणि या साथीमध्ये भोळयाभाबडया नसलेल्या, कळत असून वळत नसलेल्या जनतेला दिवसा ढवळया मामा बनवन्याचं काम भारतीय जनता पक्षानं करुन दाखवलं आहे. मोदींच्या नावाचा जयघोष करणारेच आता मोदींना शिव्या घालण्याचं काम करत आहेत. मोदी देशातील काळा पैसा बाहेर काढणार होते, मोदी देशातील जनतेला प्रत्येकाला घर देणार होते, प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये देणार होते, मोदी परदेशातील भारतातला काळा पैसा भारतात परत आणून भारताची गरीबी हटवणार होते, मोदी अमेरिकेपेक्षा कितीतरी पटीने भारत देश डिजीटल करणार होते, भारत देश महसत्ता बनवनार होते वगैरे वगैरे. पण तसं काही झालेलं दिसत नाही. नोटबंदीमुळे सर्व जनता हैराण झाली हे जरी खरं असलं तर हे दु:ख पचवण्याचं सामर्थ्य भारतीय जनतेमध्ये आहे. पण सर्वात मोठं दु:ख्‍ म्हणजे मोदींनी दिलेलं एकही आश्वासन पाळलं नाही असे जनमत तयार झाले आहे. विरोधक टिकास्त्र काही थांबवत नाहीत. भारत देशात आणखी किती तरी अरबोपतींकडे काळा पैसा वेगवगळया स्वरुपात दडलेला आहे. तो काही बाहेर निघण्याचं नाव घेत नाही. सर्वात महत्वाची बाब म्हणजे  भारतीय जनता पक्षाने सत्तेत येण्यापूर्वी व सत्ता आल्यानंतर जाहिरात बाजीवर प्रचंड मोठया प्रमाणामध्ये खर्चाची उतरंड लावून धरली आहे. शासनाच्या प्रत्येक योजनेसोबत त्या योजनेच्या खर्चाच्या बरोबरीला म्हणजे दुप्पट प्रमाणात जाहिरातबाजीवर खर्चच खर्च होऊ लागल्याने त्यातल्या काही योजना कागदावरच राहिल्या. तसेच त्या योजना जनसामान्य ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्या पर्यंत पोहोचल्याच नाहीत. मुद्रासारख्या योजनांची तरुण नवयुवकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी ही योनजा आमलात आणली खरी पण बँकेत व राजकिय वशीला लावून हस्तक्षेप झाल्यामुळे गरजू व होतकरु युवक या लाभापासून आजही वंचीत आहेत. हे वास्तव आहे. महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वरज्य संस्था, महानगरपालिकांच्या निवडणुकी दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असणं हे अपयश आहे का ? असा सवाल उपस्थित होतोय. भारतीय जनता पार्टीने दिलेली आश्वासनं पाळली असती तर सर्वसामान्य जनतेला नोटबंदीमुळे झालेला फटका बसला नसता, मोदींचे व्हिजन, मिशन, त्यांचे विचार हे जनतेला सुरूवातीला पटले पण त्याचा प्रत्यक्षात मात्र काहीच परिणाम दिसून आला नसल्याने नेमके भाजपचे काय चुकले हे भारतीय जनता पक्षाला कळेनासे झाले आहे. पक्षांतर्गतच अविश्वास निर्माण होत  असल्याने मित्रपक्ष एकमेकांमध्ये भांडण करुन जनतेच्या विकासकामांकडे दुर्लक्ष करुन पाहात आहेत. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री हे सतत वादग्रस्त आहेत, कोणा मंत्र्यावर घोटाळयाचे आरोप चालूच आहेत. मी मी करणारे असे शब्द आणिखीनही जनतेला फेकत आहेत. असा प्रकार भाजप सत्तेत आल्यापासून सुरूच असल्याने सर्वसामान्य जातना प्रचंड नाराजी व्यक्त करत आहे. काँग्रेस मुक्त होण्यासाठी विविध शब्दप्रयोग करुन भाजपने कुठे नेऊन ठेवलाय भारत माझाकुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी जाहिरात बाजी केली होती. मात्र आता जनता भाजपलाच विचारतेय की, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा व कुठे नेऊन ठेवलाय भारत देश माझा अशी वेळ भाजपवर आली आहे. भाजपने काही चांगली कामं केली नाही असेही नाही पण निर्णय घेतांना खरंच चुकलंय भाजप. असा जनतेचा कौल आहे. सत्तेमध्ये असे काही मंत्री आहेत की त्यांना त्यांच्या खात्याची जबाबदारी पेलवत नाही व त्यांना त्यांच्या स्वत:च्या खात्याचा अभ्यास नाही त्यामुळे निर्णय घेण्यास भाजप कमी पडत आहे सध्या तरी असे वातावरण निर्माण झालेले दिसून येते.


शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com

Comments

Post a Comment

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..