मुख्यमंत्री यंदा पांडुरंगाच्या दर्शनाला पायी येणार ? दर्शनही वारकऱ्यांसोबतच घेणार ?
मुख्यमंत्री यंदा पांडुरंगाच्या दर्शनाला पायी येणार ? दर्शनही वारकऱ्यांसोबतच घेणार ? वारकऱ्यांच्या वर्दीत राजकिय गर्दी करावीशी म्हणतो त्याशिवाय परिवर्तनाची सर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. भाग एक मध्ये पांडुरंगाच्या प्रथम दर्शनाच्या व पुजेच्या मानाची प्रथा असावी की नसावी व कोस कोस वारकरी राज्या परराज्यातून दर्शनासाठी येतो व दरवर्षी मुख्यमंत्री मात्र लाल दिव्याच्या गाडीत (यंदा अपवाद) किंवा चार पात्याच्या फडफड करत हेलीकॉप्टरमधून येऊन दर्शनाचा व पुजेचा पहिला मान पटकावतात याविषयी होता. हा मान केव्हापासून दिला जातो ? का दिला जातो ? याचा इतिहास काय ? किंवा ही पुजा मुख्यमंत्री यांच्या हातूनच का ? असे बहुत मार्गी, विचारी व प्रश्नांनाही प्रश्नात टाकणारी काही प्रश्न आहेत, हे सहाजीकच आहे, परंतू याकडे न जाता, साधा आणि सरळ प्रश्न असा आहे की, खरंच यंदा परिवर्तन होईल का ? कोस कोस पायी महिनेच्या महिने पायी दिंडीमध्ये कशाचीही तमा न बाळगता वारकरी विठुरायाच्या दर्शनाला येतो, भक्तीच्या भुकेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगेतच उभा राहून बारा बारा वेळ देऊन तास दर्शन घेऊन तृत्प होऊन परतीच्या वाटेवर न...