मुख्यमंत्री यंदा पांडुरंगाच्या दर्शनाला पायी येणार ? दर्शनही वारकऱ्यांसोबतच घेणार ?


मुख्यमंत्री यंदा पांडुरंगाच्या दर्शनाला पायी येणार ?
दर्शनही वारकऱ्यांसोबतच घेणार ?

वारकऱ्यांच्या वर्दीत राजकिय गर्दी करावीशी म्हणतो त्याशिवाय परिवर्तनाची सर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. भाग एक मध्ये पांडुरंगाच्या प्रथम दर्शनाच्या व पुजेच्या मानाची प्रथा असावी की नसावी व कोस कोस वारकरी राज्या परराज्यातून दर्शनासाठी येतो व दरवर्षी मुख्यमंत्री मात्र लाल दिव्याच्या गाडीत (यंदा अपवाद) किंवा चार पात्याच्या फडफड करत हेलीकॉप्टरमधून येऊन दर्शनाचा व पुजेचा पहिला मान पटकावतात याविषयी होता. हा मान केव्हापासून दिला जातो ? का दिला जातो ? याचा इतिहास काय ? किंवा ही पुजा मुख्यमंत्री यांच्या हातूनच का ? असे बहुत मार्गी, विचारी व प्रश्नांनाही प्रश्नात टाकणारी काही प्रश्न आहेत, हे सहाजीकच आहे, परंतू याकडे न जाता, साधा आणि सरळ प्रश्न असा आहे की, खरंच यंदा परिवर्तन होईल का ? कोस कोस पायी महिनेच्या महिने पायी दिंडीमध्ये कशाचीही तमा न बाळगता वारकरी विठुरायाच्या दर्शनाला येतो, भक्तीच्या भुकेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगेतच उभा राहून बारा बारा वेळ देऊन तास दर्शन घेऊन तृत्प होऊन परतीच्या वाटेवर निघतो. 

आता थोंड परिवर्तनाचाच विषय आला आहे तर त्यावरही थोडासा प्रकाशझोत पडाता पडता पडावा, वारकऱ्यांच्या वर्दीतून राजकिय गर्दीत गर्दी करुन परिवर्तनाच्या सर्दीला थोडं दर्पन दाखवून प्रतिमा निखळ, उजळ व पुरोगामी असायला हवी असं प्रत्येक वारकऱ्याला वाटत आहे की, जसा लाल दिवा काढला, आश्वासनाचं …… दाखवलं तसं, पांडुरंगाच्या दर्शनासाठीही मुख्यमंत्री यंदा पायी दिंडीतून येणार का अशी सप्नं पुरोगामी महाराष्ट्रातील वारकऱ्यांना पडत असतांना मुख्यमंत्री यंदा वारकऱ्यांसोबतच रांगेतूनच दर्शन घेणार असा दृढ विश्वास वाटू लागला आहे. हे कितपत खरे किंवा खोटे,  मात्र यंदाच्या वर्षी ही प्रथा जर खरंच मुख्यमंत्र्यांनी मनावर घेऊन गर्दीतल्या माऊलींची मने जिंकण्याची तयारी दाखवली तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये वारकऱ्यांच्या मनात मुख्यमंत्री महोदयांनी घर कलेलं असेल हे मात्र नक्कीच. वारकरी महिनेच्या महिने, पायी आणवाणी चालत, उन, वारा, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता विठुरायाच्या दर्शनाला येऊ शकतो तर मुख्यमंत्र्यांना एक दोन दिवस पायी दिंडीत येऊन वारकऱ्यांसोबत महापुजेचा मान घ्यावा असं वारकऱ्यांच्या गर्दीला वाटत आहे. 

कदाचित पांडुरंगाच्या पहिल्या पुजेचा मान मुख्यमंत्र्यांच्या पदाला, खुर्चीला असेलही मग त्यावेळी विराजमान मुख्यमंत्री कोणीही असो, मात्र प्रथेमध्ये थोडासा पुरोगामी विचाराने बदल झाला तर नक्कीच अच्छे दिन कडे वाटचाल सुरू झालीय असेही या ठिकाणी आवर्जुन नमुद केलेले बरे वाटते, जसे व्हीआयपी पणा सोडून लाल दिव्याची एैसी की तैसी करुन सरकारने खरंच साधेपणाचं व परिवर्तनवादी विचाराचं आचरण करायला सुरूवात केली आहे हे प्रत्येकाला मान्य करावेच लागेल. स्वप्नं पडलंय खरं पाहुया खरं होतंय का ते पुढील भागात …

शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?