लवकर निर्णय घ्या !


लवकर निर्णय घ्या !

शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या करण्यात आपर्यंत किती तरी शेतकऱ्यांच्या म्होरक्यांनी आपले स्वार्थ साधले. आपल्या पोळया भाजून घेतल्या. शेतकरी नेते म्हणून जणू हे शास्त्रज्ञच झाले. पण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात व शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना पूर्ण करणयात या धूर्त शेतकरी नेत्यांना अपयश आले हे मान्य करावेच लागेल शिवाय ही शोकांतीका आपल्या राज्यात असल्याने शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्येच्या वाटेवर जातोय अशा सर्वच नेत्यांना याबाबत गांभिर्य नसल्याचे दिसून येते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गेली कित्येक दिवस अभ्यास करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे मात्र मुख्यमंत्री हे ठोस भूमिका घेण्यास तयार दिसत नसल्याने शेतकरी आता संपावर गेला असल्याने राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त होतांना दिसू लागला आहे. शेतकरी कधीच एवढा आक्रमक झाला नव्हता. आपर्यंत अन्याय व त्रास सहन करत आपला राग गिळून गप्प होता मात्र आता ही बाब सहनशिलतेल्या पलिकडे गेल्याने शेतकरी संप करत आहे. राज्य बंदचे चित्र चालू असतांना या अपयशी सरकारविरोधात एवढी जनता विरोध करत असल्याने या सरकारचे अपयश व निष्क्रीयत सरळ सरळ दिसून येते. विरोधक विरोध करत असतातच. आज भाजप सत्तेत आहे उदया नसेलही , पण भाजप पुन्हा सत्तेत असणाऱ्या सरकारला विरोध करणार नाही कशावरुन सत्ताधारी व विरोधक यांची सांगड असल्यामुळेच मनमानी करणाऱ्या कोणत्याही सत्ताधाऱ्यांना वेळीच आवर बसतो हे सत्य आहे. शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला एकच विनंती आहे की, बाबांनो आणखी शेतकऱ्यांचे बळी जाण्यापूर्वी काही तरी निर्णय लवकर घ्या. नाही तर खरंच जनता माफ करणार नाही तुम्हाला.

शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?