तरीही आत्महत्या थांबेनात …
तरीही आत्महत्या थांबेनात शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वच घटकांनी संकटाची दारे उघडी करुन ठेवली आहेत. खरा शेतकरी, शेतमजुर बिचारा लाभापासून वंचित तर सालो साल झाली आहेच. परंतू दैनंदीतन जीवनातील संकटं काही पाठ सोवडवेनात. शेतकरी गरीब का असतो ? या प्रश्नाचं उत्तर का शब्दा काढला की लगेच मिळतो. कारण शेतकरी हा गरीबच असतो. देश कृषीप्रधान अन साऱ्या देशाला जवगवणाराच आज भिकारी झाला आहे. शेतकऱ्यांच्या बाजून निवडणुका आल्यावरच सर्वजन त्यांच्या समस्यांचं भांडवल करुन खुर्च्या बळकावतात. शेतकरी विवंचेने दाद मागयला गेल्यावर त्याला त्याच्या पार्श्वभागावर लाथ मारुन मोकळया हाताने परत पाठवण्याची मालिका पांढऱ्या कपडयातील माणूसकी संपलेली गटारातील किडे करत असतात. अंह ! हा शब्दा सुध्दा खुप वजनाचा आहे. तो त्यांना वापरणेही योग्य नाही. कारण माणसातला माणूस आज संपलाय. तो कुठेतरी पैशांना पैसा जोडण्यात गुंतलाय. अन असा गुंतलाय की दुसऱ्याच्या मुंडीवर पाय ठेऊन, इतरांचे नुकसान करुन, गोलमाल करुन, अवैध मार्गाने, भ्रष्ट परंपरेचाच अवलंब करुन पैसा जोडण्याची तयारीला लागला असल्यानेच शेतकऱ्यांच्या नशिबी शेवटी गोटाच आहे. शेतकऱ्यांना ...