तरीही आत्महत्या थांबेनात …

तरीही आत्महत्या थांबेनात
शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वच घटकांनी संकटाची दारे उघडी करुन ठेवली आहेत. खरा शेतकरी, शेतमजुर बिचारा लाभापासून वंचित तर सालो साल झाली आहेच. परंतू दैनंदीतन जीवनातील संकटं काही पाठ सोवडवेनात. शेतकरी गरीब का असतो ? या प्रश्नाचं उत्तर का शब्दा काढला की लगेच मिळतो. कारण शेतकरी हा गरीबच असतो. देश कृषीप्रधान अन साऱ्या देशाला जवगवणाराच आज भिकारी झाला आहे. शेतकऱ्यांच्या बाजून निवडणुका आल्यावरच सर्वजन त्यांच्या समस्यांचं भांडवल करुन खुर्च्या बळकावतात. शेतकरी विवंचेने दाद मागयला गेल्यावर त्याला त्याच्या पार्श्वभागावर लाथ मारुन मोकळया हाताने परत पाठवण्याची मालिका पांढऱ्या कपडयातील माणूसकी संपलेली गटारातील किडे करत असतात. अंह ! हा शब्दा सुध्दा खुप वजनाचा आहे. तो त्यांना वापरणेही योग्य नाही. कारण माणसातला माणूस आज संपलाय. तो कुठेतरी पैशांना पैसा जोडण्यात गुंतलाय. अन असा गुंतलाय की दुसऱ्याच्या मुंडीवर पाय ठेऊन, इतरांचे नुकसान करुन, गोलमाल करुन, अवैध मार्गाने, भ्रष्ट परंपरेचाच अवलंब करुन पैसा जोडण्याची तयारीला लागला असल्यानेच शेतकऱ्यांच्या नशिबी शेवटी गोटाच आहे. शेतकऱ्यांना काहीच मदत नाही, काहीच लाभ नाही, काहीच सुख सुविधा नाहीत, काहीच ऐशो आरामाची जिंदगी नाही. पायातला जोडा दोन दोन वर्ष झिजवणारा आहे शेतकरी, वर्षभर एकच पातळ विरघळेपर्यंत वापरणारी आहे ती त्याची अर्धिंगीनी माय माऊली, चडडीला ढिगळ लावून रोज शाळेत चार भोकं पडलेली पिशवी घेऊन जाणारं शेतकऱ्यांचे लेकरु अजूनही तसंच आहे. हा खरा इतिहास खऱ्या शेतकरी राजाचा आहे. शेतकऱ्यांना राज का म्हटले तर तो रयतेला पोटात चार घास घालून प्रत्येकाचा आत्मा तृप्त करुन त्यांना पोटभर खायला घालतो व स्वत: अर्धी भुरकीसोबत खाऊन ढेकळांमध्ये निजतो. ही आहे त्याची जीवनशैली. त्याला गादी लागत नाही ना कधी एसी. पण त्याला त्याच्या आयुष्यात बदल करणं हे सुशिक्षीतांचं, सत्ताधाऱ्यांचं, प्रशासनाचं काम पण ना ना ! हा त्यांचा प्रांत नसल्यागत जणून गुरा ढोराप्रमाणे दिली जाणारी वागणून हीच शेतकऱ्यांना आत्महत्येच्या वाटेवर नेवून सोडते. शेतकऱ्यांची मुलं आपल्या पालकांची परिस्थिती पाहून आत्महत्या होऊ लागल्या, शासनाने किचकट स्वरुपाची कर्जमाफी करुन शेतकऱ्यांच्या संकटाचं पारड अजूनही जड केले. शासनाने योग्य ते पाऊल वेळीच उचलले नाही व शेतकऱ्यांना सुख सुविधा पुरवल्या नाहीत तर हा देश महासत्ता कधीच होऊ शकणार नाही. ज्याच्या जीवावर देशाची व्यवस्था अवलंबून आहे. त्याचेच स्तंभ जर कमजोर असतील तर महासत्तेचं स्वप्नं पाहणं सुध्दा वायफळच.


शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?