लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच प्रहार ?
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच प्रहार ?
खबरदार मोंदींवर टीका कराल तर, अशा शब्दात सायबर सेलने पत्रकार बांधवांना नोटीसा पाठवल्या. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असल्यामुळे भाजप सरकार पत्रकारांना एवढे घाबरते व दुसरे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या चमत्कार इथे पहावयास मिळतो. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामुळेच आज देश सुव्यवस्थित टिकून आहे, शासनाची व्यवस्था टिकून आहे. शासन दरबारी होणाऱ्या बदलाचा विकासाचा, भ्रष्टाचाराचा वा इतर बाबींचा आढावा जनता दरबारी ठेवण्याचं काम लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार करत असतो. मात्र भाजप सकाराच्या काळामध्ये याच पत्रकाराच्या लेखणीवर दबाव आणण्याचे षडयंत्र वापरले जात असून लोकशाहीवरच प्रहार करणयाचं काम या सत्ताधाऱ्यांनी केला आहे. निश्चितच या घटनेचा तीव्र निषेध आहेच. परंतू अशा घटना होत असतील आणी जनता मात्र हातावर हात ठेवून बसत असेल तर एवढे दिवस, दिवसाचा, रात्रीचा, उन, वारा, पाउसाची तमा न बाळगता अहोरात्र पत्रकारांनी जनतेची सेवा केली त्याबाबत जनता मात्र काहीच बोलत नसून कोणात्याही प्रकारच्या अडचणीत सापडलेल्या पत्रकार बांधावांच्या बाजूने उठाव करत नसल्याने पत्रकार बांधावांमध्ये नाराजीचा सूर पहावयास मिळतो. पत्रकारांनी जनेसाठी सारं आयुष्य वेचलं, मार खाल्ला, कित्येक खोटे खटल्यांचा सामना केला, कित्येकांचे अपघातात बळी गेले एवढे सारे होउन सुध्दा जनता मात्र मुग गिळून गप्प असल्याची भूमिका बजावर आहे हे मोठे दुर्देवच. शासनाच्या असल्या वागण्यामुळे पत्रकांरांवर शंका घेवून त्यांना अशा प्रकारे वेठीस धरुन त्यांना नोटीसा पाठवून पोलीसांमार्फ त कारवाई करायला लावणे हा या देशातील दुसरी आणीबाणी सुरू झाल्याचा संकेत दर्शवते. अशा भ्याडपणाला पत्रकार लवकरच चोख उत्तर देतील. कोणात्याही गोष्टीला अंत असतो. अति तिथं माती हा निसर्ग नियमच आहे. सत्ता हातात दिली म्हणून मनमानी करुन आपल्याच जातीचे हुद्यावर बवसून सर्वसामान्यांना त्रास देणे हे लोकशाहीलाव नियतीला न शोभणारे आहेच. कितीही झाले तरी हा देश एक पुरोगामी विचाराचाच आहे. इथें विचारांचे बळी जात नसतात हे माहिती असून सुध्दा सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या बळावर पत्रारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याची फ ळ काही काळांनंतर त्यांचा चोखाळायची आहेत हे मात्र लक्षात असू दयावे. अन्यायाच्या विरोधात आपली स्पष्ट भूमीका मांंडणी हा पत्रकारांचा धर्म असल्यामुळे लोखशाहीच्या या देशातील लेखणीची ताकत सर्वात भव्य असल्यामुळे त्यांच्याशीच पंगा ... छे छे हा तुमचा प्रांत नव्हे व धर्म तर नव्हेच.
- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com
Comments
Post a Comment