प्रिंट मिडीयाची विश्वासार्हता !
प्रिंट मिडीयाची विश्वासार्हता ! हल्ली प्रिंट मिडयाला टक्कर देण्यासाठी म्हणून का काय सोशल मिडीयाचा जन्म झाला, सोशल मिडयाच्या माध्यमातून घडलेली घटना अगदी तात्काळ जनसामान्यांपर्यंत स्मार्ट फोनच्या माध्यमातून पसरू लागली. अपघाताच्या बातम्या असतील, विविध सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, अगदी मुंज, जावळ, वरात लग्न इत्यादी शुभर्कांपासून निधनांच्या बातम्या अगदी काय ?, कुठे, केंव्हा ? वगैरे वगैरे क्षणांत माहिती मिळू लागली, हल्ली सोशल मिडीया हा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग बनला आहे. सोशल मिडीयाशिवाय कोणतेही काम करतांना सर्रास वापर होवू लागल्याने, माहितीची देवाण घेवाण, गप्पा, संदेश अशा सर्व लाभदायक गोष्टी सहज शक्य झाल्या, सोशल मिडीया मानवी जीवनात एक वरदान ठरल्यामुळे डिजीटल युगात जणू क्रांतीच झाली, या नव्या तंत्रज्ञानाचा जन्म झाल्यामुळे सर्वच क्षेत्रात कायापालट पहावयास मिळतोय, यामधील काही तंत्रज्ञानाचा वापर हा शैक्षणिक हेतू पोटीसुध्दा होत आहे. ही व अभिमानाची, कौतुकाची व चांगली बाब तर आहेच शिवाय देशाच्या विकासविषयक बदलामध्ये महत्वाची भूमिका बजावणारा घटकही आहे. असे बरेच फायदे महत्वं, वैशिष्टये सा...