महाराज, आम्हाला माफ करा ! “छिंदम सुटला” !


महाराज, आम्हाला माफ करा ! छिंदम सुटला ! 
खरंच राजे जमलं तर आम्हाला माफ करा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर सत्ता मिळवणाऱ्या मुजोर भाजप सत्तेतल्या पिलावळांनी राज्यभरामध्ये हैदोस मांडून ठेवला आहे, ज्या राजानं स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपला आयुष्य पणाला लावलं, त्या राजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्याची हिंम्मत करणाऱ्या औलादी राज्यात पैदा होतील असे स्वप्नातही कधी आलं नव्हतं, पण त्याच मातीमध्ये असली किडकी औलाद जन्मला आली व ती आज सुटली यापेक्षा दुसरे कोणतेच दुःख शिवप्रेमी झाले नाही, आजपर्यंत कायदा, सुव्यवस्थेवर, न्यायालयावर शिवप्रेमींचा विश्वास होता. हाच विश्वास आता इतिहासजमा झाला आहे. याचे चिंतन व्यवस्थेला करावेच लागेल. असल्या श्रीपाद छिंदम सारख्या नालायक औलादी हजार पाचशेच्या चिरीमिरी वर व्यवस्थेला नोटांची बंडले दाखवून मोकाट सुटत असतील, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यांमध्ये अशा निंदनीय घटना पुन्हा पुन्हा घडतच राहतील, छत्रपती शिवरायांनी दिलेल्या बलीदानाला हे प्रशासन, हे शासन हे हाफ चड्डी वाल्यांचं सरकार न्याय देऊ शकत नाही, हे फार मोठे दुर्दैवं आहे, फेब्रुवारी महिन्यामध्ये अहमदनगरचा तो नालायक श्रीपाद छिंदम छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह फोनवर वक्तव्य करतो काय ?  अन त्याला लगेच 15 हजार रुपयांच्या जामिनावर सोडून दिले जाते काय ? या प्रकाराकडे पाहिले असता भाजप सरकार आपल्या कार्यकर्त्यांना कशाप्रकारे पांघरूण घालत आहे, हे उघड उघड दिसत आहे, या मनमानी कारभाराला, अशा प्रकारच्या कृत्य करणाऱ्या अतिशय नालयक वृत्तीच्या, विकृत बुद्धीच्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा करण्याऐवजी मोकाट सोडून कसे काय दिले जाते ? यावर शिवप्रेमी चिंता व्यक्त करत आहेत. त्यांचा आक्रोश लक्षात घेता, छत्रपती शिवाजी महाराजांवरचे प्रेम लक्षात घेता अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या नालायकांना सोडून दिले जाते अशा घटना घडणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमानच होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच दिवस पाहण्यासाठी का स्वराज्य निर्माण केलं होतं. स्वतःच आयुष्य स्वराज्य निर्माण करण्यासाठी घातलं होतं. कित्येक मावळ्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरोगामी विचारांच्या या महाराष्ट्र राज्यांमध्ये आता हेच दिवस उरले होते पहायचे !  राजमाता जिजाऊ साहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तिडके नावाचा तरुण आजही तुरुंगाची हवा खात आहे. तो अजूनही कैद आहे पण अल्पावधीतच शिंदे कसा काय सुटतो ? यामागचं गौडबंगाल नेमकं काय आहे ? नेमकं का त्याला सोडून दिले ? ह्याबाबत शिवप्रेमी शंका व्यक्त करत आहेत. म्हणूनच राजे आम्हाला खरंच माफ करा आम्ही शिवरायांचे मावळे फक्त भगव्या नावापुरतेच आहोत, हातात भगवा दोरा, कपाळावर भगवी चंद्रकोर, गळयात शिवमुद्रा, हातात शिवमुद्रा अंगठी, भगवे वस्त्र घालून सत्ता मिळवणं, व तुमचा अपमान करणाऱ्या, तुमच्याबद़दल अपशब्द बोलणाऱ्यांचं आम्ही स्वत:ला मावळे म्हणवून घेणारे आज खरंच षंढ ठरलोत. याची लाज वाटते. नुसतेच गाडया घोडयांवर राजे लिहून कोणी छत्रपती‍ शिवाजी महाराजांसारखं होत नसतं, त्यांचे विचार आत्मसात करणं एवढं सोपं नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव फक्त आता फायदयासाठी वापरलं जात आहे, हे नाव फक्त आता राजकारणासाठी वापरलं जात आहे, हे नाव फक्त आता फलकांवर, पुरस्कारांसाठीच वापरलं जात आहे व हे नाव फक्त आता जातीसाठीच वापरलं जात आहे. त्यामुळे माझ्या राजाला संकुचीत वृत्तीच्या लोकांनमुळेच अशा प्रकारच्या औलादी आक्षेपर्ह वक्तव्य करण्याचं धाडस करतात व पैशांच्या जोरावर मोकाट सुटतात. हेच ते दुर्देव. स्वत:ला राजाचे मावळे म्हणवून घेणारे मावळे कुठें आहेत ? तर ते एकाच राजाची शिवजयंती दोनदा साजरी करुन डॉल्बी लावून, मद्यपान करुन झिंगत झिंगत राजासमोर नाचत आहेत. खरं तर शिवजयंती हा आनंदोस्तव आहे. शिवजयंती हा सण आहे, तो नाचून नाही तर वाचून साजरा व्हायला हवा. मात्र उलट परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आपणच आपल्या कर्माची फळं भोगत आहोत याचा नक्कीच विचार व्हायला हवा.
- शंकर चव्हाण , अंबाजोगाई ,9921042422

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

'यशाला' शॉर्टकट नाहीच !