प्रिंट मिडीयाची विश्वासार्हता !
प्रिंट मिडीयाची विश्वासार्हता !
हल्ली प्रिंट
मिडयाला टक्कर देण्यासाठी म्हणून का काय सोशल मिडीयाचा जन्म झाला, सोशल मिडयाच्या माध्यमातून
घडलेली घटना अगदी तात्काळ जनसामान्यांपर्यंत स्मार्ट फोनच्या माध्यमातून पसरू लागली.
अपघाताच्या बातम्या असतील, विविध सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, अगदी मुंज, जावळ, वरात
लग्न इत्यादी शुभर्कांपासून निधनांच्या बातम्या अगदी काय ?, कुठे, केंव्हा ? वगैरे
वगैरे क्षणांत माहिती मिळू लागली, हल्ली सोशल मिडीया हा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग
बनला आहे. सोशल मिडीयाशिवाय कोणतेही काम करतांना सर्रास वापर होवू लागल्याने, माहितीची
देवाण घेवाण, गप्पा, संदेश अशा सर्व लाभदायक गोष्टी सहज शक्य झाल्या, सोशल मिडीया मानवी
जीवनात एक वरदान ठरल्यामुळे डिजीटल युगात जणू क्रांतीच झाली, या नव्या तंत्रज्ञानाचा
जन्म झाल्यामुळे सर्वच क्षेत्रात कायापालट पहावयास मिळतोय, यामधील काही तंत्रज्ञानाचा
वापर हा शैक्षणिक हेतू पोटीसुध्दा होत आहे. ही व अभिमानाची, कौतुकाची व चांगली बाब
तर आहेच शिवाय देशाच्या विकासविषयक बदलामध्ये महत्वाची भूमिका बजावणारा घटकही आहे.
असे बरेच फायदे महत्वं, वैशिष्टये सांगता येतील. पण आज या युगात प्रिंट मिडयाचा वापर
कमी होत चालला आहे. असं म्हणतात !, अगदी सुरूवातीच्या काळापासून अचूक व विश्वासार्हत
असलेले प्रभावी व विश्वसनिय माध्यम म्हणून प्रिंट मिडीया अर्थात वर्तमानपत्राकडे पाहिले
जात असे. आजही तीच विश्वासार्हत कायम टिकून आहे. दिवसाची सुरूवात चहासोबत वर्तमानपत्र
हे समीकरण असायचे, वर्तमानपत्र वाचल्याशिवाय सकाळ व्हायची नाही, प्रारंभी दिवसभरातील
घडामोडींवर प्रकाशझोत टाकल्याशिवाय घरातील युवकांपासून वृध्दांपर्यंत वर्तमानपत्राला
अगदी अनन्यसाधारण महत्व असायचे. हळू हळू वर्तमानपत्रांच्या संख्येत वाढ होत गेली. स्पर्धेच्या
युगात स्पर्धा वाढणं ही सहच बाब. तसेच नैसगिकच. या स्पर्धेच्या युगात स्पर्धेमध्ये
टिकून रहायचं असेल तर संघर्ष हा प्रत्येकालाच करावा लागतो. संघर्ष केल्याशिवाय ध्येय्य
निश्चित होवून साध्य होत नसतं. हा निसर्गनियम आहे. वर्तमानपत्र काढणं सोप्पं आहे पण
चालवणं कठीण काम, भल्याभल्यांना घाम फुटतो व भल्याभल्यांना घाम फोडतो असा हा वर्तमानपत्राचा
अर्थात प्रिंड मिडीयाचा प्रवास. त्याची किंमत आजही तेंवढीच आहे, त्याची विश्वासार्हता
अजही तेवढीच आहे, त्याची गरज विश्वासार्हतेबरोबरच आजही तेवढीच आहे. सोशल मिडीयावर आपण
बातमी वाचली तिच्या विश्वासार्हतेमध्ये व वर्तमानपत्राच्या विश्वासार्हतेमध्ये जमीन
आसमानचा फ रक आढळून येतो. बातमीचा अचूक आढावा हा वर्तमानपत्राच्या बातमीतूनच कळतो,
बातमीचा जीवंतपणा हा प्रिंटमिडयाच देवू शकतो, त्याच्या विश्वासार्हतेचे प्रमाण अगदी
शंभर टक्के असते. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रिंट मिडयाला अच्छे दिन येतीलच यात तीळमात्रही
शंक्का नाही. निश्चतच विश्वासार्हत हीच त्याची यशाची पायरी असेल.
- शंकर चव्हाण , अंबाजोगाई
9921042422,
Comments
Post a Comment