मोर्चे इथले संपत नाहीत ...
मोर्चे इथले संपत नाहीत भारत देशामध्ये न्याय व हक्कासाठी मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले जातात, समाजातील वंचित घटक आपल्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी मोर्चे काढतात, शेतकरी त्यांच्या न्याय व हक्कासाठी मोर्चे काढतात, विद्यार्थी त्यांच्या न्याय व हक्कासाठी व त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मोर्चे काढतात, समाजातील विविध धर्मातील विविध जाती आरक्षणासाठी मोर्चे काढतात, शहराला पाणी मिळालं नाही म्हणून मोर्चे काढले जातात, वीज वेळेवर मिळत नाही म्हणून मोर्चे काढले जातात, शहरांमध्ये घाणीचे साम्राज्य वाढलं म्हणून मोर्चे काढले जातात, राज्यात वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून मोर्चे काढले जातात, अमानुषपणे बलात्कार होतात तेव्हा मोर्चे काढले जातात, डॉक्टर संप करतात, संविधान जाळले जाते म्हणून मोर्चे काढले जातात, भारत माता की जय कुणी म्हणत नाही म्हणून मोर्चे काढले जातात, सोशल मीडियावर एखादया महापुरूषाची बदनामी होते म्हणून मोर्चे काढले जातात,तिरंगा जाळला जातो म्हणून मोर्चे काढले जातात. देशांमध्ये अशा अनेक समस्या आहेत की त्यासाठी आंदोलनं, मोर्चे, उपोषणं करावी लागतात. सत्ताधारी व प्रशासकीय...