चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !
चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं ! महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांच्याविषयी काही समारात्मक व नकारात्मक गोष्टींचा आढावा आपण आज या संपूर्ण लेखामध्ये पाहणार आहोत. सोबतच चालक वाहक व प्रवाशांबाबतही थोडसं परखड भाष्य या ठिकाणी होणार असल्यामुळे काय अपेक्षीत बदल परिवहन मंडळाकडून व चालक वाहक व प्रवाशांकडून अपेक्षीत आहेत, त्याबाबत लोकभावनेची जोड प्रत्येकाच्या भावनेशी कशी जोडता येईल याबाबत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र राज्य हे भावनिक माणणांची खान व सकारात्मक विचारांच्या हिऱ्यांची खान असेलेले राज्य म्हटले तर वावगे ठरु नये. कारण इथें माणूस सकारात्मकच विचार करणारा व वागणारा नक्कीच सापडेल. सर्वसामान्यांपासून ते असामान्यांपर्यंतचा माणूस हा बसने प्रवास नक्कीच करतो. प्रवास ही प्रत्येकाच्या आयुष्यातील निरंतर पक्रिया असल्यामुळे प्रत्येकाला याची गरज नक्कीच भासते. आपण आता मुळ मुद्याचं बोलूया ! महत्वाचं म्हणजे स्वत:चा व्यक्तीमत्व विकास जर साधायचा असेल तर नम्रता हे मूल्य प्रत्येकाच्या अंगी असणं फार महत्वाचं असतं. चालक, वाहक व प्रवाशी या बाजूशिवाय परिवहन मंडळाचं ध्येय पूर्ती होवू शकत नाह...