तरुणाईचा संघर्ष

तरुणाईचा संघर्ष
आयुष्यामध्ये तीन गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. जगण्यासाठी, स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी व ओळख टिकवण्यासाठी. पण हे सर्व होण्याआधी काहीतरी उदरनिर्वाह करण्याचे साधन असणे अत्यंत गरजेचे असते. जेणेकरुन हया तीन गोष्टींचा संघर्ष पूर्ण होऊ शकेल. ते म्हणजे नोकरी, व्यवसाय किंवा इतर अन्य माध्यम तरुणांकडे असायला हवे. ‍नोकरी मिळवण्यासाठी ती करण्यासाठी व टिकवण्यासाठी, आज देशामध्ये तरुणाईला अत्यंत तारेवरची कसरतच करावी लागत आहे, तिथं मग शासकीय असो किंवा खाजगी. अतिशय हालाखीच्या स्थितीमधून जावून संघर्ष करावा लागत आहे. लोकसेवा आयोग राज्यपातळीवर व देशपाळीवर स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अनेक रिक्त पादांच्या भरतीसाठी परीक्षा घेतं. 
पण तिथं एवढी मोठी स्पर्धा असल्यामुळे सर्वांनाच नोकरी मिळेल असे नाही. पैकी दरवर्षी संघ लोकसेवा आयोगामार्फत हजाराच्या आसपासच अधिकारी म्हणून तरुण-तरुणींची निवड होत असते. तसेच महाराष्ट्र व अन्य राज्यांच्या राज्य आयोगांमार्फत रिक्त पादांच्या भरतीसाठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा व नंतर मुलाखत या प्रक्रियेद्वारे भरती करण्यात येते मात्र या भरतीची सरासरी ही केवळ प्रमाणात असल्यामुळे जेवढी बेरोजगारी आहे तेवढी बेरोजगारी कमी होण्यासाठी पूरेसं पडत नाही. त्यामुळे आणखीनच बेरोजगारांच्या व त्यांच्यातील संघर्ष करण्याच्या प्रवासामध्ये वाढ होऊन अडचणी निर्माण होत आहेत. त्यात खाजगी नोकरीचा विचार केला तर खाजगी क्षेत्रातही त्यापेक्षा भयान वास्तव आपणास पहावयास मिळेल. आजचा संघर्ष उदयाचे सामर्थ्य निर्माण करतो असं म्हणतात पण त्या संघर्ष करण्याला काही मर्यादा ? खाजगी नोकरी मिळवण्यासाठी तर काही वेळा चक्क खाजगी समुपदेशन व मार्गदर्शन केंद्र यांच्याकडून अनेक तरुणांची फसवणूक, पिळवणूक व खच्चीकरण होण्याचे प्रमाण अधिकचे आहे. 
नोकरी देण्याच्या अमिषाचे आवर कित्येक बळी ठरले याची उदाहरणंदेखील आहेत. तसा तरुणांचा अनुभव आहेच. आजची तरुणाई उदयाचे भविष्य घडवणार आहे. शासन स्तरावर नोकर भरतीसाठी म्हणावी तेवढी रेलचेल काही दिसून येत नाही. स्पर्धापरीक्षेची तयारी करुन करुन काही तरुणांच्या वयोमर्यादा संपल्या, काहीं निराशेचे बळी झाले, कांहींनी मजुरी सुरू केली. आज अनेक ठिकाणी जाऊन पहा पदव्युत्तर पदवी, पीएच.डी झालेले तरुण तरुणाई चक्क शिपाई पदासाठी अर्ज करतांना सापडतील ! आज तशा प्रकारच्या नोकऱ्या सुध्दा ते करत आहेत आणि हे सत्य देशासाठी मान खाली जाण्यासाठी पुरेसं कारण आहे. देशपातळीवर ज्या तरुणाईंनं ज्यांना ज्यांच्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून नियुक्त केलं आहे त्यांनी आजवर भाषण ठोकण्याच्या पलिकडं, आश्वासनाचं गाजर दाखवण्याच्या पलिकडं व कोपराला गुळ लावण्याच्या पलिकडं काहीच केलं नाही असं खात्रीपुर्वक तरुणाई सांगेल. तरुणाईच्या संघर्षाचा आता अंत होतो हा चिंतेचा विषय आहे तरीसुध्दा यांना जाग का बरं येत नसावी ? हा प्रश्न तरुणाईला भेडसावत आहे. शिक्षणाचे बाजारीकरण होऊन आधीच त्यासाठी त्यांनी व त्यांच्या पालकांनी शाळा, महाविदयालयांची फीस भरुन भरुन त्यांचं पोट अगदी पाठीला  गेलं असून संघर्ष अजुन चालूच आहे. एवढं सारं करुन देखील नोकरऱ्या नाही म्हटल्यावर त्या जीवाची काय बरं तळमळ होऊन तारांबळ होत असेल याचा सहानुभूतीपूर्वक खरंच विचार कायला हवा. या महागाईच्या जमान्यात श्वास सोडला तर फुकट काहीच मिळत नाही व तेवढं स्वस्त: देखील काहीच नाही. 
जिथं जाईल तिथं महागाई पाठ सोडवेना असं झालंय. मुंबईतील लोकलंच्या गर्दीचं दृष्य  पाहिल्यानंतर संघर्षाचं मोठं जीवंत उदाहरण आपल्याला नक्कीच मिळेल. देशात आजही कोणाचाच जगण्यासाठीचा व नोकरीसाठीचा संघर्ष संपलेला नाही. त्यामुळे कोणी काय केले पाहिजे हे सुचवणारे अनेक लेख या आधी लिहून झाले आहेत. अजून किती करावा संघर्ष ? जेंव्हा तरुणाईच्या तोंडून आपण ऐकतो तेंव्हा याचे उत्तर कोणाकडेच आजतागायत नसल्याचे दिसून आले आहे , व हे कटू सत्य आहे.
-  शंकर चव्हाण, अंबाजोगाई, 9921042422
hr.shankarchavan@gmail.com


Comments

  1. शंकरजी, लेख खूपच छान..तरुणांच्या भावनेला हात घातलात..पण आजची तरुण पिढी फक्त राजकारण आणि राजकारणी लोकांच्या मागे लागून स्वतःची फसवणूक करून घेत आहे.. आजचा तरुण सहज फारसं काम न करता मोबदला कसा मिळवता येईल याकडे जास्त आकर्षित झालेला दिसतो.. उदा: private finance किंवा तसम उद्योगात याना जास्त इंटरेस्ट आढळून येतो..sustanable आणि लॉंगटर्म काही करण्याच्या मनस्थितीत आजचा तरुण अजिबात नाही..सगळं काही 1 night मध्ये घडावं..अहो जिथे जन्माला येणासाठी देखील 9 महिने लागतात.. तेवढी सुद्धा मेहनत घ्यायची आजच्या तरुणांची नाही.. तसेच अजून एक गोष्ट लक्षात आली ती अशी की एखाद्या उद्योगासाठी फक्त subsidi loan कसे मिळवता येईल आणि ते पुढे भरले काय किंवा नाही..तो पैसा मुख्य व्यवसाय सोडून इतर non productive कामामध्ये गुंतवला जातो..आणि ही फार गंभीर बाब आहे.. तरुणांनी स्वतःहून व्यवसायात आले पाहिजे.. आज माझ्याजवळ या तरुणांसाठी 2 उद्योग आहेत पण अजिबात करण्याची इच्छा आणि क्षमता नसते किंवा नाही..यासाठी मी स्वतः एक असा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे ती अशी की येत्या 5 वर्षात कमीत कमी 1 लाख लोकांच्या घरात ₹ 5 लाख प्रति महिना माझ्याकडे असलेल्या व्यवसायातून कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे..त्यात तुम्ही पण सहभागी होऊ शकता.. आणि चांगल्या मार्गने जर एवढं उत्पन जर येणार असेल तर काय हरकत आहे.. अजून एक महत्वाचा मुद्दा असा की आपण स्वतंत्र झालो पण अजूनही गुलामी मानसिकता तशीच आहे.. आपण शरीराने स्वातंत्र्य मिळवले..पण आर्थिक स्वातंत्र्य कुठे आहे..ते जोपर्यन्त मिळत नाही तोपर्यंत आपण खरं स्वातंत्र्य अनुभवू शकत नाही..आणि कर्तव्यदक्ष राहण्याऐवजी फक्त हक्क हक्क आणि हक्क एवढंच डोक्यात भरवलं जात आहे..कर्तव्य नावाची काही गोष्ट असते ही आपण अनेकजण सोयीस्करपणे विसरलो आहोत..

    ReplyDelete

Post a Comment

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..