चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांच्याविषयी काही समारात्मक व नकारात्मक गोष्टींचा आढावा आपण आज या संपूर्ण लेखामध्ये पाहणार आहोत. सोबतच चालक वाहक व प्रवाशांबाबतही थोडसं परखड भाष्य या ठिकाणी होणार असल्यामुळे काय अपेक्षीत बदल परिवहन मंडळाकडून व चालक वाहक व प्रवाशांकडून अपेक्षीत आहेत, त्याबाबत लोकभावनेची जोड प्रत्येकाच्या भावनेशी कशी जोडता येईल याबाबत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र राज्य हे भावनिक माणणांची खान व सकारात्मक विचारांच्या हिऱ्यांची खान असेलेले राज्य म्हटले तर वावगे ठरु नये. कारण इथें माणूस सकारात्मकच विचार करणारा व वागणारा नक्कीच सापडेल. सर्वसामान्यांपासून ते असामान्यांपर्यंतचा माणूस हा बसने प्रवास नक्कीच करतो. प्रवास ही प्रत्येकाच्या आयुष्यातील निरंतर पक्रिया असल्यामुळे प्रत्येकाला याची गरज नक्कीच भासते. आपण आता मुळ मुद्याचं बोलूया ! महत्वाचं म्हणजे स्वत:चा व्यक्तीमत्व विकास जर साधायचा असेल तर नम्रता हे मूल्य प्रत्येकाच्या अंगी असणं फार महत्वाचं असतं. चालक, वाहक व प्रवाशी या  बाजूशिवाय परिवहन मंडळाचं ध्येय पूर्ती होवू शकत नाहीत व उद्देशही साध्य होऊ शकत नाही. दोन किस्से सांगतो ! एक चांगला अन दुसरा कसा आहे हे तुम्हाला नक्कीच समजेल पैकी पहिला असा की, मी एकदा तिरुपती दर्शनासाठी गेलो असता, दर्शन वगैरे झाले, परतीच्या प्रवासाला निघालो, आंध्रप्रदेश राज्याच्या मंडळराच्या बसने प्रवास करण्याचा योग आला. सोबत माझा परिवारही होता. एक वाहक जसं आपल्याकडं काळीपिवळी टॅक्सीवाला प्रवाशी जास्तीचे मिळावे व पैसे पण जास्तीचे मिळावे याची धडपड करत असतो त्याप्रमाणे अगदी नम्रतेने तो बस घेऊन जाण्यासाठी चक्क बस स्थानकामध्ये अमूक अमूग या ठिकाणी चला म्हणून ओरडत असतांना दिसला व प्रत्येक प्रवाशी जवळून जातांना त्याला यायचंय का असं विचारत होता. मला नवलंच वाटलं ! अगदी तो संपूर्ण बस भरल्याशिवाय बसस्थानकातून बाहेर पडलाच नाही. प्रत्येक प्रवाशी  बस मध्ये चढतांना त्या वाहकाच्या व चालकाच्या चेहऱ्यावर अगदी स्मित हास्यच होते.  आगदी तो शेवटी शेवटी ओरडून ओरडून थकला व शेवटचा प्रवाशी चढतांना देखील तो नकळत स्मितहास्य करता होता. मला तर वाटलं मी खरंच स्वप्नात बिप्नात आहे की काय ? पण असं काही नव्हतं, हे खरं खुरं घडत होतं. मित्रांनो यातून सांगायचं एकच की नम्रता व आपल्या संस्थेविषयीचा प्रामाणीकपणा यातून दिसून येतो, शिवाय आपण एखादया संस्थेची पगार घेतोए त्याच्याशी असणारी इमानदारी यातून दिसून येते, इतरांप्रती तळमळ दिसून येते. शिवाय त्या राज्यातील प्रवाशीही त्या वाहक व चालक यांच्याशी नम्रतेने वागणारे, बसमध्ये कचरा न होऊ देणारे, शिवाय काही खाऊ बसमध्ये खाल्लाच तर हातातील कचरा बस थांबल्यानंतर कचरापेटीतच टाकणारे, महतवाचं म्हणजे त्या बसमध्ये कोपऱ्यात किंवा इतरात्र पिचकारी मारलेले लाल लाल रंगोटी केलेले कोपरे मात्र दिसले नाहीत व पिचकारी मारतांना प्रवाशी सुध्दा दिसला नाही.  मित्रांनो ही अतिशयोक्ती नाही. ही खरंच देशाप्रती असलेली प्रेमाची भावना आहे, इतरांप्रती असलेली नम्रता दाखवण्याची उमेद आहे. जग हे प्रेमानेच जिंकता येतं असं म्हणतात ते खरं आहे.
या उलट दुसरा किस्सा म्हणजे एकदा असंच आपल्या महाराष्ट्राच्या परिवह मंडळाच्या लाल परी अर्थात एसटी ने प्रवास करत होतो. बसला हात केला, बस थांबवली नाही म्हणून पळून पळून घाई घाईने बसचे दार वाजवले. तरीही वाहक व चालक बस थांबवायला तयार नव्हता, तेवढयात ओरडलो ! मग बस थांबवली. पाहिलं तर काय बस अर्धी रिकामीच !  वाहकाला व चालकाला म्हटले असं का ? तर चक्क म्हणले लवकर यायचं कळत नव्हतं का ? मी तर बुचकूळयातच पडलो म्हटलं हा तर चोर तो चोर अन शिरजोर ! मी लगेलचच त्याला वाहकाला व चालकाला आंध्रातील चालक व वाहकाचे उदाहरण देऊन त्यांच्याबददल सांगत होतो तेवढयात अरेरावी ची भाषा कानावर पडू लागली व नको नको ते ऐकवलं. मग पुढे काय झालं असेल ते सांगायची काही गरजच नाही. त्यात कुठे नम्रता दिसून आली नाही, कुठे आपण काम करत असलेल्या संस्थेविषयी आत्मियता दिूसन आली नाही, प्रवाशांप्रती प्रेम भावना दिसून आली नाही. एकूणच काय तर लोकभावना नव्हतीच. शिवाय प्रवाशीही तसेच, केळी खाऊन गाडीतच सालटे टाकणारे, बसचे कोपरे व खिडक्या आगदी गुटखा, मावा खाऊन लाल भडक केलेले, तो घाण वास अगदी प्रवास करायला नकोसं होतं ! यातून एवढंच समजून घ्यायचं आहे की बाबांनो आता तरी सुधरा ! नम्रतेने वागा, इतरांप्रती प्रेम असू दया व दुसऱ्यांडून काही तरी शिकून त्याचे अनुकरण करा व चांगल्या गोष्टी आत्मसात करा. कारण शहाण्याला शब्दांचा मार असं म्हणतात बस एवढंच !
-  शंकर चव्हाण, अंबाजोगाई , 9921042422
hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

‘व्यसन एक फॅशन’

अै बाप पोरगं संभाळ ! शेंबडं खूनं करायलंय …

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !