Posts

Showing posts from October, 2019

गुदमरलेला तो आवाज …

गुदमरलेला तो आवाज आवाज येत होता, आवाज येतच होता, आतलाच आवाज येत होता, तो सांगत होता, तो सांगतच होता, आवाज तो आतलाच होता आवाज तो आतलाच होता वाटलं खोटं सांगतोय तो, खोटं सांगतोय तो … पण तो थोडासा गुदमरलेला होता पण तो थोडासा गुदमरलेलाच होता … त्याला मदतीचा हात मिळत नव्हता, त्याला मदतीचा हात मिळतच नव्हता, जगणं सोपं असतं ? मरणं अवघड असतं ! मग दोन्ही वाक्यात तो फरकच काय ? मेल्यावर मिळते मदत हा देश कसला ? मेल्यावरच मिळते मदत हा देश माझा ! जीवंत पणाची किंमत शून्य मरणोत्तर भारतरत्न ? गादीसाठी रक्त सांडीले पैशांसाठी घरे फोडीले खरंच मी गुदमरलेला आवाज … खरंच मी गुदमरलेलाच आवाज … -     शंकर चव्हाण, अंबाजोगाई,  9921042422

फक्त तू ...

फक्त तू तू माझी मी तुझा अजबच नियम प्रेमाचा आठवणीत फक्त मी तुझ्या वाहून गेलो प्रेमात तुझ्या जग सारे पायास माझ्या संसार हृदयात तुझ्या साथी आहेस तू माझी प्राण आहेस तू माझी चुकलं कधी माफ कर स्वप्न तुझे तू साकार कर जगातलं आठवं आश्चर्य तू हृदयाचे ठोके आहेस तू प्रेमात सर्व काही माफ कर तू दुर्गुणांचा साफ आहेस तू दुर्गा, आहेस तू  जाणकार एकटाच होतो मी, दूर केलास तू अंधकार माझा आहेस जीव तू माझा श्वास तू माझं काळीज तू माझा विश्वास तू माझ्या शिवाय अर्ध तू माझा आहेस अर्थ तू तुझ्या विना मी शून्य  माझं विश्व आहेस तू प्रेम म्हणजे फक्त तू दिवस तू, रात्र तू तुझ्यामुळेच कवी झालोय मी पहिल्या भेटीचा क्षण आठवतोय मी अगं माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर अन तुझं माझ्यावर जीवन फक्त तू प्राण फक्त तू श्वास फक्त तू आवाज फक्त तू फक्त तू, फक्त तू बस फक्त तूच - शंकर चव्हाण, अंबाजोगाई,  ...