फक्त तू ...

फक्त तू

तू माझी मी तुझा
अजबच नियम प्रेमाचा

आठवणीत फक्त मी तुझ्या
वाहून गेलो प्रेमात तुझ्या

जग सारे पायास माझ्या
संसार हृदयात तुझ्या

साथी आहेस तू माझी
प्राण आहेस तू माझी

चुकलं कधी माफ कर
स्वप्न तुझे तू साकार कर

जगातलं आठवं आश्चर्य तू
हृदयाचे ठोके आहेस तू

प्रेमात सर्व काही माफ
कर तू दुर्गुणांचा साफ

आहेस तू दुर्गा, आहेस तू  जाणकार
एकटाच होतो मी, दूर केलास तू अंधकार

माझा आहेस जीव तू
माझा श्वास तू

माझं काळीज तू
माझा विश्वास तू

माझ्या शिवाय अर्ध तू
माझा आहेस अर्थ तू

तुझ्या विना मी शून्य 
माझं विश्व आहेस तू

प्रेम म्हणजे फक्त तू
दिवस तू, रात्र तू

तुझ्यामुळेच कवी झालोय मी
पहिल्या भेटीचा क्षण आठवतोय मी

अगं माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर
अन तुझं माझ्यावर

जीवन फक्त तू
प्राण फक्त तू

श्वास फक्त तू
आवाज फक्त तू

फक्त तू, फक्त तू
बस फक्त तूच

- शंकर चव्हाण, अंबाजोगाई, 9921042422

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..