गुदमरलेला तो आवाज …
गुदमरलेला तो आवाज
आवाज येत होता,
आवाज येतच होता,
आतलाच आवाज येत होता,
तो सांगत होता,
तो सांगतच होता,
आवाज तो आतलाच होता
आवाज तो आतलाच होता
वाटलं खोटं सांगतोय तो,
खोटं सांगतोय तो …
पण तो थोडासा गुदमरलेला होता
पण तो थोडासा गुदमरलेलाच होता …
त्याला मदतीचा हात मिळत नव्हता,
त्याला मदतीचा हात मिळतच नव्हता,
जगणं सोपं असतं ?
मरणं अवघड असतं !
मग दोन्ही वाक्यात तो फरकच काय ?
मेल्यावर मिळते मदत हा देश कसला ?
मेल्यावरच मिळते मदत हा देश माझा !
जीवंत पणाची किंमत शून्य
मरणोत्तर भारतरत्न ?
गादीसाठी रक्त सांडीले
पैशांसाठी घरे फोडीले
खरंच मी गुदमरलेला आवाज …
खरंच मी गुदमरलेलाच आवाज …
- शंकर चव्हाण, अंबाजोगाई, 9921042422
खरोखरच भारतातील नव्वद टक्के लोकांचा हा गुदमरलेल्या आतला आवाज आहे . जिवंत माणसाचे दखल घेतली जात नाही .आणि मृत्यूनंतर मदत दिली जाते. मृत्यूनंतर कार्याची दखल घेतली जाते.
ReplyDeleteThanks
Delete