पीडीएफ मुळं वृत्तपत्रांवर वाईट वेळ ?
पीडीएफ मुळं वृत्तपत्रांवर वाईट वेळ ? धक्काच बसला ना ? होय खरंच असं नक्कीच झालं आहे. आता तुम्ही म्हणाल ही पीडीएफ म्हणजे काय भानगड आहे ? होय तर, एखाद्या समस्येचं निराकरण होत नसेल तर त्याच्या मुळाशी जायला नको ? गेलंच पाहिजे ! नाही तर आपल्या बाबतीत नेमकं काय ? कुठे ? केव्हा ? कसं ? आणि का ? घडलं हे नक्की कळलंच नसतं ! हा तर पत्रकारीतेचा नियमच आहेे. हल्ली एक पीडीएफ नावाचं तंत्रज्ञान विकसीत झाल्यामुळं वृत्तपत्र आपल्या अगदी खिशातच येउन पोहचले आहे. म्हणजे स्मार्ट पध्दतीने स्मार्ट फोनमध्ये. कारण पीडीएफ म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट असं त्याचं विश्लेषन रुप व पीडीएफ PDF हे त्याचं सक्षीप्त रुप आहे. आता तुम्ही म्हणाल या तंत्राज्ञानाचा आणि वृत्तपत्राचा काय संबंध ? होय नक्कीच आहे तर संबंध. त्याचं असं आहे की, हल्ली सोशल मिडीयावर व्हॉट्ट्सअॅप नावाचं एक अॅप आहे. अॅप म्हणजे एक प्रोग्राम. याच्या माध्यमातून आपण वृत्तपत्र तयार केल्यानंतर संपूर्ण वृत्तपत्राची एक फाईल पीडीएफ स्वरुपात वाचकांना पाठवू शकतो. म्हणजे प्रिंट व्हर्जन वेगळे आणि पीडीएफ ह...