पोरगं हाटेलात तुपाशी, अन् मायबाप रानात उपाशी ! ...

पोरगं हाटेलात तुपाशी, 
अन् मायबाप रानात उपाशी ! ...

पोटाची खळगी भरण्यासाठी बाप शेतात राब राब राबतोय, कृषीप्रधान देशात शेतकरी अर्ध्या पोटावर, आनवाणी पायानं    चालतोय, का ? तर, आपल्या मुलांनी शिकावं, खुप मोठं व्हावं म्हणून. पण देश जसाजसा महासत्ता होत आहे ? तसं तसं देशतील परिस्थिती मात्र  हाताबाहेर जातांना दिसत आहे. आई वडील आपल्या पाल्याला शिक्षणासाठी वाटेल तेवढे पैसे पुरवठा करतात, वाटेल तशी हौस करतात, लाड करतात, कसल्याही प्रकारची कमतरता भासू देत नाहीत, का? तर आपला मुलगा-मुलगी शिकावी, मोठा अधिकारी व्हावेत व आपल्या घरची परिस्थीतीमध्ये बदल करावा. गरीबी दुर करावी, आई वडीलांची हालाखीची परिस्थिती बदलून टाकावी. शेतकर्‍यांशिवाय इतर पालकांचीही या पिढीनं हीच अवस्था करुन ठेवली आहे आणि त्यात भर म्हणजे सेन्सॉर बोर्डच्या कृपाशिर्वादामुळे अख्खा देश बरबाद करुन ठेवला आहे. तो कसा ? देशात काय प्रकाशित व्हावं व काय होऊ नये यासाठी काही बंधनं असावेत, देशात ब्रॉडकास्टींग व्यवस्था, मिडीया यांनी काय प्रसार करावा व काय करु नये यासाठी परवानाग्या देण्याचं काम सेन्सार बोर्ड व ब्रॉडकास्टींग मंत्रालयाअंतर्गत कामकाज चालते त्यामुळे याच सेन्सॉर बोर्डानं भारत देशात काय काय प्रसार करायला परवानग्या दिल्या याचं व त्याचं भलतंच काय होऊन बसलं आहेत ते तुम्हला आजच्या पिढीतील तरुण मुलामुलींच्या वागणुकीतून दिसून येतेच. 
सर्वच तरुण मुलं - मुली अशा विचारांचे असतीलच असे नाही पण संस्कार असणार्‍यांचे प्रमाण मात्र अल्प असल्याचे अभ्यासावरुन लक्षात येते. म्हणजे मुळ विषय असा आहे की, हल्ली ही उनाड पोरं पोरी हॉटेलमध्ये, कॅफेमध्ये बिनधास्त आपल्या मित्र मैत्रीनींसोबत मौज मजा करतांना दिसतात, मौज मजा करावी पण आपला बाप काय करतो, आपली परिस्थती काय आहे, आपल्या आईचे घरी काय हाल आहेत याकडेही जरा लक्ष दिले पाहिजे. अशी काही उदाहरणं आहेत की, मुलगा पुण्यात शिकतोय, मुलीला पुण्याला शिकायला ठेवलं आहे, पण आईवडील इकडे शेतात, मोलमजुरी करुन ह्यांना पैसे पुरवण्यासाठी दिवसातून एकवेळ जेवून, पोटाला मारुन पैसे पाठवतात. मात्र त्यांची हे एैतखाऊ व इतरांच्या वाईट संगतीने बिघडलेले टवाळ लेकरं हॉटेलात मजा मारतांना अनेक उदाहरणं समोर येतांना दिसत आहेत. याला कोण जबाबदार, याचाही शोध घेऊन, मुळाशी जाऊन खरंच विचार करायला हवा की, असं का बरं होत आहे. तरुणाई आता बर्‍यापैकी व्यसंनामुळे हाताबाहेर गेलेला विषय होऊन बसली आहे. त्यात मुलींचाही बर्‍यांपैकी म्हणजे अगदी मुलंबरोबर जवळजवळ तेवढाच व्यसनांच्या बाबतीत सहभाग असल्याचे सर्रास दिसून येते. याचाच अर्थ, देश महासत्ता होण्याकडे वाटचाल करत असतांना देशाचा आधारस्तंभ असेलेली ही तरुण मंडळी वेगळयाच वाटेवर जात असल्यामुळे येणार्‍या काळात देश अंधाराकडे जातोय असे म्हटल्यास वावगं वाटू नये म्हणजे बरे. पण हा विषय अत्यंत गंभीर स्वरुपाचा आहे. 
एवढेच नव्हे तर तरुण पिढी ही व्यसंनाच्या आहारी तर गेलीच आहे पण त्यांचे शौक पाहिलेतर तुम्हीही थक्क व्हाल, वडीलधार्‍यांनी सांगितलेली एक गोष्ट त्यांना पटली तर मग नवलच. पिढीपिढीचा गॅप म्हणजेच   जनरेशन गॅप म्हणून एखादी गोष्ट कलटी मारुन कशी न्यायची हे त्यांच्याकडून चांगलंच शिकता येईल. पण पालकांनो तुम्ही वेळीच जागे व्हा, नको तेंव्हा नको ते लाड करणं बंद करा. अन्यथा भविष्यात तुम्हाला तुमच्याच घरातून बाहेर जाण्याची वेळ येईल. नाही तरी सध्या परिस्थिती अशीच आहे. पोरगं हाटेलात  तुपाशी आणि माय बाप शेतामध्ये अर्धी अर्धी भाकर खाऊन उपाशी दिवस काढत असल्याचे वास्तव चित्र डोळयासमोर आहे, एवढेच नाही तर काही मोठमोठया करोडपतींचे, अधिकर्‍यांचे आई वडील वृध्दाश्रमात आपले दु:खाचे एक एक दिवस मोजत दिवस काढत असल्याचे अनेक उदाहरणं या महासत्ता होत असलेल्या? देशामध्ये सापडतील.
-         शंकर चव्हाण, अंबाजोगाई 9921042422


Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?