पीडीएफ मुळं वृत्तपत्रांवर वाईट वेळ ?

पीडीएफ मुळं वृत्तपत्रांवर वाईट वेळ ?

धक्काच बसला ना ? होय खरंच  असं नक्कीच झालं आहे. आता तुम्ही म्हणाल ही पीडीएफ  म्हणजे काय भानगड आहे ? होय तर, एखाद्या समस्येचं निराकरण होत नसेल तर त्याच्या मुळाशी जायला नको ? गेलंच पाहिजे ! नाही तर आपल्या बाबतीत नेमकं काय ? कुठे ? केव्हा ? कसं ? आणि का ? घडलं हे नक्की कळलंच नसतं ! हा तर   पत्रकारीतेचा नियमच आहेे. हल्ली एक पीडीएफ  नावाचं तंत्रज्ञान विकसीत झाल्यामुळं वृत्तपत्र आपल्या अगदी खिशातच येउन पोहचले आहे. म्हणजे स्मार्ट पध्दतीने स्मार्ट फोनमध्ये. कारण पीडीएफ  म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट असं त्याचं विश्लेषन रुप व पीडीएफ  PDF हे त्याचं सक्षीप्त रुप आहे. आता तुम्ही म्हणाल या तंत्राज्ञानाचा आणि वृत्तपत्राचा काय संबंध ? होय नक्कीच आहे तर संबंध. त्याचं असं आहे की, हल्ली सोशल मिडीयावर व्हॉट्ट्सअ‍ॅप नावाचं एक अ‍ॅप आहे. अ‍ॅप म्हणजे एक प्रोग्राम. याच्या माध्यमातून आपण वृत्तपत्र तयार केल्यानंतर संपूर्ण वृत्तपत्राची एक  फाईल पीडीएफ  स्वरुपात वाचकांना पाठवू शकतो. म्हणजे प्रिंट व्हर्जन वेगळे आणि पीडीएफ हे वेगळे. आता हे का पाठवायचे ? हे यासाठी पाठवायचे की, आपला पेपर (वृत्तपत्र) प्रिंट स्वरुपात ज्या वाचकांपर्यंत पोहचत नाही त्या वाचकांपर्यंत अशा स्वरुपात आपण आपले वृत्तपत्र पाठवू शकतो. ही एक सोय म्हणून आपण याचा उपयोग करु शकतो. पण, भानगड अशी झाली आहे की, सोशल मिडीयावरचा ईकचरा एवढा वाढला आहे याचे वेगळेपण व विश्लेषन इथे करायला नकोच ! हल्ली सोशल मिडीयावर मेसेज एवढे येउन पडतात की, ते ग्रुप मेसेज, पर्सनल मेसेज वाचायला तेवढा वेळ कुणाकडेच नाही. असो. आपण मुळ मुद्दा ठळक समजावून घेउयात. या तंत्रज्ञानामुळे प्रिंट झालेला पेपर (वृत्तपत्र) चार पैसे विकत घेवून कोणी वाचेल तर शप्पथ ! धकाधकीच्या जीवनात अधीच वाचक वर्ग कमी झालेत. त्यात ही अशा प्रकारची सोय. मग काय झालंच कल्याण. एखादी वस्तू किंवा गोष्ट जर आपल्याला सहज मिळत असेल तर त्याची आपल्याला मुळीच किंमत नसते. पण तीच सहज मिळणारी वस्तू किंवा गोष्ट जर आपल्याला महागड्या स्वरुपात मिळत असेल तर आपण तीची काळजी घेतो किंवा ती अगदी जपूण हाताळणी करुतो. थोडक्यात काय तर तीचा व्यवस्थित सांभाळ करतो. इथे पण तसंच आहे, वृत्तपत्र इज नॉट अ जोक! हे वाक्य मी इथे मी मुद्दामहून वापरले आहे. त्याचं काय ना की, वृत्तपत्र तयार होण्यासाठी जो घाम गाळावा लागतो, जी मेहनत लागते, ज्या प्रकारे रक्त आटवावं लागतं त्याचा विचार इथे कुणालाच करावा वाटत नाही. एखाद्या वृत्तपत्राची श्रेणी, दर्जा आपण ठरवुन सहज, तातडीनं ठरवून मोकळे होतो. परंतू वास्तव खुप वेगळं आहे. रात्र रात्रभर जागून केलेली ही दररोजची संपादक बांधवांची एक स्वप्नपूर्ती असते. ती अतीशय विचारपूर्वक रचना असते. आरशासारखी पारदर्शक असते, दररोज नवीन साहित्य, नवीन वृत्त, नवीन घडामोडी गोळा करुन तयार केलेले एक वाचनीय विश्व असे व त्यात सामावलेली एककलाकृत्ती म्हणजे वृत्तपत्र होय. परंतू हल्ली डिजीटल युगात क्रांती झाली त्याप्रमाणे त्याबरोबरीने चाललंही पाहिजे. पण या डिजीटल युगात वाचक वर्ग कमी झाला हे देशातील फार मोठे नुकसान झालेला चिंतेचा विषय आहे. जो तो म्हणतोय माझ्याकडे वेळ नाही. मग वाचन केव्हा करणार ? आणि त्याच वृत्तपत्र विकत घेवून वाचणार कधी. या पीडीएफ  मुळे अगदी वृत्तपत्र चालकांवर उपासमारीचीवेळ येणार असल्याचे संकेत दिसून येतायत की काय ? असं एकंदरीत भितीचे वातावरण निर्माण होवू लागले आहे आणि काही जणांसोबत असे घडू लागले आहे. हा चिंतेचा विषय इथेच लवकरात लवकर थांबायला हवा अन्यथा प्रिंट मिडीया आधीच धोक्यात आहे. आता या पीडीएफ  इतरांना पाठवायच्या नादात आपण केव्हा संपू व आपल्या पत्रकारीतेला पूर्णविराम केव्हा बसेल याची शाश्वती इथे कुणालाच देता येणार नाही. बस्स, इशारा समजून घ्या ...

-         शंकर चव्हाण, अंबाजोगाई 9921042422

Comments

  1. अगदी वास्तव मांडलात शंकरराव...

    इतरांच्या अगोदर मी कसा जलद बातमी देऊ हे चालय पञकारीतेत

    थोडक्यात चैना माॕडेल...

    ReplyDelete

Post a Comment

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..