Posts

Showing posts from July, 2020

आठवण ...

आठवण ... आठवण आली की, आठवणींना उजाळा मिळतो, आठवणींच्या आठवणीत, माणूस खूप काही आठवतो, आठवून आठवून एकमेकांना, खूप आठवण येते, आठवणींच्या विश्वात, त्या आठवणींच्या स्वर्गात, आठवणींच्या समुद्रात, आठवणींच्या शोधात फक्त आणि फक्त त्या आठवणींसाठी आठवत आठवत तळाशी खोलवर जातो, त्यालाच आपण प्रेमाची आठवण म्हणतो.... - शंकर चव्हाण,  9921042422

जरा जपूनच बरं; ऑनलाईन फसवणुकीचा कहर ...

Image
जरा जपूनच बरं; ऑनलाईन फसवणुकीचा कहर ... बंधूंनो आणि भगिनींनो, तुमच्या हातात स्मार्टफोन मोबाईल आहे. त्यामुळं अगदी स्मार्ट पध्दतीनं तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणुक करुन अगदी सहजच गंडवलं जावू शकतं. तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. जरा जपूनच बरं. लॉकडाऊन काळात गेल्या अनेक महिन्यांपासून सायबर गुन्हयांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळं देशातील अनेकांचे आर्थिक नुकसान होऊन त्यांच्या सोबत ऑनलाईन माध्यमाद्वारे म्हणजेच मोबाईल, सोशल मिडीयाच्या माध्यमातून फसवणुक झाली आहे. अनेकांना लाखोंचा गंडा बसला आहे. त्यामुळे यापासून तुम्हाला स्वत:चा बचाव करायचा आहे. प्रथमत: कोणत्याही प्रकारचा अनोळखी फोन कॉल आला व त्यांनी सांगितलं की, मी बँकेतू बोलतोय. असं म्हटल्याबरोबर तो खरंच बँकेतूनच बोलतोय का ? याची खातरजमा करा, त्यांनी केलेला फोन क्रमांक हा खरंच बँकेचाच आहे. का ? बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही त्याचा शोध घ्या व खात्री करा किंवा त्या फसव्या असणाऱ्या फोन कॉलवर कोणी निर्बंध घालावा म्हणून संबंधीत कंपनीकडे रिपोर्ट तर केला नाही याचीही खात्री करा. हे झालं एक. आता दुसरं. हल...