जरा जपूनच बरं; ऑनलाईन फसवणुकीचा कहर ...

जरा जपूनच बरं; ऑनलाईन फसवणुकीचा कहर ...
बंधूंनो आणि भगिनींनो, तुमच्या हातात स्मार्टफोन मोबाईल आहे. त्यामुळं अगदी स्मार्ट पध्दतीनं तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणुक करुन अगदी सहजच गंडवलं जावू शकतं. तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. जरा जपूनच बरं. लॉकडाऊन काळात गेल्या अनेक महिन्यांपासून सायबर गुन्हयांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळं देशातील अनेकांचे आर्थिक नुकसान होऊन त्यांच्या सोबत ऑनलाईन माध्यमाद्वारे म्हणजेच मोबाईल, सोशल मिडीयाच्या माध्यमातून फसवणुक झाली आहे. अनेकांना लाखोंचा गंडा बसला आहे. त्यामुळे यापासून तुम्हाला स्वत:चा बचाव करायचा आहे. प्रथमत: कोणत्याही प्रकारचा अनोळखी फोन कॉल आला व त्यांनी सांगितलं की, मी बँकेतू बोलतोय. असं म्हटल्याबरोबर तो खरंच बँकेतूनच बोलतोय का ? याची खातरजमा करा, त्यांनी केलेला फोन क्रमांक हा खरंच बँकेचाच आहे. का ? बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही त्याचा शोध घ्या व खात्री करा किंवा त्या फसव्या असणाऱ्या फोन कॉलवर कोणी निर्बंध घालावा म्हणून संबंधीत कंपनीकडे रिपोर्ट तर केला नाही याचीही खात्री करा. हे झालं एक. आता दुसरं. हल्ली ऑनलाईन ई कॉमर्स वेबसाईटवरुन वाहनांची खरेदी विक्री मोठया प्रमाणात होत आहे. त्यामुळे निश्चितच याचा वाहन घेणाऱ्यास व विक्री करणाऱ्यास फायदा होतो आहे. ते असं की, वाहन जलद गतीने विक्री होते आणि अगदी सहज सोप्या पध्दतीने कुठेही बसून मोबाईलद्वारे आपण अनेक वाहनं पाहू शकतो व विकत घेऊ शकतो. हा झाला फायदा पण, त्यामुळे अनेक फसवेगिरी करणारे गुन्हेगार याचा गैरफायदा नक्कीच घेत असतात. अनेकांचे अशा ईकॉमर्स वेबसाईटवरुन फसवणुक झाल्याचे निदर्शनासही आले असून फसवणुक झाल्याचे आढळून आले आहे व दिवसेंदिवस असे प्रकार मोठया प्रमाणात घडत आहेत. यापासून सावधगिरी म्हणून बचाव करण्यासाठी तुम्ही स्वत:चे वाहन विकत असाल किंवा विकत घेत असाल तर समोरली व्यक्तीस आपला संपर्क क्रमांक तात्काळ देऊ नका, लवकर विश्वास टाकू नका. समोरली व्यक्तीने व्हॉट्सॲप क्रमांक दिला असेल तर त्याची विविध ॲपच्या सहाय्याने बरोबर असल्याची खात्री करा. त्यानंतर त्यांनी एटीएम कार्ड नंबर, सीव्हीव्ही कोड, ओटीपी व एटीएम पासवर्ड यांसारख्या गोपनीय माहितीची अजिबात सोशल मिडीयावर किंवा ॲपवर माहिती पाठवू नका. हल्ली झटपट पेमेंट करण्यासाठी बारकोड स्कॅन करुन पैसे पाठवता येतात. तशा प्रकारचे सोयीस्कार ॲप ऑनलाईन उपलब्ध आहेत. म्हणून फसवणुक करणारे याचासुध्दा गैरफायदा घेऊन आपलं आर्थिक नुकसान करुन शकतात. सोशल मिडीयाच्या ॲप च्या माध्यमातून हा कोड आपल्याला पाठवतात व स्कॅन करायला सांगतात आणि त्यानंतर आपल्या खात्यातून पैसे काढून घेतात. त्यामुळे असे व्यवहार करातांना काळजीपूर्वक करा. कारण ऑनलाईन फसवणुकीने हल्ली कहरच केला आहे. त्यामुळे जरा जपूनच बरं ...
- शंकर शेषेराव चव्हाण, अंबाजोगाई (संपर्क : 9921042422)

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?