Posts

Showing posts from 2024

ॲड. शंकर चव्हाण परिवर्तनवादी नेतृत्व

Image
  परळी विधानसभा मतदारसंघात एक नवं परिवर्तनवादी, केवळ विकासात्मक धोरण असणारं गतिशिल विचाराचं वादळ आता परळी मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलं आहे. ज्याच्या अंगी समाजपरिवर्तन करण्याची ताकद व उच्च विचारणसणी असणारं अष्टपैलू उमदं व्यक्तीमत्व म्हणजे ॲड. शंकर चव्हाण. स्व. लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेब व स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या सामाजिक, राजकीय कारकीर्दीचा ॲड. शंकर चव्हाण यांच्यावर प्रभाव असल्यामुळे सामाजिक जीवनात सर्वसामान्यांच्या पावलो पावली काय समस्या, अडीअडचणी असतात याची त्यांना तंतोतंत जाणीव आहे. व्यवस्था कशी असायला हवी व त्याला तंत्रज्ञानाची जोड कशी देता येईल याबाबत त्यांचा हात कोणीच धरु शकरणार नाही असं म्हटलं तर वावगं ठरु नये. दुरदृष्टी असणारं व विकासात्मक धोरणाची मशाल हाती घेऊन अंधाऱ्या वाटेने हा एकटा निघालेला तरुण त्याच्यासोबत परळी मतदार संघातील तरुणाई सोबत असल्यास ॲड. शंकर चव्हाण परळी मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलून टाकतील असं यावरुन लक्षात येते. वकीली, पत्रकारीता, सामाजिक, राजकीय, तंत्रज्ञान, समुपदेशन, कला इ. विविध क्षेत्रात आपली छाप उमटवणा...

मैत्री पुस्तकांशी

Image
  ज्ञानाचा अथांग महासागर जर कुठं असेल तर तो पुस्तकं वाचण्यात आहे असं माझं मत आहे. ज्याची मैत्री पुस्तकांशी असते त्याचं मस्तक सशक्त असतं हे माझ्या अनेक संशोधनावरुन मला उमजलेलं आहे. हे सुध्दा माझं मत आहे. त्यामुळे विचारल प्रगल्भ करायचे असतील तर पुस्तकांशी मैत्री जेवढं लवकर होईल तेवढं करा. कारण या जगात पुस्तकांएवढं सुंदर काहीच नाही. आपण धरतीवर जन्म फक्त चांगलं जीवन जगण्यासाठी घेतला आहे. म्हणूनच जीवन चांगलं केंव्हा होईल जर विचार सशक्त असतील व सकारात्मक असतील. विचार तेंव्हाच सकारात्मक व सशक्त होतील जेंव्हा तुम्ही फक्त आणि फक्त पुस्ताकांशी मैत्री कराल. हे एक वेगळंच विश्व आहे आणि या विश्वास रमणारी माणसं ही अतिशय आनंदी असतात हे माझ्या वैयक्तिक संशोधनावरुन मला लक्षात आलेली बाब आहे. हल्ली सोशल मिडीया व उगवत्या तंत्रज्ञानाच्या वाटचालीवरुन असं लक्षात येतं की पुस्तकाच्या दुनियेचा ऱ्हास झाला आहे. पण असं काहीच नाही जसं दारुडयाला दारुचं दुकान न सांगता सापडतं तसेच पुस्तक वाचणाऱ्या वाचनवेडया व्यक्तीला पुस्ताकाचं वाचनालय न सांगता सापडतं. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्याची असलेली पुस्तकांशी मैत्री. त्...

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

Image
  महाराष्ट्र ाच्या पावन भूमीत   एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जन्माला आले ,   महाराष्ट्र ाच्या पावन भूमीत अनेक वीरांनी देशाला वीर योध्दे दिले आहेत .   या मातीत जन्माला येणं म्हणजे नशीबच लागतं .   माऊंट एव्हरेस्टवीर नंदकुमार जगताप यांच्या देशसेवेमुळे व कामगिरीमुळे   महाराष्ट्र ाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे हे मान्य करावेच लागेल .   बीड जिल्हयात ,   अंबाजोगाई तालुक्यात वसलेलं मुडेगाव हे त्यांचं मुळ गाव .   याच गावच्या शूरवीरानं व त्यांच्या टीमने आज जगात आपल्या देशाचं नाव उंचावलं आहे .   माऊंट एव्हेरेस्ट सर करुन सहीसलामत परत येणं म्हणजे जीवघेण्या संकटावर मात करुन जणू मृत्यूच्या दारातून परत येणं .   दोन मजली घराच्या पायऱ्या चढणं सर्वसामान्य माणसाला असाह्य होतं आणि तो धापा टाकायला सुरुवात करतो .   समुद्रसपाटीपासून ८८४८   मीटर उंच असे जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारे नंदकुमार जगताप हे भारतीय सैन्य दलातील चौथा मराठा एल . आय . रेजीमेंट मध्ये कार्यरत असतांना जगताप यांनी एव्हरेस्ट टीममधील दोन नंबर दुकड...