बळीराजाच्या आत्महत्येला कृषी सेवा केंद्र व महावितरण सुध्दा जबाबदार ?


बळीराजाच्या आत्महत्येला कृषी सेवा केंद्र व महावितरण सुध्दा जबाबदार ?

विदयुत दर आकारणी महावितरण कंपनीने अतिरिक्त व अगाऊचे बिलं देऊन कहर केलाय तसेच उधारीच्या व सवलतीच्या नावाखाली खतं, बी-बियाण्यांच्या मागं अर्ध्याहून अधिक कमाई करुन दिन दुबळया बळीराजाला लुटण्याचा प्रकार निश्चितच वाढला असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. कृषी सेवा केंद्रांकडून दुप्पटीने लुट तर महावितरणकडून अतिरिक्त बिलं देऊन गळा घोटण्याचा प्रकार अगदी तारेवरची कसरत करुन पोटाची खळगी भरण्यासाठी, लेकरांची शिक्षणं, कुटूंबाचा उदरनिर्वाह, मुक्या जनावरांचा सांभाळ, नैसर्गिक संकटं यातून पायपीट करुन, मार्ग काढून अनेक संकटांना तोंड देत कृषीप्रधान भारत देशात लाखोंचा पोशिंदा म्हणून ओळख असणारा बळीराजा आपले स्वत:चे हाल करुन इतरांना आजवर जगवत आला आहे. पण त्याच्याच वाटयाला दु:खाचे भोग आले आहेत. त्या होणारी पिळवणूक, त्याला फसवणारे दुष्टजन यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात म्हणजे शेतीसंबंधीत सेवा पुरवणारे कृषी सेवा केंद्र व विदयुत पुरवठा करणारी महावितरण कंपनीचा सिंहाचा वाटा दिसतो याच शंकाच नाही असे या ठिकाणी आवर्जुन सांगावेसे वाटते. त्याचे कारण म्हणजे हंगाम, रब्बीची पेरणी असो वा इतर काही प्रत्येक वेळी कृषी सेवा केंद्र मालक लोक हे त्यांना दुप्पटीच्या दरात बि-बियाणे, रासायनिक खतं, फावरणीसाठी औषधं इत्यादी अशा गोष्टींमध्ये दुप्पट मार्जीन खातांना दिसत आहेत. हया गोष्टी शेतकऱ्याला उधारीच्या स्वरुपात देऊन आलेल्या पिकावर पैसे दया असं म्हणून गरिब बिचाऱ्या शेतकऱ्याकडून लुट करण्याचा कळस केलेला दिसतो. पेरणीच्या वेळी खत, बि-बियाण्याचा तुटवडा दाखऊन असलेल्या किंमतीपेक्षा जास्त पैसे उकळून जणू जिवंत मारण्याचा प्रयत्नच हे लोक करतांना दिसत आहेत. कृषी अधिकारी, परवाना देणारे अधिकारी यांच्या डोळयात माती गेल्यासारखे हे लोक अवैध परवाना देऊन यांची दलाली सरळ रेषेत चालूच आहे हे मात्र नक्कीच हा आरोप नसून हे कोणताही शेतकरी, सर्वसामान्य  माणूस ही गोष्टी सिध्द करुन शकतो, या बाबीसाठी कृषी मंत्रालयाकडून कृषी अधिकाऱ्याकडे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना मिळतात परंतू कृषि अधिकाऱ्यांच्या तालुका असो वा जिल्हा यांच्या कामाच्या प्रणालीमुळे या योजना धुळखात पडल्या असून शेतकऱ्यांना याचा लाभ होत नाही आणि लाभ मिळायचा असल्यास शेतकऱ्या त्यांच्या कार्यालयात चकरा मारून मारुन पायतनं झिजवून श्रम व्यर्थच असेच म्हणावे लागेल. त्यात शेतकऱ्यांडून चिरी मिरी घेऊन हे लोक कामे करतात. कधी कधी तर शासनाच्या योजना हया शेतकऱ्यांसाठी कोण कोणत्या आहेत याचे आकलन हे अधिकाऱ्यांना ही नसते त्यामुळे कोणत्या योजना अस्तित्वात आहेत त्याला लाभ कशा प्रकारे मिळावायचा हे सांगण्यासाठी सेवाभावी संध्या सुध्दा यांच्या सोबत हातमिळवणी करुन श्रीखंड खाण्याचा आनंद लुटतांना दिसत आहेत. कृषी सेवा केंद्र धारक यांच्यावर अधिकाऱ्यांची, संबंधीत प्रशासनाची, कृषी मंत्रालयाची वचक उरली नसल्याने हे प्रकार घडतात. अगोदरच कर्जात बुडालेला बळीराजा याला नाईलाजास्तव हया सर्व गोष्टी व स्वत:ला कर्जात गुंफून घ्यावे लागते याला कसलाही पर्यायच नाही कारण शेतकऱ्याला आजवर कोणी मायबाप तर झालाच नाही असेच दिसते उलट त्याचा सोबत आर्थिक, भावनेषी खेळ केल्याने शेतकरी हा भावनेच्या भारात आत्महत्या करु लागला आहे. खऱ्या  शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याचा आकडा हा अत्यंत अल्प प्रमाणात आहे परंतू उगीच बाऊ करुन काही लोक शासनाकडून मिळाणाऱ्या पैशांचा लाभ घेण्यासाठी इतर प्रकारच्या आत्महत्येला शेतकऱ्याची आत्महत्या संबोधून शेतकऱ्यांना बदनाम करण्याचं षंढयंत्र रचू लागले आहेत. तसेच महावितरण कंपनीच्या बाबतीत सांगायचे झाले तर हयांचे कामकाज तर खरंचआत्महत्येला प्रवृत्त करण्यासारखेच आहे. कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना मोफत विज पुरवठा मिळण्याचे तर सोडाच, कित्येकदा महिन्याला, सहा महिन्याला अथवा वर्षातून एकदा मिळाणारे यांचे विज बीलाचे आकडे डोळे पांढरे होतील एवढे असते. अंदजे बिलं देऊन, त्याच्या शेतातील मिटरचे रिडींग न घेता बिल दिल्यामुळे अव्वच्या सव्वा विज बिल आकारण्याचा प्रताप महावितरण कंपनी करु लागली आहे. दर सहा महिन्याला रिडींग घेणारे हे शेतात जाऊन रिडींग न घेता गावाच्या कट्टयावर बसून, गरीब शेतकऱ्यांचा, सरपंचाचा, पाटलाचा चहा पिऊन उंटावरुन शेळया राखू लागले आहेत. याचाच अर्थ कामात पारदर्शकताच उरली नाही असे स्पष्ट दिसून येते. पालकमंत्री, कृषी मंत्री, विज खात्याचे मंत्री झोपा काढतातयत की काय असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. अगाऊचे विज बिल आल्यास कर्जाचा डोंगर असलेल्या शेतकऱ्याने का म्हणून आत्महत्येचा रस्ता स्विकारु नये हा शेतकऱ्याचा निव्वळ सवाल आहे. प्रत्येकवेळी बळीराजाच्या प्रशनांचे निवारण करण्यासाठी शासनाकडे धाव घेणारे पक्ष, संघटना यावर गप्प का आहेत, शासन दरबारी यांना तिळमात्र किंमत उरली नाही की काय असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांसाठी मायबात समजली जाणारी संघटना आहे पण ही संघटना शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत मुग गिळून गप्प असल्याची भुमिका का म्हणून बजावत आहे याचे उत्तर सध्या तरी गुलदस्त्यातच असतांना दिसत आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्र व महावितरण कंपनी ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदाराच आहे असेच निष्पन्न होत आहे.

शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..