"मोदीराज चांगभलं" ...


"मोदीराज चांगभलं "...

भाजप सरकारने हल्ली जनतेमध्ये स्वतःचा विश्वास संपादन करण्याचं काम सुरु केलं आहे. ते असं की भाजप सरकार कामगिरी दमदार असे बोलून भाजप सरकारचा जाहिरात बाजीवर प्रचंडप्रमाणात खर्च करुन उधळपटटी करण्याचं काम सध्या सुरु आहे. भाजप सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला हे खरे आहे पण या ऐतिहासिक निर्णयामध्ये सर्वसामान्य जनतेचं वाटोळं आणि पैसेवाल्याचं चांगभलं झालं हे स्पष्ट. यात काही टिकात्मक भुमिका नाही वा पक्षविरोध नाही. पण सत्य परिस्थिती लक्षात घेता हल्ली देशभरामध्ये नोट बंदीमुळे बॅंकाच्या पाय-या झिजवले कोणी ? तर ते  सर्वसामान्य गोरगरीब जनतेनं. बॅंकाच्या मागच्या दरवाज्यातून भल्या भल्यांनी आपली गाठोडी रातोरात बदलून घेतली. बॅंकेतील कर्मचा-यांना हातशी धरुन आपल्या ताकतीचा दुरुपयोग ज्यांच्याकडं काळा पैसा आहे त्यांनी केला. मोदींच्या या ऐतिहासिक हजार पाचशेच्या नोटा बंदी केल्यामुळे दोन हजाराच्या पाचशेच्या नविन नोटा छपाई खर्च कागदाचा खर्च वाचवनू जनतेसाठी उपलब्ध करुन दिल्याबददल मोदी सरकारचं स्वागतच आहे. पण या सर्व घटनेमध्ये सर्वसामान्य जनतेच्या जमापुंजीला पूर्णतः विस्कटण्यात आले. याचा विचार कोणी करेल का ? जन धन योजनेच्या खात्यामध्ये मोदी सरकार रक्कम जमा करणार असल्याच्या अफवेनं सर्वसामान्य जनतेला पळता भुई केलं आहे. प्रत्येक बॅंकेच्या दारात रांगाच रांगा, खाजगी ग्राहक सेवा केंद्रामध्येसुध्दा पहाटेपासून रात्री बारा बारा वाजेपर्यंत गोरगरीब जनता खाते उघडण्यासाठी लहान लहान बाळांसुध्दा घेउन तळ ठोकून बसलेले आहेत. हे सत्य चित्र म्हणजे हेळसांडच नव्हे का ? सर्वच कॅशलेस करायचं म्हटलं तर सर्व नियोजनबध्द काम करायला हवं. आजपर्यंत ना काळा पैसा बाहेर आला ना कोणाकडे किती काळा पैसा आहे याची यादी सर्वसामान्य जनतेला मिळाली. यात फक्त सर्वसामान्य जनतेचं वाटोळं झालं पैसेवाल्याचं चांगभलं असंच म्हणावं लागेल.


शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422
hr.shankarchavan@gmail.com

Comments

Post a Comment

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..