'ई' कचरा वाढतोय...


'ई' कचरा वाढतोय...

जगात तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे सर्वच गोष्टी आता पेपरलेस झाल्या आहेत. दिवसेंदिवस जग प्रगतीपथावर जात आहे. ही एक अभिमानाची बाब असू प्रत्येक देशाचा विज्ञान युगात तंत्रज्ञान विकासात भर टाकणे ही अभिमान बाळगण्याची गोष्टी असल्याने युगे युगे ही डिजीटल टेक्नाॅलाॅजी प्रगतीच करेल यात शंक्का नाही. स्मार्ट फोन च्या दुनियेत, इंटरनेच्या अवाढव्य वाढलेल्या जाळयामध्ये सर्वच गोष्टी सोईच्या झाल्याने सर्व कामे अगदी पटा पटा होवू लागल्या आहेत. एकमेकांशी संवाद साधन अधिकच सोपे झाले आसल्याने जगात कोठेही असो संवाद मात्र चालूच आहे. साधारणतः मोबाईलवर इंटरनेट प्रणाली गतिने चालू झाल्यापासून सर्वच गोष्टींचा अतिरेक वाढल्याचे आढळून आले. गेल्या काही वर्षांपासून इंटरनेचा जास्तीत जास्त वापर हा सोशन मिडीयासाठी जास्त व दैनंदिन कामासाठी काहीशाप्रमाणात होत असतांना दिसतोय. माणसाला एका जागेवरुन न उठता सर्वच गोष्टी इंटरनेटमुळे जागच्या जागी मिळू लागल्याने माणूस तसा आळशी झाला आहेच. सोबतच सोशन मिडीयावर तसेच ईमेलींग माध्यमाद्वारे माहतीची देवाणघेवाण होत असल्याने व त्याचा अतिरेक होत असल्याने ई कचरा वाढण्यास भर पडत आहे. सर्वच कामे पेपरलेस झाल्यामुळे तंत्रज्ञानाचा उपयोग जास्तीचा होत असल्याने मानवाने आपल्या फायदयापोटी इतर काही आनावश्यक गोष्टीचा उद्रेक चालू करुन ई कचरा वाढण्यास मतदच केली आहे. सोशन मिडीयावर अनावश्यक त्या पोस्ट करणे जसे. व्हाॅटस्सअॅप, फेसबुक, ट्विटर सारख्या अतिशय लाभदायक माध्यमांचा चांगल्या व आवश्यक त्याच कामासाठी उपयोग न झाल्यामुळे त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. या गोष्टीला कुठे तरी आळा आपणच घाालायला हवा. कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत. रात्री आपरात्री आपण सोशन मिडीयाच्या जगात हरवून जातो. कधी रात्रीचे एक वाजले समजतच नाही. यामुळे आरोग्याकडेही दुर्लक्ष होतांना दिसत आहे. बÚयाच जणांना स्मार्टफोनचा अतिवापर केल्यामुळे डोळयांचे आजार उदभवू लागले आहेत. प्रत्येकाचा मोबाईल उघडल्यानंतर सोशन मिडीयाच्या फोल्डरमध्ये जावून पाहिल्यास फक्त आणि फक्त अनावश्यक गोष्टी म्हणजेच ई कचराच पहावयास मिळतो त्यामुळे मोबाईल खराब होणे, वायरस येणे इत्यादीमुळे आपला महागडा स्पार्टफोन सुध्दा कधी काळी खराब होवू शकतो. याचीही आपल्याला चिंता नाही ? आपण एखादी पोस्ट वाचली कि आपल्याला असं वाटतं ही ही पोस्ट आपण सोशन मिडीयावर पोस्ट करावी जेणे करुन इतरांचा लाभ होईल. परंतू असे न होता हीच पोस्ट इतर युझर्सनी पण वाचलेली असते. त्यामुळे अशा प्रकारच्या अनावश्यक गोष्टींचा अतिरेक होवून ई कचरा वाढण्यास मतद होते. जग ज्या दिशेने वाटचाल करत आहे. ती दिशा योग्य आहे परंतू आपण ज्या दिशेने जावून इंटरनेटसारख्या वरदान असणाऱ्या गोष्टीचा चांगल्या कामासाठी उपयोग न करता इतर वायफळ गोष्टीसाठी जर उपयोग करत असू तर त्याचा आपल्यासाठी उपयोग न होता आपल्यासाठी दुष्परिणाम होणे नव्हे का ? खरं तर ई कचऱ्या  संदर्भात विविध उपाययोजना आखायला हव्यात व यापासून बचाव करण्यासाठी आपण स्वतः व इतरांनाही याबाबत काळीजी व जाणीव करुन देणे महत्वाचे आहे.

शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422,
hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..