साहेब ! मी शेतकरी बोलतोय …
साहेब ! मी शेतकरी बोलतोय … साहेब ! मी शेतकरी बोलतोय … रोज रोज शेतात राब राब राबतोय कितीही मेहनत घेतली तरी पोटाला आर्धीच खातोय वाटलं होतं ऐकेल कोणी माझी हाक होईल कोणी माझ्या आयुष्याच्या प्रगतीचं चाक पण मला आजवर सगळयांनी दिला ठेंग्याचा हात माझ्याविषयी सगळयांच्या मनात पापच पाप पोटभर खाऊन ढेकर देता तुम्ही शिळया तुकडयावरच दिवस काढतो आम्ही असाच संसाराचा गाढा हजारो वर्षे ओढतोय साहेब ! मी शेतकरी बोलतोय … दुष्काळ आला, त्याला पाहुणा समजुन पाहुणचार केला सावकार आला, त्याचाही खिसा भरता केला अजुनही बँकाची कर्ज फेडतोय साहेब ! मी शेतकरी बोलतोय … एसीत बसुन आमच्यासाठी संघर्षाचं नका घेऊ सोंग संघर्ष तर आम्ही करतोय, नका करु तुम्ही नुसतंच ढोंग दुपारचा सुर्य डोक्यावर घ्या मग कळेल तुम्हाला आम्ही कसे कष्ट करतोय साहेब ! मी शेतकरी बोलतोय … मंत्रालयात बसुन फक्तं बोलनं असतं लई सोप्पं कितीही खोटी आश्वासनं दिले तरीही आम्ही आजवर गप्पं आम्ही काय गुन्हा केला तुमच्याकडं नाही पैका आमच्यासाठी एकतरी आयोग लागू करा, एवढं तुम्ही ऐका पोराच्या शिक्षणापाई आज सुध्दा मी...