साहेब ! मी शेतकरी बोलतोय …
साहेब ! मी शेतकरी बोलतोय …
साहेब ! मी शेतकरी बोलतोय …
रोज रोज शेतात राब
राब राबतोय
कितीही मेहनत घेतली
तरी पोटाला आर्धीच खातोय
वाटलं होतं ऐकेल कोणी
माझी हाक
होईल कोणी माझ्या
आयुष्याच्या प्रगतीचं चाक
पण मला आजवर सगळयांनी
दिला ठेंग्याचा हात
माझ्याविषयी सगळयांच्या
मनात पापच पाप
पोटभर खाऊन ढेकर देता
तुम्ही
शिळया तुकडयावरच दिवस
काढतो आम्ही
असाच संसाराचा गाढा
हजारो वर्षे ओढतोय
साहेब ! मी शेतकरी बोलतोय …
दुष्काळ आला, त्याला
पाहुणा समजुन पाहुणचार केला
सावकार आला, त्याचाही
खिसा भरता केला
अजुनही बँकाची कर्ज
फेडतोय
साहेब ! मी शेतकरी बोलतोय …
एसीत बसुन आमच्यासाठी
संघर्षाचं नका घेऊ सोंग
संघर्ष तर आम्ही करतोय,
नका करु तुम्ही नुसतंच ढोंग
दुपारचा सुर्य डोक्यावर
घ्या
मग कळेल तुम्हाला
आम्ही कसे कष्ट करतोय
साहेब ! मी शेतकरी बोलतोय …
मंत्रालयात बसुन फक्तं
बोलनं असतं लई सोप्पं
कितीही खोटी आश्वासनं
दिले तरीही आम्ही आजवर गप्पं
आम्ही काय गुन्हा
केला तुमच्याकडं नाही पैका
आमच्यासाठी एकतरी
आयोग लागू करा, एवढं तुम्ही ऐका
पोराच्या शिक्षणापाई
आज सुध्दा मी आनवाणीच चालतोय
साहेब ! मी शेतकरी बोलतोय …
सांगता येत न्हाय
साहेब कोणती दोर लागेल गळयाला
माझ्या तेराव्याला
सुध्दा लाज वाटेल ‘त्या’ कावळयाला
नका खेळू साहेब आमच्या
भावनांशी,
एक तरी घास जाऊदया
आमच्या मुखाशी
तुम्ही सत्तेतले अन
विरोधातले मात्र सगळेच तुपाशी
आम्ही काढल्या कित्येक
रात्री उपाशी
उदयाचा दिवस चांगला
येईल म्हणून रात्री सगळं गप गिळून झोपतोय
साहेब ! मी शेतकरी बोलतोय …
व्यथा आमच्या फक्त
जाणून घेता
हातामध्ये आश्वासनाचं
आम्हाला लाल गाजर देता
निवडणुकीपुरताच विषय
बनतो आम्ही
सांगा साहेब आमची
कधी किव करणार तुम्ही
लेकरांना सांभाळ गं
! शेवटी कारभारणीला सांगातोय
या सर्वाला कंटाळून
मी आत्महत्येचा मार्ग धरतोय
साहेब ! मी शेतकरी बोलतोय …
मला वाचवा साहेब,
देशाला गरज आहे पोशिंदयाची
आत्ता खरंच गरज आहे
आम्हाला तुमच्या मतदीची
जाता जाता शेवटचं
एवढंच सांगतोय
साहेब ! मी शेतकरी बोलतोय …
-
शंकर चव्हाण, अंबाजोगाई 9921042422
thank you
ReplyDelete