अरे गुंडांनो विचार मारता येतात का ?
अरे
गुंडांनो विचार मारता येतात का ?
लोकांना
व्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे लोकशाहीचा असाही दुरूपयोग होतोय. मुळात या देशात
लोकशाही नसून गुंडशाही चालू आहे. फक्त नावालाच लोकशाही. देशाची व्यवस्थाच चुकीची
आहे असंच मी म्हणेन. गुन्हेगाराला सोडून निर्दोशालाच सजा देण्याचं काम
गुंडशाहीच्या माध्यमातून व्यवस्था करत असल्याचे समजते. धिक्कार आहे अशा लोकशाहीचा
व असल्या व्यवस्थेचा. गुन्हेगाराला पोसणं यात करसली आलीय लोकशाही. मनाला वाटेल
तेव्हा निर्णय घ्यायचे. मनाला वाटेल तेव्हा गुन्हेगाराला निर्दोष सोडून दयायचं.
गुंडाना मोकाट सोडून त्यांना वेगळा कायदा व सर्वसामान्यांना वेगळा कायदा याला मी
तर हुकूमशाही व ढिसाळ राज्यकारभार चालवणारी यंत्रणाच म्हणेल. किती दिवस झाले
कोपर्डी प्रकरणाला. साधं राज्याचे मुख्यमंत्री या प्रकरणाविषयी गंभीर नाहीत.
निवडणुकीमध्ये मग्न असून राजकारण करण्यापुरते जुने प्रश्न उपस्थित करुन त्याला उजाळा
देवून तेच तेच प्रश्न उपस्थित करुन राजकारण करायचं. विट आलाय या सगळया गोष्टींचा.
दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि आता जेष्ठ आंबेडकरवादी लेखक डॉ. कृष्णा किरवले
यांचा खून झाला. मारेकऱ्यांना का नाही शोधत पोलीस. सत्ताधाऱ्यांच्या
मंत्रीमंडळातले गृहखाते, पाेलीस प्रश्नासन झोपी गेलं आहे की काय ? का त्या वर्दीला
राजकारणाची सर्दी झालीय हे तरी स्पष्टपणे सांगा जनतेला. असे विचारवंताचे खून करुन
नेमकं मिळतं काय या गुंडाना ? का करतात अशा प्रकारचे गुन्हे ? नेमकं काय साध्य
करायचं आहे ? खाकी वर्दीला आता जाग कधी येणार असे विविध सवाल संतप्त जनता करत आहे
आणि महत्वाचं म्हणजे नुसते राजकारण्यांच्या नावाने खडे फोडून चालणार नाही कारण
सरकारी कर्मचारी यांच्या कामामध्ये जोपर्यंत पारदर्शकता व गिळाऊ वृत्ती संपत नाही
तोवर भारत देश सुजलाम सुफलाम होत नाही. कोपर्डी प्रकरण असेल, दाभोळकर हत्या प्रकरण,
पानसरे हत्या प्रकरण अशा विचारवंताचे खून होत असतांना राज्यशासन व प्रशासन काय
झोपा काढतंय का ? पोलीस प्रशासन म्हणतंय 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या
ब्रीदवाक्याचा तरी अवमान करुन नका ? या देशाला विचारवंताची गरज आहे आणि महत्वाचं
म्हणजे विचारावंतांचे खून करुन त्यांचे विचार मारता येत नसतात हे तरी
या खूनी गुंडाना कळतंय का ? आणखी किती विचारावंताचे बळी ही व्यवस्था घेणार कोणास
ठाऊक. असेच जर चालू राहिले तर लक्षात ठेवा जनता माफ नाही करणार ! सामान्य
माणसामध्ये एक असामान्य ताकद असते याचा विचार नक्की कुठं तरी करावा लागेल तरच
लोकशाही टिकून राहिल. कोपर्डी सारख्या गंभीर प्रकरणानंतर सुध्दा या झोपलेल्या
शासनाला जाग आली नाही. गुन्हेगाराला फाशी देण्याचं सोडून कोणत्या क्षणाची वाट हे
प्रशासन बघ आहे याचं कोडं आणखीनही सुटलेलं नाही. असे विचारवंत मारुन त्याचे विचार
मारता येत नसतात हे माहिती असणं तितकंच महत्वाचं आहे.
- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com
Comments
Post a Comment