किडया-मुंग्यांसारखे मरण नको रे बाबा !
किडया-मुंग्यांसारखे मरण नको रे बाबा ! -देशात दर 4 मिनीटात एक रोड अपघाताचा बळी- वर्तमानपत्र उघडले, टी.व्ही चालू केला, सोशल मिडीयासह विविध माध्यमांमधून देशभरामध्ये अपघाताच्या घटना पहावयास मिळतात. त्या इतक्या भयानक असतात की, पाहिल्यास मन उदास व जमीन पाय ठेवू देणार नाही. रोज किडया-मुंग्यांसारखी माणसं मरतांना आपण पाहतो, वाचतो, ऐकतो व नकळत विसरुनही जातो. पण त्यावर तोडगा काढण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही. नेमके अपघात का होतात व त्यासाठी उपाययोजना म्हणून ठोस पाऊल उचलत नाहीत किंवा एखादा सक्षम पर्याय शोधत नाहीत. देशात रोज किती तरी निर्दोश लोकं या अपघातासारख्या बकासुरास बळी पडतात. कधी समोरचा वाहन नीट चालवत नाही, कधी वाहन चालकच मद्यपान करुन वाहन चालावतो, कधी मोबाईल वर बोलतांना, तर कधी रात्रभर वाहन चालवल्यामुळे पहाटेच्या डुलगी लागल्यामुळे अशा विविध प्रकारचे कारणे अपघात होण्यासाठी पुरेशी आहेत. प्रत्येकवेळी शासनालाच दोष देणं फारसं चुकीचं ठरतं. जीव आपला आहे, शासनाचा नाही हे आपण कुठंतरी पार विसरुन गेलो आहोत. लक्ष आपले वाहन नीट चालवण्याकडे नसून धावपळ, घाई, व लवकर पोहोचणे याकडे जास्त असते. हल्...