पुन्हाचा अन् उद्याचा प्रपंच करणारे शासनाचे ‘जावई’



पुन्हाचा अन् उद्याचा प्रपंच करणारे शासनाचे ‘जावई’

महाराष्ट्र हा इतर राज्यांच्या बाबतीमध्ये सहनशिल राज्य आहे. त्या राज्यामध्ये शासनाचे सर्व शासकिय विभाग विचारात घेता ग्रामपंचायत कार्यालय ते मंत्रालय हा प्रवास जनसामान्यांच्या कामामध्ये पुन्हाचा अन् उदयाचा प्रपंच करणाऱ्या शासनाच्या जावयांमुळे सर्वांनी अनुभवलेला असेलच. यातून कोणताही घटक वगळा जात नाही. नागरीकांनी त्यांच्या पायऱ्या झिजवणे, शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत त्यांचे खिसे गरम करणे, त्यांच्या मनमानी कारभाला बळी पडणे, अरेरावी, तुच्छ वागणूक, परिसर कार्यालय अस्वच्छ अशा विविध गोष्टींनी वेढलेले कार्यालय म्हणजे शासकिय कार्यालय. त्यामध्ये काम करणारे शासनाचे जावई. याच शासनाच्या जावयांकडे एखादे काम घेऊन जा, गेल्याबरोबर त्यांच्या त्या कपाळावरील अठ्ठया पाहून काम होण्याची संकेत मिळतात, त्यांची ती किडणी मागीतल्यासारखी नजर भुकेल्या वाघासारखी वाटते, दिवसातून चार वेळा कार्यालीयन कामकाज सोडून ऑफीसात कमी चहाच्या टपरीवर दिसणारी बागडबिल्ले आपणास जास् पहावयास मिळतील. एवढेच नव्हे एखादयाने जाब विचारलाच तर काय वाकडं करायचंय ते करुन घे, असे विविध अनुभव प्रत्येकाला आले असतीलच, पण कोणी मांडत नाही, कोणी बोलतही नाही, आपले वशिला लावून काम झाले की, झाले ! दुसऱ्याचे काही का होईना. हा संकुचित विचार जोपर्यंत मनात फिरत राहिल तोपर्यंत ही व्यवस्था हे जावई सुधरणार नाहीत. एवढा मोठा शासनाचा पगार असतांना कशाला लागते यांना चिरीमिरी, त्याशिवाय धुळखात पडलेल्या फाईल कपाटातून सहिसाठी निघण्याचं नावच घेत नाहीत. ही परिस्थिती सर्वांनाच माहिती आहे, पण या राज्यातील सुजान नागरीक मात्र चुप्पी करुन मुग गिळून गप्प आहेत. हेच या राज्याचं दुर्देव आहे. जाती जातीचे भांडणे असू दया मग येतील एकत्र, मोर्चे, राजकारण्यांच्या मागे गोंडा घोळणं हे सर्व कामे अगदी सांगता जमतील यांना, पण एखादा शासनाचा जावई जर काम करत नसेल तर दुसरा दीड शहाणा आपल्या मित्राला मदत करायचे सोडून, जाऊ दे, दे शे पाचशे अणि हो मोकळा, कशाला किट किट करत बसतोस, अशी समजूत काढतो, हे अशा वृत्तीचे लोक जोपर्यंत आपल्या आवती भोवती असतील तोपर्यंत आपल्या राज्याची व्यवस्था डोळयाला पट्टी बांधल्यागत असेल. तहसिल, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, कोर्ट, मंत्रालय इतरत्र जरा नजरा फिरवून बघा, किती दलालांनी गोंधळ माजलवलाय ते. कोणतेही शासकिय काम करायचे झाले तर नागरीकांना सरळ मार्गाने अधिकाऱ्यापर्यंत साध्या साध्या कामांना एजंटचे तळवे चाटल्याशिवाय कामं होत नाहीत. ही व्यवथा मोडखळीस निघायला हवी, असे प्रत्येकाला वाटते परंतू, यासाठी पुढाकार घेईल कोण ? त्यात अधिकाऱ्यांकडे नागरीक गेलाच तर त्याला उदध्टपणे मोठया आवाजात बोलले जाते, थोडयावेळाने या, पुन्हा या, उदया या, अमूक अमूक तारखेला या वगैरे वगैरे. परंतू तेच काम जनतेच्या पैशांनी यांना मिळणारा पगार, सोबतच एजंटकडून, सहिसाठी टेबलाखालून घेतलेले पैसे यातच या सर्व जावयांचे सौख्य सामावलेले असते. कधी कधी डोक्यात विचार येतो , की हे शासनाचे पोसलेले जावई यांना जर एवढाच कामाचा कंटाळा असेल, शासनाच्या कामांचा एवढाच वैताग आला असेल तर हे नौकरी का बरं सोडून राजीनामा देऊन गावाकडे जात नाहीत ? दाखवतांना असे दाखवतात जणू यांना नागरीकांच्या सेवेचे काही देणे घेणेच नाही, उदया या, परवा याहे काय चालवले आहे. आपण खरंच जनतेचे सेवक आहात हे विसरलात की काय, या सर्व गोष्टींना काही अपवाद असतीलही पण, पुन्हाचा उद्याचा प्रपंच करणारे बरेच सापडतील. आत्ता तर हातामध्ये स्मार्टफोन आला आहे, त्यात अंबानीचे इंटरनेट मोफत, मग तर काय ऑफीसात दिवसभर फेसबुक आणि व्हाट्स मध्ये मज्जाच मज्जा, आपण ऑफीसात आहोत याचंही गांभीर्य यांना अजिबात नाही, आपली नियुक्ती कोणत्या कामासाठी केलेली आहे, हे काम बाजूला ठेवून कामाकाजातील अधिकतम वेळ हा त्यांचा मोबाईल, चहाच्या टपरीवर, गप्पा मारण्यात, एकमेकांची टिंगल टवाळी करण्यात टाईमपासमध्ये जातो असेही बरेच वेळेस पहावयास मिळते. त्यामुळे खरंच का शासन दरबारी अशा प्रकारे फुक्कट पगार खायला मिळतो म्हणून उदयाचा भारत असणारी तरुणाई सरकारी नौकरीच्या मागे शासनाचे जावई होण्यासाठी धावत असतील ? कधी कधी तर खरंच असं वाटतं. एखादया सामान्यातल्या अतिसामान्य नागरीकांच्या सेवेसाठी आपण नियुक्त केलो आहोत हे भान ठेवून जर सर्व कामं हे आपले कर्तव्य आहे ते जबाबदारीने केलेच पाहिजे असे जेंव्हा प्रत्येक शासनाच्या जावयांना वाटेल तेंव्हा राज्याची  देशाच्या व्यस्थेला नावलौकीक होण्यासाठी जगात कोणीच रोखू शकणार नाही. शासन दरबारी तर अनेकांची दिवसेंदिवस कामं वाढत आहेत. राज्यातील सर्व शासनांच्या जावयांना विनंती आहे की, बाबांनो, आपण ज्या पदावर कोणत्या कामासाठी नियुक्त आहात याचे भान ठेवा , जे जाबाबदारीने कामं करतायत त्यांचे कौतुकच आहे त्यांच्या पुढील कार्यास नागरीकांच्या शुभेच्छा साथ असेलच, पण जे कामचुकारपणा करुन जनेला नाहक त्रास देतील तेंव्हा जनता रस्त्यामध्ये उभे करुन सोलून काढल्याशिवाय राहणार नाही हे मान्य करावेच लागेल. जे जबाबदारीने वागतील त्यांचा सत्कारच होईल, बरं ! सत्कारावरुन आठवलं, आज काल नवीन फॅड शासनांच्या जावयांमध्ये पहावयास मिळते, ते म्हणजे ही लोकं आफीसात कमी पण विविध कार्यक्रमांमध्ये जास्त बोलावले जातात, लग्न, मुंज, उदघाटन, सोहळे, पुरस्कार वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे वगैरे पण लक्षात असू दया जनतेची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा आहे. ही जाबाबदारी पार पाडतांना आपल्या मनाला प्रश्न विचारा आपण नेमके काय करायचे. एवढे सामाजिक कार्य करावेसे वाटतंच असेल तर कोस कोस दूरून येणाऱ्या नागरीकांचे हाल ओळखा त्यांना न्याय देण्याचे काम करा. म्हणजे तुम्ही आयुष्यात येऊन काही तरी केले असे तुम्हाला अभिमानाने नक्कीच वाटेल. आपल्या कडे आलेल्या कोणत्याही जनतेला पुन्हा या, उदया या, थोडया वेळाने या, अमूक अमूक तारखेला या असा प्रपंच आपल्याकडून होऊ नये हीच अपेक्षा !
- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..