जातीवरुन लायकी ठरवणारा देश !
जातीवरुन लायकी ठरवणारा देश ! घरातून बाहेर पडलं की, प्रत्येकाला समाजात वावरंत असतांना समाजामध्ये नवनविन माणसं भेटतात, नविन ओळख निर्माण करायची असेल तर प्रथम आपलं नाव सांगावं लागते, अर्थात स्वत:चा अल्पसा परिचय दयावा लगतो. ही खूप सामान्य व गंभीर बाब नसली तरी त्यापासून निर्माण होणाऱ्या भयावह संकटांना प्रत्येकाला सामोरे जावेच लागते. त्यात आपला देश अठरा पगड जातीचा, अन अठरा विश्व दारिद्रयात असला तरी, इतर देशांपेक्षा गरीब देश म्हणून ओळखला जातो व लोकसंख्येच्या बाबतीत सध्या तरी दुसरा क्रमांक लगतोय, तो पहिला ही होईल कारण लोकसंख्या एवढी झपाटयाने वाढत आहे की, त्याचा परिणाम हा सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाल्याशिवाय रहात नाही. यंदाच्या वर्षी तरी देशात अमुलाग्र बदल होईल. सत्तापरिवर्तन केल्यास देश खरंच स्वतंत्र होईल. भेदभाव, जातीव्यवस्था, धर्मव्यवस्था, श्रेष्ठ, कनिष्ठ, गरीब श्रीमंत, हे असणारे भेद कमी प्रमाणात पहावयास मिळतील. पण नाही ! हे काही होणारच नाही, सक्षम पर्याय मिळावा, याला काही मर्यादा असावी. पण तेही नाही ! असो, असं मी कदापीही म्हणणार नाही. कारण शंभर टक्के प्रबोधन करायचं आणि...