जातीवरुन लायकी ठरवणारा देश !
जातीवरुन लायकी ठरवणारा देश !
घरातून बाहेर पडलं की, प्रत्येकाला समाजात वावरंत असतांना समाजामध्ये
नवनविन माणसं भेटतात, नविन ओळख निर्माण करायची असेल तर प्रथम आपलं नाव सांगावं लागते,
अर्थात स्वत:चा अल्पसा परिचय दयावा लगतो. ही खूप सामान्य व गंभीर बाब नसली तरी त्यापासून
निर्माण होणाऱ्या भयावह संकटांना प्रत्येकाला सामोरे जावेच लागते. त्यात आपला देश अठरा
पगड जातीचा, अन अठरा विश्व दारिद्रयात असला तरी, इतर देशांपेक्षा गरीब देश म्हणून ओळखला
जातो व लोकसंख्येच्या बाबतीत सध्या तरी दुसरा क्रमांक लगतोय, तो पहिला ही होईल कारण
लोकसंख्या एवढी झपाटयाने वाढत आहे की, त्याचा परिणाम हा सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत
झाल्याशिवाय रहात नाही. यंदाच्या वर्षी तरी देशात अमुलाग्र बदल होईल. सत्तापरिवर्तन
केल्यास देश खरंच स्वतंत्र होईल. भेदभाव, जातीव्यवस्था, धर्मव्यवस्था, श्रेष्ठ, कनिष्ठ,
गरीब श्रीमंत, हे असणारे भेद कमी प्रमाणात पहावयास मिळतील. पण नाही ! हे काही होणारच
नाही, सक्षम पर्याय मिळावा, याला काही मर्यादा
असावी. पण तेही नाही ! असो, असं मी कदापीही
म्हणणार नाही. कारण शंभर टक्के प्रबोधन करायचं आणि शंभर टक्के जातीव्यवसथेमध्ये बदल
करायचा असा शंभर टक्के निश्चय मी केलेलाच असल्यामुळे. मुळ मुद्दा असा आहे की, आपल्या
देशामध्ये विविध जातीचे, पंथाचे, धर्माचे लोक लोकशाहीच्या राजवटीमध्ये लोकांनी स्थापन
केलेल्या लोकशाही राज्यामध्ये एकत्र राहतात. पण ते गुण्यागोविंदाने राहतात हे वाक्य
त्याला जोडू आले असते तर देश हा व्यवस्थित प्रगतीकडे चाललाय असं म्हणायल काहीही हरकत
नव्हती. मात्र तशी हरकत आहेच की, कारण या देशात सख्खे भाऊ एका घरात गुण्यागोविंदाने
रहात नाहीत तर देशाचा विषय दूरच. असा देश कसा बरं गुण्यागोविंदाने राहिल ! बस एवढंच ! जाती व्यवस्थेवरुन एखादयाची लायकी कशी
ठरवली जाते ते मी दोन ओळीत स्पष्ट करतो, दोन माणसं, व्यक्ती, भारताचे नागरीक एकत्र
भेटतात. मी या ठिकाणी जातीचा अजितबात उल्लेख केलेला नाही. ‘माणसं’ म्हणजे निसर्गव्यवस्थेचे दोन जीव, प्रथम यांची भेट
एका विशिष्ट ठिकाणी झाली, तेंव्हा त्यांनी दोघांनी एकमेकांची ओळख करुन घेण्यासाठी एक
शब्द वापरला, नमस्कार ! नमस्कार हा झाला मराठी शब्द, लंडन, अमेरिकेत भेट झाली असेल
तर इंग्रीजीमध्ये नमस्कार, किंवा हाय असा शब्दप्रयोग झाला असता. त्यानंतर एकमेकांना
त्यांनी नावं विचारायला सुरूवात केली. कारण नाव माहित असल्याशिवाय ओळख होण्यासाठी पुढची
पायरी कोणतीच नाही. फक्त एकमेकांना पाहिल्यास व चेहरा लक्षात ठेवल्यास पुन्हा कधी भेटलं
तरी ओळख ही तेवढी भक्कम राहणार नाही. आता अचानक भेट होणं, आणि भेट घेणं याची विविध
कारणं आहेत, पण नावांनी ओळख झाल्यानंतर मात्र या ठिकाणी जातीचा विषय आडवा येतोच. तो
कसा काय ? तो म्हणजे संपूर्ण नाव सांगितल्यानंतर, त्याच्या अडनावावरुन मनामध्ये त्याची
जात कोणती असेल याबाबत तर्क लावला जातो, म्हणजे लॉजीकच. तो तर्क लागला नाही तर त्याला
विचारलं जातं अमूक अमूक म्हणजे कुठले ? तो सांगतो मी अमूक अमूक गावचा ! हो का ! मग
या अमूक गावचे म्हणजे त्या गावात अमूक अडनावाचे अमूक जातीने आहेत नव्हं ! नाही, मी तर अमूक जातीचा, हो का ! मला वाटलं अमूकच आहात
की काय ? मग पुढे काय करता वगैरे वगैरे असे संभाषन होऊन ओळख होते व पुढे जे काय व्हायचे
ते आपोआप होत राहते. पण, खरा गोंधळतर अमूक अमूक म्हणजे अमूक अमूक जातीचे का ? असा सवाल
जेंव्हा कानावर येतो तेंव्हा मित्रहो आपली जात कोणती हे दुसऱ्याला सांगावी लागतेच सोबतच
समोरच्या व्यक्तीला आली जात कोणती असेल, कोणती आहे, मग ती उच्च आहे की, अचून शुद्र
वगैरे वगैरे ही जाणून घेण्याची फार मोठी उत्सुकता लागून राहिलेली असते, थोडकयात ओढ
म्हणाल तरी चालेलच की, डिजीटल युगामध्येसुध्दा जात पाहुन लायकी ठरवण्याचं काम माणुस
करत आहे. ही फार मोठी शोकांतीका. त्यात महाराष्ट्र
तर पुरोगामी विचारधारा जोपासणारा, पण तरीही जातीवरुन त्या व्यक्तीची लायकी ठरवणं हे
कितपत योग्य ? किंवा ते चुकीचे असतांनाही त्याचा अनेकांना काहीच फरक पडत नाही ही फार
मोठी खंताची बाब आहे. एक छोटसं उदाहरण सांगतो, जेंव्हा दवाखान्यामध्ये एखादयाला रक्ताची
आवश्यकता असते तेंव्हा रक्त फक्त रक्त गटावरुन जूळवून रक्त दात्याचे रक्त दिले जाते,
तेंव्हा मात्र आपल्याकडे विचार केला जात नाही,
की, तो हिंदू, मुस्लिम किंवा सिख किंवा इतर कुठल्या जाती धर्माचा आहे. माणसाच्या शरीरामधील
रक्ताला जर जात नसेल तर आपण जात लावणारे कोण ? एवढेच नव्हे तर त्या जातीवरुन एखादयाची
लायकी ठरवणारे आपण तेवढीही लायकी नसणारे कोण ? सध्या तर जातीव्यवस्थेने पार गोंधळ माजवलाय,
महापुरूष जातीव्यवस्थेने वाटून घेतले, मंत्री वाटून घेतले, पक्ष, संघटना, संस्था, एवंढच
काय तर या जातीव्यवस्थेच्या विळाख्यात अडकलेलो आपण या सुंदर जीवनामध्ये याच जातीमुळे
एकमेकांच्या जीवाचे वैरी बनलो. माणसाला जीवनात येऊ सुंदर जीवन जगण्यासाठी निसर्गाने
एवढे मोठे सुंदर जग बनवले. त्या निसर्गाशीच आपण खेळ करुन जनजीवन विस्कळीत करण्याचं
काम करतो आहोत हे कुठंतरी पार विसरुन गेलो आहेत. मुळ मुद्दा सांगायचा एवढाच आहे की,
बाबांनो किमान भेटल्यानंतर तरी एकमेकांच्या नावावरुन, अडनावावरुन, किंवा त्याच्या जातीवरुन
त्याची लायकी ठरवू नका, कारण जात माहिती करुन घ्यायची असेल तर या विश्वामध्ये माणसू
हीच एक जात आहे. त्या जातीवरुन व्यवस्था बिघडू देऊ नका, भांडणे करु नका, जातीय दंगली,
सोशल मिडीयाच्या युगात जातीय तेढ निर्माण करुन नका व एखादयाची लायकी ही त्याच्या जातीवरुन
ठरवू नका. बस एवढंच ! …
- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com
Comments
Post a Comment