व्हाट्सअँप, फेसबुकमुळे दूर गेलेल्या मित्रांना लुडोने एकत्र आणले, पण, लुडोच्या वेडया नादापाई मैत्रीचं नातं जुगारात गुंतले.
व्हाट्सअँप, फेसबुकमुळे दूर गेलेल्या
मित्रांना लुडोने एकत्र आणले,
पण, लुडोच्या वेडया नादापाई मैत्रीचं
नातं जुगारात गुंतले.
चहाच्या
टपरीवर, भिंतीच्या कठडयावर, रस्त्यांच्या दुभाजकांवर, बगीचामध्ये, मिळेल त्या ठिकाणी
दोन मित्र किंवा चार मित्रांनी मिळून खेळायचा हा मोबाईल खेळ हल्ली सर्रास पहावयास मिळतोय.
जिकडं नजर जाईल तिकडं टाईमपास म्हणून, पैसे लावून अर्थात जुगारच अशा प्रकारे हा खेळ
खेळणार मित्र समूह पहावयास मिळतोय. व्हॉट्सॲप, फेसबुक व इतर सोशल मिडीयामुळे मोबाईलमध्ये
डोकं घालून एकटं एकटं अनेक ठिकाणी बसलेली मंडळी आपण अनेक ठिकाणी पाहिली असेल. मित्र
मित्र एकमेकांच्या शेजारी बसून सुध्दा मोबाईल मधील सोशल मिडीयाच्या अति वापरामुळे एकमेकांकडे
पहायला सुध्दा वेळ नव्हता बोलण्याचा प्रश्न तर दूरच. अशा प्रकारे लागलेला नाद आता लुडो
नामक मोबाईल खेळामुळे मैत्रीमधील भिंत आता पार कोसळली असून मित्रांना एकत्र आणण्याचं
काम या खेळाने नक्कीच केलं आहे. मात्र या खेळाचे रुपांतर आता मैत्रीच्या नात्यापलीकडं
गेलं असल्यामुळे एक वेगळीच भिती निर्माण झाली आहे. कारण हा खेळ आता खेळ राहिला नसून
तो आता पैशांवर लावला जाणारा सट्टा, जुगार बनला आहे. ही एक वेगळीच भिती आता तरुणाईकडं
पाहिलं की वाटते. हा खेळ खेळत असतांना हरणं किंवा जिंकणं हे सहज स्वभवासारखं जणू नैसर्गिक
प्रवृत्तीसाखं एक अंग आहे. त्यामुळे या खेळाच्या सरतेशवटी कोणी तरी जिंकणं आणि कोणीतरी
हरणं हा नियमच आहे. यामुळे कदाचित मैत्रिच्या नात्यामध्ये वैमणस्य येण्याची दाट शक्यता
नाकारता येत नाही. जर हा खेळ टाईमपास म्हणून खेळला गेला तर याचा धोका किंवा याबात चिंता
करण्याची अजिबात आवश्यकता नाही. परंतू जर तरुणाई पैशांवरती बेटींग लावत असेल तर नक्कीच
कायदयाच्या रक्षकांनी, पालकांनी व संबंधीतांनी यावर पायबंद घालण्यासाठी व तरुणाईला
समजावून सांगण्यासाठी यात त्वरीत लक्ष घातलेलेच बरे. देशात या खेळमुळे वैर निर्माण
झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. मैत्रीच्या आड जर पैसा आला तर यामुळे एकमेकांवर प्राणघातक
हल्ले झाल्याच्या सुध्दा बऱ्याच घटना ऐकल्याच्या चर्चाही कानावर आल्या आहेत. सोशल मिडीयाच्या
अतिवापरामुळे तरुणाई अनेक विचित्र परिणामास बळी पडत असल्यामुळे या खेळामध्ये जास्त
शिक्षणाकडे, कामधंदयाकडे अतिदुर्लक्ष होत असल्याचे सर्व्हेक्षणातून दिसून आले आहे.
याबाबत तरुणाईला विनंती आहे की, बाबांनो, असल्या नादापाई मैत्रीमधली माणुसकीच्या भिंतीला
तडा जाऊ देऊ नका. सोशल मिडीयाचा अतिवापरामुळे आपल्या नयनांना त्रास होईल व दृष्टी कायमस्वरुपी
जाण्याला आमंत्रण देऊ नका. असल्या भानगडीत पडण्यापेक्षा आपल्या भाऊ, बहिण, पालक व आपल्या
परिवारासाठी वेळ काढा. मैत्री ही विचारांची देवाणघेवाण केल्याणे, एकमेकांची मदत केल्याने,
सहकार्याच्या भावनेने टिकते, वाढते व अनंत मैत्री भावना जागवणारी असते हे लक्षात असायला
हवं. अशा प्रकारचे खेळ किती तरी येतात व जातात. हे एक प्रकारचे वेड लागलेले आहे. देश
घडवायचा असेल तर याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. हल्ली आणखी एका खेळाचे वेड अगदी लहानांपासून
मोठयांपर्यंत त्याची लागण झाली आहे. त्या खेळाचे नाव आहे. ब्लू व्हेल. या खेळामुळे
तर तुम्ही कल्पाना सुध्दा करु शकणार नाही की हा खेळ खेळल्यानंतर पुढे काय होते. या
खेळामध्ये अशा काही पायऱ्या खेळाव्या लागतात की शेवटचा टप्पा हा आत्महत्या करण्याचा
येतो. याचं ताजं उदाहरण म्हणजे मुंबईमध्ये एक अल्पवयीन मुलाने घराच्या छतावरुन उडी
मारुन या खेळाच्या शेवटच्या टप्पा खेळलयामुळे आत्महत्या केल्याची घटना आपण ऐकलीच असेल.
तर मित्रांनो तुम्हाला एक मित्र या नात्याने मैत्री दिवसानमित्त शुभेच्छारुपी एवढीच
विनंती करीन की मैत्री टिकवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा व मैत्रीच्या माणुसकीच्या
भिंतीमध्ये अशा वायफळ खेळांना मुळीच जागा देऊ नका. देशाच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी
देशप्रेमी होऊन सहकार्य करा. आपल्या परिवाराला जास्तीचा वेळा दया हेच खरे जीवन आहे.
अशा सुदंर जिवनाचं वाटोळं होऊ नये यासाठी अशा नको त्या गोष्टींना अजिबात थारा देऊ नका.
जीवन ही एकदाच मिळाणारी व सुदंर अशी नैसर्गिक देण आहे त्याला सुंदर पध्दतीने, आनंदाने
व दिलखुलास जगा, बस एवढंच …
- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422,
hr.shankarchavan@gmail.com
hr.shankarchavan@gmail.com
खूप छान शंकरजी
ReplyDeleteThank you Ganeshji
Delete