आधी मन स्वच्छ करा, देश आपोआप स्वच्छ होईल !


आधी मन स्वच्छ करा, देश आपोआप स्वच्छ होईल !
आपल्या देशाचं दुर्देव एवढंच आहे की, आपल्या देशात स्वच्छताविषयी जनजागृती करावी लागते. देशात घाणीच्या पसरलेल्या बरबटलेल्या शहरांमुळे मानीव आरोग्यावर हानीकारक परिणाम होतोय तरी देशातील अस्वच्छता काही नाहीसं होण्यास तयार नाही. देश स्वच्छ करण्यासाठी अभियान राबवावे लागतात, जनजागृती करावी लागते. ही देशासाठी कौतुकाची नाही तर मान खाली घालण्याची बाब आहे. स्वच्छता बाळगा, कचरा इतरत्र टाकू नका, येथे थुंकू नका, कचरा पेटीचा वापर करा, शौचालयाचा वापर करा वगैरे वगैरे पाटया या देशात लावल्या जातात. हे काम ग्रामपंचायत, नगर पालीका, महानगरपालिका इतर सबंधीत कार्यालयांना करावे लागते. जिथं करुन नका अशा नावाची पाटी लिहिलेली असते त्या ठिकाणी मुद्दाम आपल्या देशातल जनता तिथं उलट पध्दतीने काही तरी विरोध दर्शवुन विकृती केल्याशिवाय रहात नाही. स्वच्छ भारत अभियानावर आपल्या देशामध्ये कोटयावधी रुपये खर्च होतो. परंतू जनतेला त्याचा काहीही फरक पडत नाही. नेहमी राज्यकर्त्यांना, प्रशासनालाच दोष दिल्यामुळे जनतेवर हे संकट ओढावले गेले आहे असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. भोगा आपल्या कर्माची फळं असं ! अस्वच्छतेचं दु: जनतेच्या वाटयाला येण्याचं मुख्यं कारण हे स्वत: देशातील नागरीकरच आहेत.   व्यवस्थेला सहकार्यकरण्यापेक्षा त्याचे वाटोळे करण्याकडेच जनतेचं जास्त लक्ष असतं. आपल्या घरासमोरील रस्त्यावरील घाण किंवा कचरा सुध्दा पालीकेने काढावा असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी स्वच्छतेचा नारा लावलेलाच बरा ! आपला परिसरच जर आपण स्वच्छ राखत नसू तर देश अस्वच्छ आहे असे आपल्या अस्वच्छ मनात विचार करणेही सोडाच !, देशामध्ये काही बदल करायचा असेल तर आधी स्व्त:पासून सुरूवात करायला शिकलं पाहिजे हे आधी ठाम निश्चय करा. तरच देशात सुधारणेचा बदल दिसून येईल. जोपर्यंत सकारात्मकता जनतेमध्ये येणार नाही तोपर्यंत देश अस्वच्छतेच्या विळाख्यात अडकलेला असेल. स्वत: स्वत:च्या आरोग्याची, परिसर स्वच्छ ठेवण्याची, गाव पातळीपासून देशपातळीपर्यंत सर्वांनीच जबाबदारी घेतली तर देश अवघ्या एक महिन्यात स्वच्छ झालेला दिसेल. मग अतुल्य भारत म्हणायला काही हरकत नाही. स्वच्छ भारत मिशनच्या नावाखाली जनतेच्या खिशातून कोटयावधी पैशांची लुट चालू आहे हे कधी जनतेच्या लक्षात येणार. प्रत्येक येणाऱ्या बिलामध्ये जरा डोकावून पहा. स्वच्छ भारत अभियानच्या नावाखाली कर आकारला जात आहे. हे कधी कोणी नक्की पाहिले नसेल. कारण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करुन घाणीचे साम्राज्य वाढवण्याकडे, प्रशसनाच्या राज्यकर्त्यांच्या नावे बोंबाबोंब करणे हे आपले परम कर्तव्य असते. असो, पण ज्या ज्या वेळेस देशात जनतेने मनातून चांगले निर्णय घेतले त्या त्या वेळी देशामध्ये अमुलाग्र बदल घडून आले क्रांती झाली. एवढी ताकत जनतेच्या निर्णर्यक्षमतेवर अवलंबून असते, तर मग राज्यकर्त्यांच्या प्रशसनाच्या नावाने का ? खडे फोडायचे. उठ माणसा जागा हो, स्वच्छ भारत अभियानाचा धाका हो असे म्हटल्यासच आपल्या लक्षात स्वच्छतेविषयक प्रेम जागे व्हावे असे नाही. तर मनातून इच्छा जेंव्हा होते तेंव्हाच खरे देशप्रेम घडते असेच मी म्हणेन. अगोदर आपले मन स्वच्छ करा मग बघा देश आपोआपच स्वच्छ झालेला असेल.

शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..