Posts

Showing posts from December, 2017

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

Image
पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ... हल्ली पुढारी, नेते मंडळी, मंत्री-संत्री ह्या कोणत्याही शुभकार्यासाठी, उदघाटन समारंभासाठी, लग्न, मुंज वा इतर कोणात्याही कार्यक्रमासाठी बोलावण्याची प्रथा पुरोगामी महाराष्ट्रात आजवर चालत आली व चालवली आपणच, गर्दी असल्याशिवाय कार्यक्रम शोभून दिसत नाही. त्यासाठी पुढारी असल्याशिवाय गर्दी जमत नाही हे समिकरण यशस्वी झाल्यामुळे जवळपास प्रत्येकजण कार्यक्रम वा समारंभासाठी आषर्कण म्हणून शक्यतो नावाजलेला, गाजलेला थोडकयात इंप्रेशन पाडणारा पुढारीच बोलावतो. ही नेते मंडळी, मंत्री यांना जनतेने ज्या कामासाठी निवडुन दिलेलं असतं, ती कामं प्रत्येकजण बाजूला सारुन त्याला वेळ न देता प्रसिध्दीच्या हावेपोटी अशा कामांना वेळ जास्तीचा देतात. त्यामुळे विकासाच्या कामांना आपोआप पूर्णविराम मिळतोच. शिवाय जनतेनी त्यांच्या मागंपुढं करावं असा ङ्कपणङ्ख त्यांनी केलेलाच असतो. असंच काही एका अमूक अमूक गावात एका अमूक अमूक इमारतीचं उदघाटन करायचं होतं. गण्या आता त्या गावचा जणू म्होरक्याच समाजा, हया म्होरक्याच्या गावात एक इमारत कईक महिन्यांपासून लोकापर्णन करायचं काय ते पेंन्डींग ऱ्हायलं हुतं. त्या...

वाघीणीचं दुध ! ...

Image
वाघीणीचं दुध ! ... भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की, शिक्षण हे वाघीणीचं दुध आहे ते पिल्यास प्रत्येकजण गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि ते खरंच आहे. ज्ञानामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे की, माहितीच्या आधारे शिक्षण घेणारे त्या त्या क्षेत्रामध्ये आपली शिखरं गाठतातच. क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फु ले यांनी व क्रांतीज्योती सावित्रीमाईंनी आपल्या सर्वांसाठी शिक्षणाची दारं उघडी करुन दिली. शिक्षणाचं महत्वं आपल्याला त्यांनी सांगितलं व शिक्षण घेण्यास प्रवृत्त केलं हे त्यांचं योगदान, त्यांनी केलेला त्याग हे सर्व आपण लक्षात घेतलं पहिजे, समजून घेतलं पाहिजे, त्यांची जाणीव ठेवली पाहिजे. शिक्षण व्यवस्था ही जशी असायला पाहिजे तशी आपल्याला मिळते का ? आपण घेत असलेलं शिक्षण हे त्या व्यवस्थेतलं आहे का? आपण काय शिकलो ? त्याची गुणवत्ता तेवढी आहे का ? जेवढी आपल्याला शिक्षण घेतल्यानंतर गुरगुरायचं आहे म्हणजेच आपल्याला आपली शिखरं गाठायची आहेत. हल्ली तर शिक्षण पध्दतीचा बाजार मांडून ठेवलाय. शिक्षणव्यवस्था ही पार कोलमडली असून त्याचं बाजारी करण झालंय. आपल्या पाल्याला भ...

तरुणांना रोजगार हवाय ! ...

Image
तरुणांना रोजगार हवाय ! ... देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे ही सामाजिक जबाबदारी असते. देशात रोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध असतील तर तरुणांवर आधारित देशाच्या भावी वाटचालीसाठी सर्वच दृष्टीने महत्वाची बाब आहे. देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असतांना त्यात आपल्या देशाला बेरोजगारीची कीड लागली असल्याचे समजते. तरुणांमध्ये शिक्षण उच्च दर्जाचे असावे याकडे जास्तीचा कल असल्यामुळे या देशात गरीबातला गरीब सुध्दा अत्यंत चांगल्या दर्जाचे शिक्षण घेवून नौकरी मिळवण्यासाठी त्याच्यासह संपूर्ण परिवार धडपड करत आहे. पण देशात सरकार कोणाचेही असो तरुणांना फ क्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनाचे लाल गाजर आत्तापर्यंत दाखवण्यात आले आहे. खाजगी नौकरी क्षेत्रामध्ये नौकरीची हमी अत्यंत अल्प प्रमाणात असल्यामुळे खाजगी नौकरी करणं पुढील वाटचालीसाठी हवं तेवढं परिणामकारक ठरत नाही. त्यात सरकारी नौकरीमध्ये कपात करण्याचा फ तवा सत्ताधाऱ्यांनी काढल्यामुळे तरुणांमध्ये नाराजीचा सुर वाढला आहे. तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी होणारा अवाढव्य खर्च लक्षात घेता नौकऱ्यांचे प्रमाण व मिळणारा पगार...