तरुणांना रोजगार हवाय ! ...
तरुणांना रोजगार हवाय ! ...
देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे ही सामाजिक जबाबदारी असते. देशात रोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध असतील तर तरुणांवर आधारित देशाच्या भावी वाटचालीसाठी सर्वच दृष्टीने महत्वाची बाब आहे. देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असतांना त्यात आपल्या देशाला बेरोजगारीची कीड लागली असल्याचे समजते. तरुणांमध्ये शिक्षण उच्च दर्जाचे असावे याकडे जास्तीचा कल असल्यामुळे या देशात गरीबातला गरीब सुध्दा अत्यंत चांगल्या दर्जाचे शिक्षण घेवून नौकरी मिळवण्यासाठी त्याच्यासह संपूर्ण परिवार धडपड करत आहे. पण देशात सरकार कोणाचेही असो तरुणांना फ क्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनाचे लाल गाजर आत्तापर्यंत दाखवण्यात आले आहे. खाजगी नौकरी क्षेत्रामध्ये नौकरीची हमी अत्यंत अल्प प्रमाणात असल्यामुळे खाजगी नौकरी करणं पुढील वाटचालीसाठी हवं तेवढं परिणामकारक ठरत नाही. त्यात सरकारी नौकरीमध्ये कपात करण्याचा फ तवा सत्ताधाऱ्यांनी काढल्यामुळे तरुणांमध्ये नाराजीचा सुर वाढला आहे. तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी होणारा अवाढव्य खर्च लक्षात घेता नौकऱ्यांचे प्रमाण व मिळणारा पगार यांच्या तुलनेत फ ार मोठा फरक आढळून आला. प्लेसमेंट संस्था नौकरी लावण्याचं अमिष दाखवून तरुणांकडून मोठया प्रमाणात आर्थिक लूट करण्याचं दिवसा ढवळ्या काम करत आहे. कित्येक ऑनलाईन नौकरी, घरबसल्या नौकरी या माध्यमातून फसवणूक केली जाते. दिवसेंदिवस याला आळा बसायचा सोडून या घटनांचा कहर होत आहे. तरुणांसाठी व्हिजनचे आश्वासन देवून सत्तेत आल्यानंतर तरी काही बदल होईल असे वाटत होते. परंतू असे काही झाल्याचे दिसून आले नाही उलट रोजगाराच्या संधीमधये घट होत आहे. खाजगी कंपन्यातून तर कामगार कपातीचे धोरण सुरू असल्यामुळे बेरोजगार तरुणांच्या संख्येत आणखीनच वाढ झाली. त्यामुळे अनेक तरुण अस्वस्थ आहेत. असेच जर चालू राहिले तर तरुणांच्या भविष्याला म्हणजेच देश महासत्ता होण्याच्या स्वप्नाला तडा हा जाणारच हे नाकारता येणार नाही. उच्च शिक्षण घेवून नौकरीच्या शोधात असलेली तरुणाई तेवढया प्रमाणात नौकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी देशातील व्यवस्थेने प्रयत्न करणे हे आद्य समजले पाहिजे. तेंव्हाच या देशातील तरुणाई म्हणजेच देशाचा कणा ताठ राहू शकेल.
- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com
Comments
Post a Comment