वाघीणीचं दुध ! ...

वाघीणीचं दुध ! ...
भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की, शिक्षण हे वाघीणीचं दुध आहे ते पिल्यास प्रत्येकजण गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि ते खरंच आहे. ज्ञानामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे की, माहितीच्या आधारे शिक्षण घेणारे त्या त्या क्षेत्रामध्ये आपली शिखरं गाठतातच. क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फु ले यांनी व क्रांतीज्योती सावित्रीमाईंनी आपल्या सर्वांसाठी शिक्षणाची दारं उघडी करुन दिली. शिक्षणाचं महत्वं आपल्याला त्यांनी सांगितलं व शिक्षण घेण्यास प्रवृत्त केलं हे त्यांचं योगदान, त्यांनी केलेला त्याग हे सर्व आपण लक्षात घेतलं पहिजे, समजून घेतलं पाहिजे, त्यांची जाणीव ठेवली पाहिजे. शिक्षण व्यवस्था ही जशी असायला पाहिजे तशी आपल्याला मिळते का ? आपण घेत असलेलं शिक्षण हे त्या व्यवस्थेतलं आहे का? आपण काय शिकलो ? त्याची गुणवत्ता तेवढी आहे का ? जेवढी आपल्याला शिक्षण घेतल्यानंतर गुरगुरायचं आहे म्हणजेच आपल्याला आपली शिखरं गाठायची आहेत. हल्ली तर शिक्षण पध्दतीचा बाजार मांडून ठेवलाय. शिक्षणव्यवस्था ही पार कोलमडली असून त्याचं बाजारी करण झालंय. आपल्या पाल्याला भावी आयुष्यामध्ये काय बनायचं आहे? ते त्याच्या जीवनाच्या वर्तुळात ते स्वत:च ठरवतात व त्याला जाणीवपूर्वक ते ते करायला भाग पाडतात. जे संस्कार आपल्या मुलांवर असायल हवेत. ज्या गोष्टी हव्या नको ते पहायला हव्यात ते सारं सोडून भलतंच शिक्षणाचं ओझं त्या पाल्यावर बरडन रुपी देवून आपण किती आपल्या मुलाबाळांसाठी तळमळ करतो हे दाखवून देण्याचं पालक वर्ग भासवत असतो. आणि हो भासतोच बरं का ! पालक आपल्या जबाबदार्‍या विसरुन त्या पाल्याकडून अपेक्षा ठेवत आहे. पण कधी त्या मुलाला-मुलींना त्यांना काय मिळवायचंय, त्यांना काय बनायचंय, त्यांना कशाची आवड आहे. त्यांचे मन काय म्हणतं, त्यांची ध्येय काय म्हणतात हे सर्व न जाणता त्याला प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेईपर्यंत एकच रट्टा असतो, तो म्हणजे प्रत्येक विषयात टॉपर आपला मुलगा -मुलगी टॉपर रहायला हवी. अरेरे ! हे तर इथंच चुकतं, चांगले गुण मिळवणं ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे, माझा त्या यशाबद्दल बिलकुल विरोध नाही, पण, शिक्षणव्यवस्था जे शिकवते त्यापैकी नौकरी, व्यवहार करतांना त्याचा किती टक्के भाग हा आपण वापरतो, शेवटी आपण ज्याला स्किल, आवड ज्याला म्हणतो त्याच गोष्टीला नंतर नौकरी, व्यवसायमध्ये आपणा कामी आणतो मग शिक्षण शिकतांना घेतलेल्या पैकीच्या पैकी गुणांच इथे संबंध येतो का ? शेवटी पैसा कमवण्यासाठी जी प्राथमिक शिक्षणापासून आपली धडपड असते खुप मोठ्ठं व्हायचंय, ती धडपड शेवटी पैसा कमवण्याकडेच घेवून जाते. फ क्त लिहायला वाचायला येणारे आज अब्जाधीश आहेत. यशश्वी आहेत. मला वाटतं पालकांनी आपल्या पाल्यांसोबत जे अपेक्षेचं आझं लादलं आहे. त्याला थोडी बगल दिली पाहिजे व आपल्या पाल्याची इतर कौशल्य लक्षात घेवून त्याला त्याच्या मनाप्रमाणे वागू दिली पाहिजे. चांगल्या वाईट गोष्टींची वेळोवेळी जाणीव करणे हे पालकांचे कर्तव्य तर आहेच पण ही काळाची गरज सुध्दा तितकीच आहे. स्पर्धेच्या युगाचा ट्रेंड लक्षात घेवून वेळोवेळी शिक्षण घेण्याच्या वर्तुळात परिवर्तन करुन स्वत:ला त्यात झोकवून आपल्या पाल्याला योग्य वेळी संधीचा उपयोग कसा करुन घेता येईल अशी नीती वापरायला सुध्दा पालकांनी सक्षम असलं पाहिजे. शिक्षण व्यवस्था ही आर्थिक दृष्टया खर्चिक बाब तर आहेच पण त्यासाठी पाल्यांना आपल्या अपेक्षेचं ओझं देणं हे कितपत योग्य -अयोग्य हे पालकांनी प्रथम तपासून घ्यायला हवं. शिक्षणासाठी पैसा कुठे खर्च करावा, किती करावा याचेही भान ठेवले पाहिजे. कारण पैसा दिल्याने वाघीणीचं दूध विकत घेता येवू शकत नाही. हे पिण्यासाठी व गुरगुरण्यासाठी, कोणताही शॉर्टकट न वापरता त्याला कष्ट, मेहनत, जिद्द, संघर्ष करावा लागतोच.

शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com

Comments

Post a Comment

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..