पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...
पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...
हल्ली पुढारी, नेते मंडळी, मंत्री-संत्री ह्या कोणत्याही
शुभकार्यासाठी, उदघाटन समारंभासाठी, लग्न, मुंज वा इतर कोणात्याही कार्यक्रमासाठी बोलावण्याची
प्रथा पुरोगामी महाराष्ट्रात आजवर चालत आली व चालवली आपणच, गर्दी असल्याशिवाय कार्यक्रम
शोभून दिसत नाही. त्यासाठी पुढारी असल्याशिवाय गर्दी जमत नाही हे समिकरण यशस्वी झाल्यामुळे
जवळपास प्रत्येकजण कार्यक्रम वा समारंभासाठी आषर्कण म्हणून शक्यतो नावाजलेला, गाजलेला
थोडकयात इंप्रेशन पाडणारा पुढारीच बोलावतो. ही नेते मंडळी, मंत्री यांना जनतेने ज्या
कामासाठी निवडुन दिलेलं असतं, ती कामं प्रत्येकजण बाजूला सारुन त्याला वेळ न देता प्रसिध्दीच्या
हावेपोटी अशा कामांना वेळ जास्तीचा देतात. त्यामुळे विकासाच्या कामांना आपोआप पूर्णविराम
मिळतोच. शिवाय जनतेनी त्यांच्या मागंपुढं करावं असा ङ्कपणङ्ख त्यांनी केलेलाच असतो.
असंच काही एका अमूक अमूक गावात एका अमूक अमूक इमारतीचं उदघाटन करायचं होतं. गण्या आता
त्या गावचा जणू म्होरक्याच समाजा, हया म्होरक्याच्या गावात एक इमारत कईक महिन्यांपासून
लोकापर्णन करायचं काय ते पेंन्डींग ऱ्हायलं हुतं. त्याला हे काम करण्याची जबाबदारी
ही गावाने सोपवली होती. गाव तसं चांगलं ! तेवढंच एक गाव बारा भानगडी असल्यागत. आता
गण्या आपला चार पाच दिस झालं. ईचार करत व्हुता, की काय करावं, काय करावं ? ही इमारत
लोकांच्या वापरासाठी खुली करायची होती. परंतू गण्याला असा कोणी माणूस घावत नव्हता की
त्याला त्यांच्या हाताने उदघाटन करुन लोकापर्णन सोहळा करता यावा. गण्या परेशान झाला.
इकडून तिकडून चकरा मारत होता. तेवढयात गण्याचा दोस्त आला, तो जरा राजकारणाच्या नादी
लागलेला, अर्धवट ज्ञान असलेला, पण बढाया मारण्यात जेमतेम असलेला, काडीनं दातं टोकरीत,
गण्या जिथं आंब्याच्या झाडाखाली चकरा मारत होता तिथं आला आणि मोठा ढेकर देत म्हणाला,
का मित्रा काय मुळव्याध झालाय हुई, काय चकरा मारतोय राव, गण्यानं सर्व हकीकत गण्याचा
दोस्त दगडूला सांगितली. दगडू म्हणला, बस हेवडंच हुई. एक काम कर ङ्कपुढाऱ्याला बोलीव
की, तुझं वजन बी वाढल की, गावात बेण्याङ्ख ! एवढयावर न थांबता दगडूने बऱ्याच राजाकाराणातील
बढाया मारत गण्याला कानमंत्र दिला अन तो तिथून निघून गेला. वाचकहो नेमकं काय म्हणणं
आहे ते तुम्हाला समजलंच असेल, कारण समझनेवालों को सिर्फ इशारा काफी म्हटल्याप्रमाणे
हे आहे राजकारणातील सत्य वास्तव या वास्तवामध्ये किती प्रमाणात योग्यता आहे व किती
प्रमाणात अयोग्यता ती जनतेने ठरवायची व येणाऱ्या काळात असा प्रतिनिधी असला पाहिजे.
ज्याच्या गरजा कमी, ज्याला प्रसिध्दीची हाव नसलेला. असा व्यक्ती निवडा की त्याच्यामुळे
संपूर्ण राजकारणाची व्याख्या बदलेली असेल. तसेच येणाऱ्या काळात नविन चेहऱ्यांचा विचार
करा, शेवटी पुढाऱ्यांकडे असलेला पैसा हा पैसेवाल्यांसाठीच काम करतो, गोरगरीबांसाठी
एकमेव पुरोगामी, डावा विचाराच कामी येतो ये प्रथम लक्षात घेणं गरजेचं आहे. येत्या निवडणुकीत
हा बदल व्हावा ही काळाजी गरज लक्षात घेवून देशहितासाठी एक पाउल आपलेही असले पाहिजे.
आपले दान डोळे झाकून न देता मतदानासारखा हक्क बजावतांना दहा वेळा विचार विनिमय करुनच
पाउल उचलावे हीच खरी जनतेची ताकद येणारा भाविष्यकाळ ठरवते.
- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422,
hr.shankarchavan@gmail.com
hr.shankarchavan@gmail.com
Comments
Post a Comment