पक्ष काढणार म्हणे …
पक्ष काढणार म्हणे … महाराष्ट्रामध्ये पक्ष नावाच्या टपऱ्या दिवसेंदिवस वाढत आहेत. हा लोकशाही व्यवस्थेला बाधक परिणाम ठरत आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेले असल्यामुळे त्याच स्वातंत्र्याचा वापर करून लोकशाही मधल्या समाजाची दिशाभूल करून पक्ष नावाची नवीन टपरी चालू करून सर्वसामान्य जनतेची लूट करू पाहणारे, लूट करणारे, लूट केलेले असे अनेक टपरी संस्थापक आपल्या महाराष्ट्राच्या माती मध्ये अजूनही ताठ मानेने जगत आहेत. तसेच असे डोमकावळे संस्थापक यांच्या नावाने राज्यभर गडगंज संपत्ती जमा आहे. ज्याला आपण घबाड असं म्हणतो. ते घबाड येणाऱ्या सात पिढ्या खातील एवढी संपत्ती यांनी जनतेची दिशाभूल करून पक्ष नावाच्या टपरी च्या माध्यमातून कमावलेली आहे ती कमावलेली संपत्ती चांगल्या मार्गाने कमावली आहे असे कागदोपत्रावर दाखवून राज्यातील सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम या पांढऱ्या पोशाखातील चोरांनी केली आहे. याठिकाणी पक्ष नावाच्या शब्दाला मुद्दाम टपरी हा शब्द वापरला आहे त्याचं कारण म्हणजे कोणत्याही एखाद्या शहरांमध्ये आपण गेलो असता पावला दोन पावलावर चहाची, पान टपरी इ. यांची मांडणी केल...