बेरोजगारी इथली संपत नाही ...



बेरोजगारी इथली संपत नाही ...


देशामध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले असून, बेरोजगारी सारखी मोठी समस्या युवकांच्या जणू पाचवीलाच पूजली आहे. येथील प्रशासन व सत्ताधारी आश्वासनांचे गाजर व कागदी घोडे नाचवण्याशिवाय काहीच करत नाही. दरवर्षी कित्येक डॉक्टर, इंजिनियर, पदवीधारक पदवी घेऊन रोजगार मिळवण्यासाठी बाहेर पडतात. परंतु शेवटी त्यांच्या हाती नैराश्याशिवाय काहीच मिळत नाही. खाजगी नोकरी असो व शासकीय नोकरी येथील रिक्त पदांच्या एका जागेसाठी दहा हजार अर्ज प्राप्त झालेले असे बरेच उदाहरणं आहेत. देशांमध्ये एवढी मोठी गंभीर समस्या असतांना, प्रशासन व सत्ताधारी हातावर हात ठेवून गप्प बसले आहेत. एकमेकांवर टिका करण्यात सत्तेतले पाच वेर्षे कसे निघून जातात यांचं यांनाच कळत नाही. बघ्यांची भूमिका घेऊन बसलेले सत्तेमध्ये येताना विरोधकांच्या नाकर्तेपणाचे भांडवल करून सत्तेवर येतात व शेवटी ‘जैसे थे’ असाच प्रकार घडत असल्यामुळे कित्येक तरुणांना रोजगार मिळत नाही त्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलले जात आहे. भारत महासत्तेची स्वप्न पाहतोय. भारत मंगळवार यान पाठवून तेथे शोध मोहीम सुरू करून वेगवेगळे शोध लावण्याचे स्वप्नं पाहतोय. परंतु येथील व्यवस्थेला ‘दिव्याखालचा अंधार’ मात्र दिसत नाही. अनेक माध्यमं आहेत, हीच माध्यमं वेळोवेळी प्रशासनाला व संबंधितांना आजपर्यंत सूचित करण्यात आलंय तसेच या गंभीर समस्येबाबत जाबही विचारत आलंय, तरीही अशा गंभीर विषयाकडे कोणालाही पाहायला मुळीच वेळ नाही. या देशांमध्ये कोणत्याही गोष्टीचे राजकारण होत असल्यामुळे याचे अनेक निर्दोष बळी जात असल्याचे आपण कित्येकदा पाहीलंय. ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना या देशांमध्ये न्याय कधीच मिळाला नाही. खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुणांना खाजगी नोकरी सल्ला केंद्र व संबंधित सेवा पुरवणाऱ्या संस्था नोकरी मिळविण्याचे आमिष दाखवून अमाप पैसा घेऊन फसवणुकीचे प्रकार करून जणू गोरगरिबांच्या खिशावर दरोडा टाकण्याचा षडयंत्र करत आहेत. दिवसालागणीक कित्येकांना नोकरीला म्हणून फसवणुकीचे प्रकार करणाऱ्यांच्या विरोधात आपल्या देशातील सायबर सेल जणू झोपा काढत आहे. युवकांना नोकरी लावतो म्हणून फसवणूक झाल्याचे समोर आले, कित्येकांचे पैसे बुडाले, परंतु त्यांना आजही न्याय मिळाला नसल्याने सायबर च्या विभागावर तरुणाई शंका व्यक्त करत आहे. दिवसेंदिवस जर असेच घडत राहिले तर नोकरी वाचून अनेक तरुण वंचित राहतील व देश महासत्ता कधीच होणार नाही. कारण या देशाचा आधारस्तंभ हा युवक आहे. या युवकांवर जर अन्याय होत असेल त्यांना पोट भरण्यासाठी नोकरी मिळत नसेल तर देश महासत्ता होईलच कसा ? याबाबत नक्कीच विचार करायला हवा. अशा प्रकारचा एखादा विषय शासन दरबारी मांडला असता काही दिवसांनी एखादी भलतीच बातमी येते व अशा प्रकारच्या समस्या बाबत न्याय न देता दिशाभूल करण्याचे राजकारण आपल्या देशामध्ये होत आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षा बेरोजगारी वाढली असल्यामुळे एका परीक्षेचे स्वरूप दोन वेळा केल्यामुळे त्यातही अनेक वेळ जात आहे याला फक्त बेरोजगारीच जबाबदार आहे. याला पर्याय देणे शासनाचे आद्य कर्तव्य आहे. परंतु असे होताना मुळीच दिसत नाही बेरोजगारी वाढल्यामुळे कित्येक उच्च पदवी धारक सुद्धा परिचय, शिपाई, माळी काम, ड्रायव्हार, कारकून अशा इ. वर्ग 3 च्या पदासाठी अर्ज करताना दिसत आहेत. हि या देशातील शासन व्यवस्थेला खाली मान घालायला लावणारी गोष्ट आहे. शिवाय देशात उच्चशिक्षण घेऊनही शासकीय नोकरी मिळवताना परिचर पदासाठी एखादा पीएचडी झालेला व्यक्ती अर्ज करत असेल तर देशांमध्ये बेरोजगारीबाबत अशा प्रकारचे भयान वास्तव असल्याचे एकूणच दिसून येते. यावर विचार व्हायलाच हवा !
-         शंकर चव्हाण, अंबाजोगाई 9921042422, 
hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?