पक्ष काढणार म्हणे …

पक्ष काढणार म्हणे … 
महाराष्ट्रामध्ये पक्ष नावाच्या टपऱ्या दिवसेंदिवस वाढत आहेत. हा लोकशाही व्यवस्थेला बाधक परिणाम ठरत आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेले असल्यामुळे त्याच स्वातंत्र्याचा वापर करून लोकशाही मधल्या समाजाची दिशाभूल करून पक्ष नावाची नवीन टपरी चालू करून सर्वसामान्य जनतेची लूट करू पाहणारे, लूट करणारे, लूट केलेले असे अनेक टपरी संस्थापक आपल्या महाराष्ट्राच्या माती मध्ये अजूनही ताठ मानेने जगत आहेत. तसेच असे डोमकावळे संस्थापक यांच्या नावाने राज्यभर गडगंज संपत्ती जमा आहे. ज्याला आपण घबाड असं म्हणतो. ते घबाड येणाऱ्या सात पिढ्या खातील एवढी संपत्ती यांनी जनतेची दिशाभूल करून पक्ष नावाच्या टपरी च्या माध्यमातून कमावलेली आहे ती कमावलेली संपत्ती चांगल्या मार्गाने कमावली आहे असे कागदोपत्रावर दाखवून राज्यातील सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम या पांढऱ्या पोशाखातील चोरांनी केली आहे. याठिकाणी पक्ष नावाच्या शब्दाला मुद्दाम टपरी हा शब्द वापरला आहे त्याचं कारण म्हणजे कोणत्याही एखाद्या शहरांमध्ये आपण गेलो असता पावला दोन पावलावर चहाची, पान टपरी इ. यांची मांडणी केलेली असते किंवा अशाच टपऱ्यांनी गर्दी केलेली असते. तशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये पक्ष, संघटना, संघ अशांनी पावलापावलावर गर्दी केली आहे. त्याच गर्दीचे धर्म, जात यामध्ये विभाजन होऊन माणूस माणसाचा व माणुसकीचा मुळीच राहिलेला नाही. ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातली प्रचंड मोठी शोकांतिका आहे. या राज्यांमध्ये पक्ष, संघटनांचा एवढा अतिरेक झाला आहे, की एकाच घरांमध्ये पाच सदस्य असतील तर हे कुटुंब प्रत्येक जण वेगळ्या पक्षांमध्ये वेगळ्या संघटनेमध्ये काम करताना आढळून आले आहे. कुटुंब एकच मात्र पक्ष, संघटना, संघ मात्र अनेक असे असताना कुटुंबातील व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी विभागली गेलेली आहेत. त्यामुळे घरातीलच प्रत्येक जण एकमेकांचा विरोधक तयार झाला आहे. विचारांचा असेल किंवा एखाद्या जातिवादी पक्षाचा. जातीच्या नावाखाली अनेक पक्ष, संघटना तयार झाल्या त्या आज गडगंज संपत्ती कमावून बसले आहेत. प्रत्येकाला पक्ष काढावा वाटतोय, संघटना काढावी वाटते, एखादा संघ काढवा वाटतो व आपण त्याचा अध्यक्ष होऊन आपणही गडगंज संपत्ती कामून बंगला, नोकर, गाडी व ऐशोआरामात रहावं वाटतंय. परंतु अशा प्रकारच्या टपऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढल्यामुळे या स्वतंत्र भारतामध्ये राष्ट्रध्वजा ऐवजी प्रत्येकाच्या हातामध्ये जातीचा झेंडा रोवला गेला आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेची “कोणता झेंडा घेऊ हाती” अशी अवस्था झाली आहे. रोज कोणीही उठतो आणि जातीच्या, धर्माच्या नावाखाली पक्ष काढतो, त्यामुळे अशा प्रकारच्या टपऱ्यांना वेळीच आवर जर बसला नाही तर मोठा अनर्थ भविष्यात नक्कीच होऊन उद्रेक होऊ शकतो. याचा विचार लोकशाहीबद्दल आपुलकी असणाऱ्यांनी नक्कीच करायला हवा कारण ह्या टपऱ्या समाजासाठी नाही तर स्वतःची झोळी भरण्यासाठी काम करतात, हे प्रथमत: लक्षात घेतलं पाहिजे. समाजात वावरत असताना आज-काल खाण्यापिण्यापासून ते राहण्यापर्यंत अशा गोष्टींमुळे प्रत्येक जण गोंधळून गेलाय. प्रत्येकाला जातिवादी रंग मिळाला आहे या रंगामुळे एकमेकांबद्दल द्वेष, तिरस्कार निर्माण झाला आहे. त्यामुळे माणूस माणसाचा न राहिल्यामुळे एकमेकाबद्दल आपुलकी कुठेही दिसून येत नाही आणि या राज्यांमध्ये जो तो येतो पक्ष काढून, संघटना काढून, संघ तयार करून सर्वसामान्यांमध्ये असलेल्या ताकतीचे विभाजन करतो व लोकशाहीला कमकुवत बनवण्याचे काम करतो. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा गोष्टींना खतपाणी मिळाले तर विध्वंस नक्कीच.
-    शंकर चव्हाण, अंबाजोगाई 9921042422

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..